शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

तलाव संवर्धनामुळे वाढली परदेशी पाहुण्यांची संख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 21:17 IST

हिवाळ्यात परदेशी पाहुणे सातासमुद्रापलिकडून जिल्ह्यातील तलाव, नदी व इतर पाठवठ्यांवर दरवर्षी गर्दी करतात. यावर्षी सुद्धा बऱ्यापैकी त्यांचे आगमन झाले आहे.

ठळक मुद्देवन व्यवस्थापन समित्यांचा पुढाकार : गावकºयांच्या सहकार्याचे फलित

अंकुश गुंडावार।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : हिवाळ्यात परदेशी पाहुणे सातासमुद्रापलिकडून जिल्ह्यातील तलाव, नदी व इतर पाठवठ्यांवर दरवर्षी गर्दी करतात. यावर्षी सुद्धा बऱ्यापैकी त्यांचे आगमन झाले आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखरेपर्यंत त्यांचा परतीचा प्रवास सुरू होतो. तिरोडा तालुक्यातील परसवाडा आणि लोहारा येथील जलाशयांच्या संवर्धनामुळे यंदा परदेशी पाहुण्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिलासादायक चित्र आहे.तलावांचा जिल्हा अशी गोंदिया जिल्ह्याची ओळख आहे. यामुळे परदेशी पक्ष्यांचे दरवर्षी जिल्ह्यात आमगन होत असते. पण यंदा वनव्यवस्थापन समिती, गावकरी आणि पर्यावरण प्रेमी संस्थांनी तलावांचे संवर्धन करुन जैव विविधतेचे जतन केल्याने या पक्ष्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.यामुळे पक्षी प्रेमींना सुखद धक्का मिळाला. जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला वाव मिळण्यास मदत झाली आहे. जिल्हा प्रशासन आणि सेवा संस्थेच्या मदतीने मागील पाच सहा वर्षांपासून सारस संवर्धनासाठी प्रयत्न केले जात आहे. यामुळे सारस पक्ष्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.सारसांचा जिल्हा अशी नवी ओळख जिल्ह्याची निर्माण होत आहे. सारस पक्षी पाहण्यासाठी राज्यातीलच नव्हे तर राज्याबाहेरील पर्यटक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात येतात. जिल्ह्यातील जलाशयांचे पर्यावरण टिकविण्यासाठी स्वयंसेवकांची धडपड सुरू आहे. त्यातून परसवाडा व लोहारा अशी दोन उत्कृष्ट जलोद्याने तयार झाली आहेत. हिवाळ्यात परदेशी पक्ष्यांना अनुकुल वातावरण व त्यांच्या आवडीचे सेंद्रीय खाद्य जलाशयांमध्ये मिळत असल्याने परदेशी पक्ष्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.परसवाडा आणि लोहारा या दोन तलावांकरीता सामाजिक वनिकरण,जैवविविधता विभाग, वनविभाग, वन व्यवस्थापन समित्या व गावकऱ्यांचे सहकार्य मिळत असल्याने पक्ष्यांचे संवर्धन करण्यास मदत होत आहे.घरांच्या भिंतीवर पक्ष्यांचे चित्रपक्ष्यांच्या संवर्धनासाठी गावकऱ्यांमध्ये जनजागृती व्हावी. विविध पक्ष्यांची माहिती पर्यावरण प्रेमी आणि गावकºयांना मिळावी, पर्यटन विकासाला चालना मिळावी. यासाठी लोहारा व परसवाडा या दोन्ही गावातील गावकऱ्यांनी त्यांच्या घरांच्या भिंतीवर पक्ष्यांची चित्र काढली आहेत.सेवा संस्थेचे प्रयत्नसारस तसेच इतर पक्ष्यांच्या संवर्धनासाठी सावन बहेकार, चेतन जसानी, मुनेश गौतम, अभिजीत परिहार, अंकीत ठाकूर, शशांक लाडेकर, कन्हैया उदापुरे, दुष्यंत आकरे आदी सेवा संस्थेची चमू कार्यरत आहेत.या पाहुण्यांच्या संख्येत झाली वाढग्रेल लेक गुंज, कॉमन पोर्चाड, श्वालेर, लेसर विसलिंग डक, कुडस, विजन, गार्गनी, युरोप, आशिया, जपान व चिन देशात आढळणारे कॉमन टिल, युरोप, आशिया व अमेरिकेत आढळणारे पिंटेल, टपटेल, पोचार्ड, लिटल ग्रेब, वुडसँड , ग्रे हेरान, कोम्बच डक (नाकेर) आदी विविध प्रजातींचे पक्ष्यांच्या संख्येत यंदा वाढ झाली.जलाशयांच्या परिसरात सेंद्रीय शेतीपरसवाडा आणि लोहारा या जलाशयाच्या आजूबाजूला असणाऱ्या शेतांमध्ये रासायनिक खते आणि रासायनिक औषधांची फवारणी न करण्याचा व पूर्णपणे सेंद्रीय शेती या भागातील शेतकऱ्यांनी केली. यामुळे जलाशयांमधील जैवविविधता टिकवून ठेवण्यास मदत झाली. सेंद्रीय धान्य हे पक्ष्यांचे आवडते खाद्य असल्याने यंदा मागील वर्षीच्या तुलनेत या परिसरात विदेशी पक्ष्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्याला सेवा संस्था व गावकऱ्यांनी सुध्दा दुजोरा दिला.ग्रामस्थांना विश्वासात घेऊन त्यांच्या सहकार्याने काम सुरु केले. या दोन्ही गावातील भिंतीवर चित्रकलेच्या माध्यमातून जनजागृतीचा प्रयत्न केला. याचेच फलीत म्हणजे या दोन्ही जलाशयांच्या परिसरात परदेशी पक्ष्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.सावन बहेकार, अध्यक्ष, सेवा संस्थाजिल्ह्यातील पर्यटन विकासाला चालना मिळावी आणि स्थानिकांना रोजगार मिळावा परिसरातील जैवविविधतेचे संवर्धन व्हावे यासाठी वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहे.- रमेश नागरिकर, अध्यक्ष वन व्यवस्थापन समिती.