शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

अहंकार आणि मग्रूरीमुळेच नाना पटोलेंच्या राजकारणाचा अंत - नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2018 22:40 IST

अहंकार व मंग्रूरीमुळेच नाना पटोले यांच्या राजकारणाचा अंत होणार असून प्रफुल पटेल यांना पराजित करण्यासाठी भाजपात आलेले पटोले आता पटेलांचा झेंडा घेऊन लोकांकडे जात आहेत, अशी टीका केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज मंत्री नितीन गडकरी यांनी केली.

 गोंदिया - अहंकार व मंग्रूरीमुळेच नाना पटोले यांच्या राजकारणाचा अंत होणार असून प्रफुल पटेल यांना पराजित करण्यासाठी भाजपात आलेले पटोले आता पटेलांचा झेंडा घेऊन लोकांकडे जात आहेत, अशी टीका केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज मंत्री नितीन गडकरी यांनी केली.गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी येथे भाजपा उमेदवार हेमंत (तानूभाऊ) पटले यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीरसभेत ते बोलत होते. याप्रसंगी राज्याचे समाजिक न्याय मंत्री व पालकमंत्री राजकुमार बड़ोले,राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे,आ. संजय पुराम, माजी खासदार खुशाल बोपचे,माजी आ. केशवराव मानकर, माजी आमदार खोमेश रहांगडाले,विनोद अग्रवाल, रचना गहाने, अल्ताफ हामिद, भावना कदम, अरविंद शिवणकर,गिरधर हत्तीमारे, वीरेंद्र अंजनकर, विजय बिसेन, उमाकांत ढेगे व अनेक मान्यवर उपस्थित होते.आपल्यामुळेच भंडारा गोंदियात भाजप टिकून आहे, असा नाना पटोलेचा समज होता. पण ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे. कुणाच्या मालकीची नाही. कार्यकर्तेच या पक्षाचे मालक आहेत, असे सांगून गडकरी म्हणाले- प्रतिकूल परिस्थितीत कार्यकर्त्यांनी अपमान, पराभव सहन केला. श्यामबापू कापगते, लक्ष्मणराव मानकर, यांच्यासारख्या कार्यकर्त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत या भागात पक्ष वाढवला. जनसंघाच्या काळात दिवा तेवत ठेवला. त्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर उभी झालेली पार्टी आहे. विचारधारेवर चालणारी ही पार्टी असल्याचेही गडकरी म्हणाले.भय, भूक, आतंक आणि बेरोजगारी या देशाच्या समस्या आहे. या समस्या आपल्याला सोडवायच्या आहेत.  60 वर्षे काँग्रेसने या देशावर राज्य केले. पण या समस्या कायम ठेवल्या. स्वत:चा मात्र काँग्रेस नेत्यांनी विकास करून घेतल्याची टीका करताना गडकरी म्हणाले- राहुल गांधी पंतप्रधान मोदींनी हिशेब विचारतात. पण आम्ही फक्त 4 वर्षापासून आहोत. 60 वर्षे या देशावर ज्यांनी राज्य केले, त्यांनी आधी हिशेब द्यावा असे सांगताना गडकरी म्हणाले- शेतीत परिवर्तन झाले तर देशात परिवर्तन होणार आहे. शेतकर्‍याचा विकास करण्यास मोदी सरकारचे प्राधान्य आहे. तसेच भंडारा गोंदिया याभागातील रस्ते आणि पुलाच्या कामांसाठी 8 हजार कोटी रुपये आपण दिले असून येत्या 3 महिन्यात 90 टक्के कामे सुरु होतील, असे गडकरी यांनी यांनी सांगितले.  सामाजिक न्याय मंत्री राजकुुमार बडोले यांनी विकासाची नवीन पहाट राज्य आणि केंद्र शासनामुळे या राज्यात सुरु झाली आहे. शेतकर्‍यांचा विकास व सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन हेच आमचे ध्येय असल्याचेही बडोले म्हणाले.

टॅग्स :Nitin Gadakriनितिन गडकरीPoliticsराजकारणNana Patoleनाना पटोलेBJPभाजपा