शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
3
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
4
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
5
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
6
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
7
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
8
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
9
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
10
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
12
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
13
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
14
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
15
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
16
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
17
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
18
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
19
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
20
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."

अट्टल गुन्हेगारांसाठी ‘आॅपरेशन आॅल आऊट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 00:11 IST

वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी तसेच सराईत गुन्हेगारांचे कंबरडे मोडण्यासाठी नवनियुक्त पोलीस अधीक्षकांनी ‘आॅपरेशन आॅल आऊट’ हा उपक्रम सुरू केला. ३१ आॅगस्टच्या रात्रीपासून १ सप्टेंबरच्या पहाटेपर्यंत गोंदिया शहरातील तिन्ही पोलीस ठाण्याच्या पोलीसांनी हे आॅपरेशन चालविले.

ठळक मुद्देपोलीस अधीक्षकांचा उपक्रम : शोधमोहिमेत आठ गुन्हेगारांना अटक

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी तसेच सराईत गुन्हेगारांचे कंबरडे मोडण्यासाठी नवनियुक्त पोलीस अधीक्षकांनी ‘आॅपरेशन आॅल आऊट’ हा उपक्रम सुरू केला. ३१ आॅगस्टच्या रात्रीपासून १ सप्टेंबरच्या पहाटेपर्यंत गोंदिया शहरातील तिन्ही पोलीस ठाण्याच्या पोलीसांनी हे आॅपरेशन चालविले. या आॅपरेशन दरम्यान गोंदिया शहर पोलिसांनी आठ अट्टल गुन्हेगारांना पकडले.सद्या सणासुद्दीचे दिवस असल्यामुळे लोक रात्री उशीरापर्यंत बाहेर असतात. गणेशोत्सव तोंडावर आहे. या सण उत्सवाचा फायदा घेऊन घरफोडी, चोरी, दरोडा घालणारे गुन्हेगार आपल्या कार्याला पुर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करतात. घरफोडी, चोरी, दरोडा या प्रकरणात ज्यांचा समावेश आहे. व ज्यांच्यावर ‘नॉन बेलेबल वारंट’ आहे अश्या लोकांची शोध मोहीम गोंदिया शहराच्या संपूर्ण भागात राबविण्यात आली. गोंदिया शहर, रामनगर, गोंदिया ग्रामीण या तिन्ही पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी रात्रभर ‘आॅपरेशन आॅल आऊट’ राबविले. पोलीस अधीक्षक हरिष बैजल, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांच्या मार्गदर्शनात गोंदिया शहरचे ठाणेदार मनोहर दाभाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक नार्वेकर,उपनिरीक्षक नितीन सावंत व ३६ पोलीस कर्मचाऱ्यांनी सावराटोली, दसखोली, गौतमनगर, छोटा गोंदिया, सुंदरनगर, संजयनगर हा परिसर पिंजून काढून आठ आरोपींना अटक केली. रामनगर पोलीसांनी पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या नेतृत्वात ही मोहीम राबविली. गोंदिया ग्रामीणचे ठाणेदार नारनवरे यांच्या नेतृत्त्वात रामनगर पोलिसांनी ही मोहीम राबविली. या तिन्ही पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाºयांच्या मदतीला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनकर ठोसरे, सहाय्यक पाोलीस निरीक्षक रमेश गर्जे व कर्मचाऱ्यांनी रात्रगस्त घातली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन संशयतीना ताब्यात घेतले. त्यातील एकाला रामनगर पोलिसांच्या तर दुसºयाला गोंदिया शहर पोलिसांच्या स्वाधीन केले.आॅपरेशन आॅल आऊटमध्ये यांना केली अटकआॅपरेशन आॅल आऊटमध्ये केलेल्या कारवाईत नॉन बेलेबल वारंट असलेल्यांना अटक करण्याची मोहीम चालविली. गोंदिया शहर पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली. त्यात गौतमनगर गोंदिया येथील आकाश उर्फ पेंद्या सिलीप टेंभेकर (२१) याच्यावर तीन अटक वारंट होते. सावराटोली येथील दीप छोटू सिर्वो (२८) याच्यावर एक, गोविंदपूर संजयनगरातील राजाराम तिलकचंद पटले (६३) याच्यावर एक, सुंदरनगरातील नितेश रामदास ब्राम्हणकर (२६) याच्यावर एक, सावराटोलीच्या सुभाष वॉर्डातील मयूर संजय सांडेकर (२४) याच्यावर दोन, सुंदरनगरातील सुमित शिवचरण मेश्राम (२५) याच्यावर एक, गोवर्धन चौक छोटा गोंदिया येथील पर्वत शिवाजी चचाने (२८) याच्यावर एक व मटन मार्केट येथील सुमित देवेंद्र माकबन (२१) याच्यावर एक अटक वारंट होता.गुन्हेगारांवर बसणार वचकशारिरीक व आर्थिक गुन्हेगारीवर वचक आणणयासाठी ‘आॅपरेशन आॅल आऊट’ जिल्हाभरात राबविले जाणार आहे. सदरक्षणााय खलनिग्रहणायचा प्रत्यय या मोहीमेतून पोलिस विभाग देणार आहे. आता सण, उत्सवाला सुरूवात होणार असल्याने शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी ग्रामीण भागातील महात्मा गांधी तंटामुक्त मोहीम, ग्राम सुरक्षा दल, पोलीस मित्र यांच्या सहकार्याने पोलीस विभाग जिल्ह्याला शांततेतून समृध्दीकडे नेणार आहे.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी