केवळ ३९ हजार शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 10:51 PM2017-12-11T22:51:18+5:302017-12-11T22:51:34+5:30

शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीस सुरुवातीला जिल्ह्यातील ७३ हजार शेतकरी पात्र ठरण्याचा प्राथमिक अंदाज सहकार निबंधक कार्यालय आणि बँकाकडून वर्तविला जात होता.

Only 3,900 farmers will get debt relief | केवळ ३९ हजार शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी

केवळ ३९ हजार शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी

Next
ठळक मुद्देएक लाखापेक्षा अधिक कर्जदार : शेतकऱ्यांना बसणार फटका

आॅनलाईन लोकमत
गोंदिया : शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीस सुरुवातीला जिल्ह्यातील ७३ हजार शेतकरी पात्र ठरण्याचा प्राथमिक अंदाज सहकार निबंधक कार्यालय आणि बँकाकडून वर्तविला जात होता. मात्र आता केवळ ३९ हजार ४१८ शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरण्याची शक्यता बँकेनेच वर्तविली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकरी कर्जमाफीस वंचित राहणार असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे एकूण १ लाख ७ हजार ६३० कर्जदार शेतकरी खातेदार आहेत. मात्र शासनाकडून आत्तापर्यंत ग्रीन यादीतील शेतकऱ्यांच्या तीन याद्या बँकेला प्राप्त झाल्या आहेत. त्यात केवळ ३९ हजार ४१८ शेतकºयांना कर्जमाफीस पात्र ठरविण्यात आले आहे.त्यामुळे ऐवढ्याच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता बँकेच्या सूत्रांनी वर्तविली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेतून कर्जाची उचल करणाºया शेतकºयांची संख्या सर्वाधिक आहे. तर राष्टÑीयकृत बँकेच्या थकीत कर्जदार शेतकºयांची संख्या फार कमी आहे. जिल्हा बँकेने ३९ हजारपेक्षा अधिक शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरण्याची शक्यता कमी असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेतील कर्जदार शेतकऱ्यांची संख्या १ लाख ७ हजार ६३० एवढी आहे. यातील ७३ हजारांपेक्षा जास्त शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र होणे अपेक्षीत होते. कर्जमाफीच्या आशेने या शेतकऱ्यांनी आॅनलाईन अर्ज केले. मात्र जिल्हा मध्यवर्ती बँकेला शासनाकडून ३ याद्या पाठविण्यात आल्या आहेत. त्यात ३९ हजार ४१८ शेतकऱ्यांच्या नावांचा समावेश असून त्यांचे ११४ कोटी ६३ लाख ७६ हजार ६२ रूपयांचे कर्ज माफ करण्यात आले आहे. शासनाने पाठविलेल्या पहिल्या यादीत २ हजार ६२० शेतकऱ्यांसाठी १० कोटी ४२ लाख २९ हजार ३५७ रूपये, दुसऱ्या यादीत १४ हजार २५० शेतकऱ्यांचा समावेश असून यात ४९ कोटी २६ लाख १५ हजार ५१२ रूपये, तिसऱ्या यादीत २२ हजार ५४८ शेतकऱ्यांचा समावेश असून त्यांना ५४ कोटी ९३ लाख ८८ हजार ५९३ रूपयांचा निधी मंजूर केला आहे.
जिल्हा बँकेला आतापर्यंत प्राप्त झालेल्या याद्यानुसार शेतकऱ्यांचे खाते शून्य करण्यासाठी ३२ कोटी २० लाख रुपयांची गरज होती. मात्र शासनाने केवळ २६ कोटी ५५ लाख ९९ हजार ३२१ रूपये बँकेला उपलब्ध करून दिल्याची माहिती आहे.
६३९ ओटीएस खातेदार
जिल्हा बँकेनुसार ६३९ ओटीएस खातेदार आहेत. ज्यांच्यावर दीड लाखांपेक्षा जास्तीचे कर्ज आहे. त्यांचे केवळ १ लाख रुपयांपर्यंतचे कर्जमाफ करण्यात आले आहे. तर उर्वरीत रक्कम शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात जमा करावी लागणार आहे. यानंतरच अशा शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ देता येणार आहे. बँकेने २ हजार ११८ खातेदारांची कर्जमाफीची रक्कम अडविली आहे. यात काही दीड लाखांपेक्षा कमी रकमेचे कर्जदार आहेत.
७ हजार ४० शेतकऱ्यांची रक्कम परत पाठविली
कर्जमाफीच्या यादीतून ७ हजार ४० शेतकऱ्यांचे खाते जुळत नसल्याने कुणाला कमी तर कुणाला जास्त रक्कम पाठविण्यात आली असून कुणाच्या खाते क्रमांकात बदल झाला आहे. यामुळे कर्जमाफीसाठी पाठविण्यात आलेल्या रकमेतून ५ कोटी ६ लाख १ हजार ४३८ रूपये शासनाला परत करण्यात आले आहेत.

Web Title: Only 3,900 farmers will get debt relief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.