शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक ! १३ वर्षीय शाळकरी मुलीचा विनयभंग ; शाळकरी मुली शहरात सुरक्षित नसल्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 14:51 IST

मुलीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल : पोलिसांनी केले आरोपीला अटक; सतत दोन दिवस केला पाठलाग

लोकमत न्यूज नेटवर्क देवरी: देशभरात महिला आणि अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारांबाबत सर्वत्र संताप व्यक्त केला जात असतानाच येथे १३ वर्षीय शाळकरी मुलीचा दोनदा विनयभंग करण्यात आल्याची घटना शुक्रवारी (दि. २३) उघडकीस आली. त्या मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपी खुशाल कैलास राऊत (१८, रा. परसटोला) या तरुणाला अटक केली आहे. मात्र, या घटनेमुळे अल्पवयीन शाळकरी मुली शहरात सुरक्षित नसल्याची भीती पीडित मुलीच्या पालकांसह समाजमनात निर्माण झाली आहे.

देवरी पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शिवाजी चौकात गुरुवारी (दि. २२) सकाळी १०:३० वाजता पीडित मुलगी आपल्या खासगी वसतिगृहातून शाळेत जात होती. दरम्यान, शिवाजी चौकातील स्टार कॉम्प्यटरजवळ आरोपी खशाल राऊत स्कूटीवर आला व त्याने मुलीचा हात पकडून मोबाइल घेण्यास सांगितले.

मुलीने नकार दिला असता, त्याने तिला मारण्याची धमकी दिली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (दि. २३) सकाळी १०:३० वाजता त्याने पीडित मुलीचा पाठलाग करीत शाळेसमोर तिचा हात पकडला व माझ्याशी बोल, नाही तर तुला मारेन, अशी धमकी देत तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत तिचा विनयभंग केला. यावर मुलगी जोरात ओरड लागल्याने आरोपीने तेथन पळ काढला. मुलीने घडलेली घटना वसतिगृह अधीक्षिकेला सांगून पोलिस ठाणे गाठले.

तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी शुक्रवारी भारतीय न्याय संहिता कलम ७४,७८, ३५, १(२), सहकलम ८,१२ लैंगिक अपराध बाल संरक्षण अधिनियम २०१२ अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपी खुशाल राऊत याला अटक केली. देवरी पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला तुरुंगवासात पाठविले आहे. पुढील तपास सपोनि गंगाकचर करीत आहेत. 

शाळकरी मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर देवरी हे तालुक्याचे ठिकाण असल्याने ग्रामीण भागातून शिक्षणासाठी येणाऱ्या शाळकरी मुलींची संख्या जास्त प्रमाणात आहे. बसस्थानक ते शाळा व शाळा ते बसस्थानक यादरम्यान पायी जाताना शहरातील रोडरोमिओ मुलींना त्रास देताना आढळून येतात. परंतु या रोडरोमिओंवर कारवाई होत नाही. यातच पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ठिकाणी भरदिवसा शाळकरी मुलीवर विनयभंग झाल्याची घटना घडल्याने पालकांनी संताप व्यक्त करीत पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

पोलिस बंदोबस्ताची गरज या घटनेनंतर शैक्षणिक संस्थांनी सुद्धा या या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी अशाच घटना घडत असताना 'लोकमत'ने पोलिस बंदोबस्तावर प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळेस पोलिस अधीक्षकांनी दखल घेत पोलिस बंदोबस्त वाढविला होता. परंतु आजघडीला शाळेच्या वेळेत शाळांच्या मार्गावर पोलिस बंदोबस्त दिसत नसल्याने अशा घटना घडत असून, यावर अंकुश कोण लावणार? असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :gondiya-acगोंदिया