शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
Top Marathi News Live: ही माझी शेवटची सभा, आता ४ मे नंतर शपथविधी सोहळ्याला येईन: PM मोदी
3
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
4
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
5
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
6
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
7
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
8
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
9
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
10
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
11
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
12
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
13
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
14
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
15
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
16
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
17
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
18
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
19
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
Daily Top 2Weekly Top 5

आता जिल्ह्याच्या सीमेवर गुरुजींचा पहारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 05:00 IST

मुक्तपणे संचार करणाºया मानवाला चार भिंतीच्या आत स्वत:ला बंद करुन घ्यावे लागत आहे. तर शाळांमध्ये विद्यार्थ्यांना ज्ञानरुपी अमृत देऊन त्यांचे उज्वल भविष्य घडविणाºया शिक्षकांना कधी पहारा देण्याची वेळ येणार असे भविष्य कदाचित कुणीही केले नसेल. मात्र कोरोनामुळे ही वेळ आणली आहे. सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव असून लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू केली आहे.

ठळक मुद्देनागरिकांच्या सुरक्षेची जवाबदारी । कोरोना योद्धा म्हणून नियुक्ती

राजीव फुंडे।लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : ज्ञानाच्या मंदिरात उद्याचे उज्वल भविष्य आणि विद्यार्थी घडविण्याचे काम शिक्षक करीत असतात. मात्र आता या शिक्षकांवर उज्वल भविष्य घडविण्यासह देशातील नागरिकांची सुरक्षा करण्याची सुध्दा जबाबदारी सोपविण्यात आली आहे. जिल्हा सीमेला लागून असलेल्या मध्यप्रदेश राज्याच्या सीमेवर पोलीस, वैद्यकीय अधिकाऱ्यांसह आता शिक्षकांची सुध्दा कोरोना योध्दा म्हणून रात्र पाळीत नियुक्ती केली आहे. त्यामुळे आता जिल्ह्याच्या सीमेवर गुरूजींचा पहारा असल्याचे चित्र आहे.कोरोनाने अख्या जगाचे चित्र बदलून टाकले आहे. कोरोनामुळे अनेक गोष्टी प्रथमच जगात घडत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. कोरोनामुळेच माणसा माणसामध्ये फिजिकल डिस्टन्सिंग ठेवण्याची वेळ आली आहे.मुक्तपणे संचार करणाºया मानवाला चार भिंतीच्या आत स्वत:ला बंद करुन घ्यावे लागत आहे. तर शाळांमध्ये विद्यार्थ्यांना ज्ञानरुपी अमृत देऊन त्यांचे उज्वल भविष्य घडविणाºया शिक्षकांना कधी पहारा देण्याची वेळ येणार असे भविष्य कदाचित कुणीही केले नसेल. मात्र कोरोनामुळे ही वेळ आणली आहे. सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव असून लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू केली आहे.गोंदिया जिल्ह्यात एकही कोरोना बाधीत रुग्ण नसल्याने जिल्हा ग्रीन झोनमध्ये आहे. त्यामुळे शेवटपर्यंत जिल्हा ग्रीन झोनमध्येच राहावा, जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होवू नये यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहे.आमगाव तालुक्याला मध्यप्रदेश राज्याची सीमा लागून आहे. त्यामुळे मध्यप्रदेशातून जिल्ह्यात ये-जा करणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी सीमेवर पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. तसेच या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी आणि जि.प.शाळेतील शिक्षकांची कोरोना योध्दा म्हणून रात्रीच्या वेळेस या ठिकाणी नियुक्ती केली आहे. यासाठी आमगाव तालुक्यातील ५० शिक्षकांची निवड करण्यात आली असल्याची माहिती आहे.दररोज चार ते पाच शिक्षकांची नियुक्ती मध्यप्रदेशच्या सीमेवर येते. शिक्षकांवर ये-जा करणाºया प्रवासी आणि वाहनांची नोंद करण्याचे काम सोपविण्यात आले आहे. तालुक्यातील लांजी मार्गावर आणि मुंडीपार सालेकसा मार्गालगत एक कक्ष देखील तयार करण्यात आले आहे. या ठिकाणी सुध्दा शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने शिक्षकांवर सोपविलेली जवाबदारी ते तेवढ्याच प्रामाणिकपणे कुठलाही संकोच न बाळगता पूर्ण करीत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याTeacherशिक्षक