लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा प्रशासनाने मुंबई, पुणे, राजस्थान, दिल्ली या ठिकाणाहून येणाऱ्या व्यक्तींची स्क्रीनिंग करण्यासाठी गोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालयात आयसोलेशन वॉर्ड तयार आहे. परंतु या वॉर्डात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना त्यांच्या परिस्थिीतीवर सोडून देण्यात आले.आयसोलेशन वॉर्डात १२ मार्चला ४, १८ ला ३, १९ ला १६, २० ला २, २१ ला १४, २२ ला ६७, २३ ला ७१, २४ मार्चला ५१ जणांची तपासणी करण्यात आली. २० मार्चला २ रूग्णांना या वॉर्डात दाखल करण्यात आले. २१ मार्चला त्यांना सुट्टी देण्यात आली. २२ मार्चला एकाला दाखल करण्यात आले. त्याचा तपासणी अहवाल अद्याप आला नाही. या लोकांची तपासणी करण्यासाठी डॉक्टर, परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. परंतु त्यांच्यासाठी कसलीही व्यवस्था नाही. मागील तीन-चार महिन्यापासून कर्मचाऱ्यांना वेतनही मिळाले नाही. आयसोलेशन वॉर्डात वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी ड्रेस कोर्ड, मास्क, सॅनिटायझरची सोय करणे आवश्यक आहे. काही मास्क पाठविण्यात आले होते. परंतु उंटाच्या तोंडात जिरा अशी स्थिती होती. येथे आतापर्यंत सॅनिटायझर व्यवस्था झाली नाही.एचआयव्ही किट, हॅडग्लोग्ज, किंमती औषधी उपलब्ध नाहीत.जिल्हाधिकारी व आपत्ती व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष डॉ.कादंबरी बलकवडे यांना आरोग्य विभागाला आयसोलेशन वार्डाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड व एचआयव्ही किटचे फोटो काढून पाठविण्यात आले. त्यावर फक्त दोन किट्स उपलब्ध करुन देण्यात आले.
आयसोलेशन वॉर्डातील कर्मचाऱ्यांना ना मास्क; ना सॅनिटायझर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 06:00 IST
आयसोलेशन वॉर्डात १२ मार्चला ४, १८ ला ३, १९ ला १६, २० ला २, २१ ला १४, २२ ला ६७, २३ ला ७१, २४ मार्चला ५१ जणांची तपासणी करण्यात आली. २० मार्चला २ रूग्णांना या वॉर्डात दाखल करण्यात आले. २१ मार्चला त्यांना सुट्टी देण्यात आली. २२ मार्चला एकाला दाखल करण्यात आले. त्याचा तपासणी अहवाल अद्याप आला नाही. या लोकांची तपासणी करण्यासाठी डॉक्टर, परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.
आयसोलेशन वॉर्डातील कर्मचाऱ्यांना ना मास्क; ना सॅनिटायझर
ठळक मुद्देवाढताहेत संशयित: कर्मचाऱ्यांची काळजी प्रशासन घेणार का?