शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया जिल्ह्यातील दीड लाख शेतकरी अद्यापही नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 18:08 IST

केवळ ५८५५ जणांच्या खात्यावर रब्बीची मदत: पोर्टलमधील बिघाडाचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात गेल्या रब्बी हंगामात झालेल्या अवकाळी पावसामुळे धानपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीचे पंचनामे करून मदतीसाठी २७९१४ शेतकरी पात्र ठरविण्यात आले. नुकसानभरपाईसाठी शासनाने १७ कोटी ७५ लाख ५ हजार रुपयांचा निधी मंजूर केला; पण ईकेवायसी आणि पोर्टलमधील बिघाडामुळे आतापर्यंत केवळ ५८५५ शेतकऱ्यांचा खात्यावर ३ कोटी ७३ लाख रुपये जमा करण्यात आले, तर रब्बीतील २२ हजार ५९ आणि खरिपातील १ लाख ३२ हजार ८४४ असे एकूण १ लाख ५४ हजार ९१४ शेतकरी नुकसानभरपाई मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे.

जिल्ह्यात गेल्या रब्बी हंगामात ऐन धानकापणीच्या कालावधीत अवकाळी पावसाने हजेरी लावली, तर काही ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली. त्यामुळे रब्बीतील धानपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. रब्बी हंगामातील पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे महसूल व कृषी विभागाच्या यंत्रणेच्या माध्यमातून करण्यात आले. एप्रिल व मे २०२५ या कालावधी झालेल्या अवकाळी पावसामुळे एकूण २७ हजार ९३४ शेतकरी बाधित झाले, तर एकूण १७कोटी ७५ लाख ५ हजार रुपयांच्या धानपिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल कृषी विभागाने जिल्हा प्रशासन व शासनाकडे सादर केला. यानंतर शासनाने याला मंजुरी देत नुकसानभरपाईसाठी निधी मंजूर केला. नुकसान भरपाईची रक्कम डीबीटीच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली जात आहे. मात्र, बऱ्याच शेतकऱ्यांनी ई-केवायसी न केल्याने त्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली नव्हती. यानंतर शेतकऱ्यांनी ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली; पण त्यानंतर शासनाच्या पोर्टलमध्ये तांत्रिक बिघाड आल्याने नुकसानग्रस्त २२०५९ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अद्यापही नुकसानीचे १५ कोटी ६८ लाख १५ हजार रुपये जमा झाले नाही. केवळ ५८५५ शेतकऱ्यांच्या खात्यावर आतापर्यंत ३ कोटी ७८ लाख ७५ हजार रुपये जमा झाले असून उर्वरित २२ हजार शेतकरी नुकसानभरपाईसाठी बँकेच्या पायऱ्या झिजवीत असल्याचे चित्र आहे.

दोन महिन्यापासून शेतकऱ्यांची पायपीट कायम

रब्बी व खरीप हंगामात पिकांच्या झालेल्या नुकसान भरपाईचे पैसे अद्याप शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले नाही. त्यामुळे गेल्या दोन महिन्यापासून शेतकऱ्यांची बँका आणि कृषी विभागाकडे पायपीट सुरू आहे.

खरिपातील नुकसानीसाठी निधीची प्रतीक्षा

यंदा खरीप हंगामातील धानपिकाला सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळीचा पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका बसला. यामुळे ४९ हजार १६४ हेक्टरमधील ७८ कोटी १३ लाख रुपयांच्या पिकांचे नुकसान झाले. यामुळे १ लाख ३२ हजार ८४४ शेतकरी बाधित झाले होते. या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम देण्यासाठी शासनाकडे निधीची मागणी करण्यात आली असून अद्यापही निधी उपलब्ध करून देण्यात आला नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Gondia Farmers Await Compensation Due to System Glitches, Fund Shortage

Web Summary : Over 1.5 lakh Gondia farmers await crop damage compensation after unseasonal rains. System errors and pending funds delay payments, leaving many distressed. Only a fraction have received aid.
टॅग्स :farmingशेतीFarmerशेतकरी