लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ग्रामीण पातळीवर रोजगाराच्या संधी व साधने उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने विश्वमूर्ती बहुउद्देशिय शिक्षण सस्थेच्यावतीने ग्रामोत्थानासाठी वरदान हे बिद्र वाक्य घेवून सेंद्रीय शेती तंत्रज्ञानाद्वारे दुग्ध उत्पादक व सेंद्रीय बाजारपेठ निर्मिती प्रकल्प ही संकल्पना डॉ. प्रशांत कटरे यांनी जिल्हा प्रशासनासमोर मांडली. याची दखल घेत जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी शुक्रवारी (दि.२९) जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, प्रकल्प संचालक आत्मा, उपायुक्त पशुसंवर्धन, उपमुकाअ, पंचायत, जिल्हा दुग्ध विकास अधिकारी, सहा. आयुक्त मत्स्य व्यवसाय तथा कृषी विकास अधिकारी या प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रकल्पावर बैठक घेतली. या बैठकीत हे प्रकल्प कसे साकार होईल व ग्रामीण भागातील बेरोजगार व शेतकºयांच्या समस्या कशा मार्गी लागती, यावर चर्चा केली. तसेच प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक त्या बाबी पूर्ण करण्याचे निर्देश दिले. यामुळे जिल्ह्यात सेंद्रीय बाजारपेठ निर्मिती केंद्र निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे.रोजगाराच्या शोधात ग्रामीण भागातील मजुरांचे होणारे स्थानांतरण, शेतकऱ्यांच्या आत्महत्या या प्रामुख्याने ग्रामीण भागात रोजगाराची साधने उपलब्ध नसणे हे असून ग्रामीण विकासासाठी हा मुख्य अडथळा आहे. ग्रामीण भागात नैसर्गिक साधने मुबलक प्रमाणात आहेत. परंतु त्या साधनांचा ग्रामीण विकासाशी मेळ घालता येऊ शकला नाही. जंगलातून तेंदूपत्ता, लाख गोळा करणे, लाकडी व्यवसाय तसेच अनेक पारंपारिक व्यवसायांना अखेरची घरघर लागली आहे.ग्रामीण भागातील अकुशल शेतकरी अथवा शेतमजुरास या योजनेद्वारे कुशल शेतकरी करण्यासाठी उपलब्ध नैसर्गिक साधनांचा वापर करुन शेती पुरक व्यवसाय आर्थिक दृष्ट्या कसे करता येईल, हे या प्रकल्पाचे मूळ उद्देश आहे.शेंद्रीय शेतीमाल ग्राहक विक्रेत्यांसाठी कसा लाभदायक होईल, असा प्रस्ताव प्रकल्पाचे संयोजक डॉ. कटरे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे मांडला. त्या प्रकल्पाची प्राथमिक दृष्ट्या माहिती घेतल्यानंतर जिल्हाधिकाºयांना जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, प्रकल्प संचालक, आत्मा, उपायुक्त पशुसंवर्धन, उपमुकाअ पंचायत, जिल्हा दुग्ध विकास अधिकारी, सहा. आयुक्त मत्स्य व्यवसाय तथा कृषी विकास अधिकारी तसेच संयोजक डॉ. प्रशांत कटरे, प्रशांत बोरकर, शक्ती कटरे, डॉ. प्रिती कटरे आदींच्या उपस्थितीत या प्रकल्पाच्या मांडणीवर या सभेत चर्चा करण्यात आली. प्रकल्पाची संपूर्ण माहिती यावेळी डॉ. कटरे यांनी विषद केली. तसेच प्रकल्प निर्मितीसाठी शासनाकडे अस्तित्वात असलेल्या योजनांच्या माध्यमातून हा प्रकल्प कसा साकार करता येईल, यावर अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. तसा अहवाल सादर करुन व पुन्हा एकदा प्रकल्प निर्मितीसाठी बैठक बोलावून हा प्रकल्प तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश दिले. यामुळे सेंद्रीय बाजारपेठ निर्मिती केंद्र जिल्ह्यात साकार होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी व बेरोजगारांना रोजगार मिळण्याची संधी उपलब्ध होऊन आर्थिक दृष्ट्याही हा प्रकल्प लाभदायक ठरणार असल्याचे मत अधिकाºयांनी व्यक्त केले आहे.
जिल्ह्यात साकारणार सेंद्रीय बाजारपेठ निर्मिती केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 06:00 IST
ग्रामीण भागातील अकुशल शेतकरी अथवा शेतमजुरास या योजनेद्वारे कुशल शेतकरी करण्यासाठी उपलब्ध नैसर्गिक साधनांचा वापर करुन शेती पुरक व्यवसाय आर्थिक दृष्ट्या कसे करता येईल, हे या प्रकल्पाचे मूळ उद्देश आहे. शेंद्रीय शेतीमाल ग्राहक विक्रेत्यांसाठी कसा लाभदायक होईल, असा प्रस्ताव प्रकल्पाचे संयोजक डॉ. कटरे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे मांडला.
जिल्ह्यात साकारणार सेंद्रीय बाजारपेठ निर्मिती केंद्र
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांनी घेतली प्रकल्पाची दखल : शेतकरी व बेरोजगारांना रोजगाराची संधी