लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा कोरोनामुक्त झाल्याने ग्रीन झोनमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळेच जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने थोडी लक्षणे दिसताच अशा व्यक्तींना शासकीय क्वारंटाईन कक्षात दाखल करुन त्यांच्यावर उपचार केले जात आहे. सध्या जिल्ह्यातील सात क्वारंटाईन कक्षात शंभर जण उपचार घेत आहे. तर आत्तापर्यंत जिल्ह्यातील एकूण ३०९ जणांचे स्वॅब कोरोना निगेटिव्ह आले आहे.जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहे. या उपाययोजनांमुळेच जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे. जिल्ह्यात मागील २९ दिवसांच्या कालावधीत एकही नवीन कोरोना बाधीत रुग्ण आढळला नाही. त्यामुळेच जिल्ह्याचा ग्रीन झोनमध्ये समावेश करण्यात आला आहे. तर जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनमध्ये काही दुकाने सुरू करण्यास शिथिलता दिली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण ३१२ व्यक्तींचे स्वॅब नमुने कोरोना चाचणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यापैकी ३०९ व्यक्तीच्या घशातील स्त्रावांच्या नमुन्याचा चाचणी अहवाल प्राप्त झाला आहे. हे सर्व नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे. तर तीन नमुन्यांचा अहवाल प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे. जिल्ह्यातील सात शासकीय क्वारंटाईन कक्षात सध्या शंभर व्यक्ती उपचार घेत आहेत. यामध्ये नवीन जिल्हा क्र ीडा संकुल येथील कोविड केअर सेंटरमध्ये ५० व्यक्ती दाखल आहेत.याशिवाय एम.एस.आयुर्वेदिक कॉलेज कुडवा गोंदिया १७, चांदोरी ७, लिटिल बर्ड कॉन्व्हेंट नगर परिषद तिरोडा ४, समाज कल्याण निवासी शाळा, डव्वा २, शासकीय आश्रमशाळा इळदा १३, बिरसी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथे ७ अशा एकूण १०० व्यक्तींचा समावेश आहे.
जिल्ह्यातील शंभर जण शासकीय क्वारंटाईन कक्षात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 05:00 IST
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहे. या उपाययोजनांमुळेच जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे. जिल्ह्यात मागील २९ दिवसांच्या कालावधीत एकही नवीन कोरोना बाधीत रुग्ण आढळला नाही. त्यामुळेच जिल्ह्याचा ग्रीन झोनमध्ये समावेश करण्यात आला आहे. तर जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनमध्ये काही दुकाने सुरू करण्यास शिथिलता दिली आहे.
जिल्ह्यातील शंभर जण शासकीय क्वारंटाईन कक्षात
ठळक मुद्दे३०९ जणांचे स्वॅब नमुने निगेटिव्ह । तीन नमुन्यांचा अहवाल अप्राप्त