कपिल केकत ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : डास व कीटकांच्या प्रकोपावर तोडगा म्हणून फवारणीसाठी लागणारे कीटकनाशक आजघडीला पालिकेकडे नाही. यासाठी पालिकेने यापूर्वी तीन वेळा निविदा काढल्या. मात्र त्यांना प्रतिसाद न मिळाल्याने कीटकनाशक खरेदी करता आले नाही. यामुळे पालिकेने आता कीटकनाशकांसाठी चौथी निविदा काढली आहे. येत्या १२ तारखेला ही निविदा उघडली जाणार असल्याची माहिती आहे.पावसाळा म्हणजे आजारांचा काळच म्हटले जाते. पावसाळ्यात पाणी व डासजन्य आजारांचा प्रकोप फोफावतो. विशेष म्हणजे, शहरात या दोन्ही घटकांच्या प्रकोपापासून बचावाची उपाययोजना पालिकेकडे नाही. पावसाळा लोटून पालिकेने शहरातील विहिरीत ब्लीचींग पावडर टाकले नव्हते व आता ते काम सुरू आहे. तसेच शहरात डासांचा प्रकोप फोफावला असताना पालिकेच्या स्वच्छता विभागाकडे फवारणीसाठी कीटकनाशक नसल्याची माहिती आहे.प्राप्त माहितीनुसार, कीटकनाशक खरेदीसाठी स्वच्छता विभागाने तीन निविदा काढल्या आहेत. मात्र त्यांना पुरवठादारांकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे या तीनही निविदा फिस्कटल्या. विशेष म्हणजे, हिवताप विभागाकडून पालिकेच्या स्वच्छता विभागाला आतापर्यंत कीटकनाशक द्रव्य दिले जात होते. त्यांच्याकडून मिळत असलेल्या कीटकनाशकावर स्वच्छता विभाग भागवत होते. यंदा मात्र हिवताप विभागालाच कमी प्रमाणात पुरवठा झाल्याने त्यांच्याकडून पालिकेला कीटकनाशक मिळाले नाही.शहरात सध्या डासांचा प्रकोप फोफावला आहे. अशात डासजन्य आजार पसरण्यापूर्वीच नगर परिषदेने यावर तोडगा म्हणून लगेच उपाययोजना करणे गरजेचे आहे. मात्र नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाकडे कीटकनाशक नसल्याने ते ही गप्प बसले आहेत. तसेच यावर काही तरी करायचे म्हणून आता कीटकनाशक खरेदीसाठी चौथी निविदा काढली आहे. तीन निविदांना तर काहीच प्रतिसाद मिळालेला नाही. आता चौथी निविदा काढताना काही पुरवठादारांशी संपर्क साधला जात असल्याचीही माहिती आहे.काही दिवसांपूर्वी जवळील ग्राम मुर्री येथे डेंग्यूचा रूग्ण आढळल्याने हिवताप विभागाने लगेच तेथे उपाययोजना सुरू केल्या. गोंदिया शहर हिवताप विभागाच्या कार्यक्षेत्रात येत नसल्याने ते यावर काहीच करू शकत नाही. असे असताना नगर परिषदेने आतापर्यंत काही तरी उपाययोजना करणे अपेक्षित होते. मात्र आतापर्यंत काहीच करण्यात आले नाही.कीटकनाशक खरेदी पावसाळ्यापूर्वीच करून ठेवणे अपेक्षीत आहे. नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाला मात्र आता जाग येत आहे. त्यातही पुरवठादारांकडून प्रतिसाद येत नसल्याने कोटेशन मागवून कीटकनाशक खरेदीची तयारी सुरू असल्याची माहिती आहे.सेवानिवृत्त कर्मचाºयांची मदतकीटकनाशक खरेदीसाठी निविदा प्रक्रिया करावी लागत असून ही प्रक्रिया कशी करायची यासाठी स्वच्छता विभागाकडून सेवानिवृत्त आरोग्य निरीक्षक मनकवडे यांची मदत घेतली जात असल्याचीही माहिती आहे. मनकवडे यांनी त्यांच्या कार्यकाळात कसे काय केले याबाबत त्यांनी येऊन समजावून सांगीतले. यातून स्वच्छता विभागाच्या कार्यप्रणालीचे खरे रूप समोर येते.ब्लिचिंग पावडरचा वापरशहरातील विहिरीत ब्लिचिंग पावडर टाकण्याचे काम आता पावसाळा लोटल्यानंतर पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून केले जात आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी विहिरींत ब्लिचिंग पावडर टाकणे गरजेचे आहे. मात्र पाणी पुरवठा विभागाने ब्लिचिंग पावडर खरेदी न केल्याने पावसाळा असाच गेला. आता दोन आठवड्यांपूर्वी सात बॅग पावडर खरेदी करून टाकण्याचे काम सुरू असल्याचे पाणी पुरवठा विभागाकडून कळले. यातून किती लेटलतीफ काम सुरू आहे हे दिसते.आपल्याकडे मागील वर्षीचा काही साठा शिल्लक आहे. निविदाही काढली जाणार आहे किंवा तात्पुरती व्यवस्था म्हणून कोटेशन मागवून कीटकनाशक खरेदी करू.- चंदन पाटीलमुख्याधिकारी, नगर परिषद, गोंदिया
आता काढली चौथी निविदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 23:10 IST
डास व कीटकांच्या प्रकोपावर तोडगा म्हणून फवारणीसाठी लागणारे कीटकनाशक आजघडीला पालिकेकडे नाही.
आता काढली चौथी निविदा
ठळक मुद्देपालिकेकडे कीटकनाशक नाही : निविदांना पुरवठादारांकडून प्रतिसादही नाही