शहरं
Join us  
Trending Stories
1
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
2
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
3
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
4
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
5
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
6
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
7
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
8
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
9
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
10
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
11
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
12
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
13
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
14
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
15
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
16
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
17
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
18
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
19
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
20
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी

एनआरएचएम कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 9:59 PM

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राष्ट्रीय आरोग्य अभियानात कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांनी १० एप्रिलपासून अकराऐवजी सहा महिन्यांच्या पुर्ननियुक्ती आदेश देण्याच्या निर्णया विरोधात कामबंद आंदोलन सुरू केले आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याची भूमिका कर्मचाºयांनी घेतली आहे. बुधवारपासून (दि.११) हे कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले असून सोमवारी (दि.१६) आंदोलनाचा सहावा दिवस होता.राष्ट्रीय ...

ठळक मुद्देआरोग्य सेवेवर परिणाम : कंत्राटी कर्मचारी १२ वर्षांपासून वनवासातच

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राष्ट्रीय आरोग्य अभियानात कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांनी १० एप्रिलपासून अकराऐवजी सहा महिन्यांच्या पुर्ननियुक्ती आदेश देण्याच्या निर्णया विरोधात कामबंद आंदोलन सुरू केले आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याची भूमिका कर्मचाºयांनी घेतली आहे. बुधवारपासून (दि.११) हे कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले असून सोमवारी (दि.१६) आंदोलनाचा सहावा दिवस होता.राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी महासंघाच्या नेतृत्वात करण्यात येत असलेल्या आंदोलनात जिल्हाभरातील कर्मचारी सहभागी झाल्याने त्याचा आरोग्य सेवेवर परिणाम पडत आहे. आरोग्य सेवा व संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्तांनी राज्यातील अधिकारी कर्मचाºयांना पुढील पुर्ननियुक्तीचे आदेश केवळ सहा महिन्यांचे देण्यात यावे. तसेच पुर्ननियुक्ती आदेश देण्याकरिता कामावर आधारीत गुणानुक्रमाचा वापर करण्यात यावा, असे आदेश दिले आहे. हा प्रकार अनेक वर्षांपासून सेवा देणाºया राष्ट्रीय आरोग्य अभियानातील अधिकारी कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारा आहे. त्यामुळे बुधवारपासून (दि.११) जिल्हा शाखेच्यावतीने जिल्हा परिषदेसमोर धरणे देऊन कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे.जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे ६९१ कंत्राटी कर्मचारी असून हे सगळे अधिकारी-कर्मचारी आपल्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात संघटीत होऊन आंदोलनात सहभागी झाले आहेत.आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष सुनिल तरोणे, अर्चना वानखेडे, संकेत मोरघरे, संजय दोनोडे, सपना खंडाईत, डॉ. मीना वट्टी, सारनाथ बोरकर, अजित सिंग, ग्रीस्मा वाहने, प्रतिमा मेश्राम, संजय मेंढे, अ‍ॅड. रेखा कानतोडे, प्रणीता भोयर, ठनेंद्रसिंग येडे, संतोष डिब्बे, अर्चना चौधरी, राखी प्रसाद, रेखा पुराम, अर्चना कांबळे, प्रदीप रहांगडाले, ललीता गौतम, उषा जगताप, निशांत बन्सोड, अनिरूध्द शर्मा, अनिल रहमतकर, प्रकाश थोरात, पंकज रहांगडाले, निश माखीजा, मनिष मदने, सतीश माटे, मनोज सातपुते, अविनाश व्हराडे, विद्या रहांगडाले, माया नागपुरे, हर्षल अंबुले, गुणवंता कटरे यांचा समावेश आहे.