अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या पतीवर गुन्हा

By Admin | Updated: May 2, 2015 01:46 IST2015-05-02T01:46:42+5:302015-05-02T01:46:42+5:30

पत्नीशी अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या पतीवर व हुंड्यासाठी छळ करणाऱ्या सासू व भासऱ्याविरूध्द रामनगर पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा दाखल केला आहे.

Offense on an unnatural act | अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या पतीवर गुन्हा

अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या पतीवर गुन्हा

गोंदिया : पत्नीशी अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या पतीवर व हुंड्यासाठी छळ करणाऱ्या सासू व भासऱ्याविरूध्द रामनगर पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा दाखल केला आहे.
न्यू लक्षमीनगरातील आरोपी रवीशंकर नारायणसिंह सोलंकी (३५) याने आपल्या पत्नीशी अनैसर्गिक कृत्य केले.
गणेशीयाबाई नारायणसिंह सोलंकी (६०) व भासरा राजेशसिंह नारायणसिंह सोलंकी (४५) यांनी तिला माहेरून पाच लाख रूपये हुनडा घेऊन ये व माहेरून जमीनीचा अर्धा हिस्सा माग म्हणून तिचा छळ करण्यात आला.
हा छळ २७ फेब्रुवारी २०१२ ते ३० जानेवारी २०१५ पर्यंत करण्यात आला. त्यामुळे असह्य होऊन त्यांनी तक्रार दाखल केली. तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी आरोपीविरूध्द भादंविच्या कलम ४९८ अ, ३७७, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Offense on an unnatural act