शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवा कुर्ता, भगवा टिळा आणि..., सुवेंदू अधिकारी यांनी घेतली बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
2
भारत-पाकिस्तानमध्ये पडद्याआड चर्चा? गेल्या तीन महिन्यात दोन बैठका, समोर येतेय अशी माहिती
3
महागड्या Personal Loan ला विसरा; PPF खात्यावर मिळवू शकता स्वस्त कर्ज, जाणून घ्या नियम
4
प्रेम विवाहाला ३ महिने पूर्ण होण्याआधीच मोनिकाचा संशयास्पद मृत्यू; जळत्या चितेतून पोलिसांनी बाहेर काढला मृतदेह
5
Tamil Nadu Govt Formation: विजय यांच्या पक्षाने राज्यपालांना दिलं पाठिंब्याचं खोटं पत्र, या नेत्याने घेतली पोलिसांत धाव   
6
पंतप्रधान मोदींचा करिष्मा अन् अमित शाहांची चाणक्यनीती पश्चिम बंगालमध्ये यशस्वी- एकनाथ शिंदे
7
सामुद्रिक शास्त्र : डोळा लवणे शुभ की अशुभ? स्त्री आणि पुरुषांसाठी काय आहेत याचे वेगवेगळे अर्थ!
8
युझवेंद्र चहल ई-सिगारेट पिताना दिसला, पण कारवाई मात्र अर्शदीप सिंगवर होणार? जाणून घ्या प्रकरण
9
"६००० कोटींची शासकीय जमीन खासगी बिल्डर्सच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव"; काँग्रेसचा आरोप
10
पेट्रोल पंपांवर मोफत मिळतात 'या' ६ सुविधा; पैसे मागितले तर करू शकता तक्रार, जाणून घ्या तुमचा अधिकार
11
Nashik TCS Case: निदा खानचा हैदराबादला पळण्याचा प्लॅन कसा फसला? एआयएमआयएम नेत्याचा मोबाईल सापडला अन्...
12
Astrology: तुमचा जन्म सकाळचा की रात्रीचा? जन्मवेळ सांगते तुमच्या स्वभावाचे विशिष्ट पैलू!
13
घरबसल्या दरमहा कमवू शकता २० हजार रुपये; जाणून घ्या Post Officeच्या या सुपरहिट योजनेचं गणित
14
तमिळनाडू सत्तासंघर्ष: बहुमताची बेरीज जुळली नाही; विजय याच्या शपथविधीला राज्यपालांचा पुन्हा ब्रेक?
15
एज व्हेरिफिकेशन करताना इंटरनेट कंपन्यांच्या नाकी नऊ; खोट्या दाढी-मिशा लावून मुलं करतायत सिस्टिमची फसवणूक!
16
‘मुलीच्या डोक्यावर केस कमी आहेत...’ सांगत साखरपुडा मोडला, 'खरं' कारण कळताच सगळ्यांचा संताप झाला!
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिका-इराण भिडले! युद्धविराम धुडकावून गोळीबार; हल्ल्यामुळे जहाजाला लागली आग
18
भारताचा दणका अन् चीनचा खोटारडेपणा! १ वर्षानंतर चीनने जगासमोर मान्य केलं ऑपरेशन सिंदूरमधील 'ते' सत्य
19
पुन्हा उधारीच्या भरवशावर पाकिस्तान! IMF कडून १.३२ बिलियन डॉलर्सची मदत; पण जनतेचे कंबरडे मोडणार?
20
लेफ्टिनेंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी देशाचे नवे CDS, अशी आहे त्यांची कारकीर्द 
Daily Top 2Weekly Top 5

डाटा आॅपरेटर्सचे कामबंद आंदोलन

By admin | Updated: December 9, 2014 22:53 IST

तालुक्यातील महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेने आपल्या विविध मागण्यांसंदर्भात कामबंध आंदोलन सुरू केले आहे. तसेच संघटनेच्या वतीने आपल्या समस्या सोडविण्यासाठी खंडविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले.

तिरोडा : तालुक्यातील महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेने आपल्या विविध मागण्यांसंदर्भात कामबंध आंदोलन सुरू केले आहे. तसेच संघटनेच्या वतीने आपल्या समस्या सोडविण्यासाठी खंडविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले.
भारत सरकारच्या ई-पंचायत प्रकल्पांतर्गत राज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे संगणकीकरण करण्यासाठी महाआॅनलाईन कंपनीच्या माध्यमातून कंत्राटी स्वरूपामध्ये प्रत्येक ग्रामपंचायत व पंचायत समिती कार्यालयात डाटा एंट्री आॅपरेटर्सची नियुक्ती मानधन तत्वावर करण्यात आली.
संगणक चालकांना शासनाव्दारे आठ ८२४ रुपये मानधन निश्चित करण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्षात केवळ तीन हजार ८०० ते चार हजार १०० रुपये इतकेच दिले जातात. तेसुद्धा ३ ते ४ महिन्यांपर्यंत मिळत नाही. आता महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेने आपल्या मागण्यांकरिता राज्यव्यापी कामबंद आंदोलन पुकारले आहे.
शासनाने महाआॅनलाईन कंपनीशी केलेला करार रद्द करून राज्य शासनाने त्यांना कायमस्वरूपी नियुक्तीपत्र द्यावे. संपूर्ण वेतनश्रेणी लागू करावी. थकीत मानधन त्वरीत देण्यात यावे. तसेच सर्व भत्ते लागू करण्यात यावेत अशा मागण्यांचे निवेदन खंडविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले. याप्रसंगी सुभाष जांभुळकर, तुरेंद्र नागपुरे, नरेंद्र आगाशे व इतर संगणक चालक प्रामुख्याने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)