शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
3
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
4
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
5
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
6
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
7
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
8
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
9
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
10
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
11
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
12
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
13
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
14
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

आत्मसमर्र्पित नक्षलवाद्यांचा नऊ गुन्ह्यांत समावेश

By admin | Updated: December 18, 2014 22:57 IST

गोंदिया जिल्हा पोलिसांसमोर तीन जहाल नक्षलवादी आत्मसमर्पीत झाले. त्यातील एकाचा तीन गुन्ह्यात समावेश होता. तर दुसऱ्याचा चार गुन्ह्यात समावेश आहे. तिसऱ्याचा एका गुन्ह्यात समावेश

गोंदिया : गोंदिया जिल्हा पोलिसांसमोर तीन जहाल नक्षलवादी आत्मसमर्पीत झाले. त्यातील एकाचा तीन गुन्ह्यात समावेश होता. तर दुसऱ्याचा चार गुन्ह्यात समावेश आहे. तिसऱ्याचा एका गुन्ह्यात समावेश असल्याची माहिती पोलीस अधिक्षक शशीकुमार मीना यांनी आयोजित पत्रपरिषदेत दिली.गोंदिया जिल्हा पोलिसांसमोर बुधवारी तीन नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. आत्मसमर्पण करणाऱ्या जल्हेर उर्फ दलसूराम परसराम कचलाम (२१) रा. नवेझरी ता. कोरची जि. गडचिरोली याच्यावर नऊ गुन्हे दाखल आहेत. तो दरेकसा, देवरी, कोरची, कुरखेडा-खोब्रामेंढा (केकेके), प्लाटून-५५ चा प्लाटून दलम सदस्य होता. त्याने सन २०१० मध्ये चिचगड पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मगरडोह ते पालांदूर दरम्यान रस्त्यावर भुसुरूंग स्फोट केला होता. सन २०११ रोजी चिचगड पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पिपरखारी ते सुकळी रस्त्यावर रोड रोलर जाळला होता. सन २०११ मध्ये चिचगड पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील मिसपीरी ग्राम पंचायत जाळली होती. सन २०१२ रोजी दरेकसा (जमाकुडो) येथील बीएसएनएलचे टॉवर जाळले होते. सन२०१२ मध्ये सालेकसा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टोयागोंदी ग्रामपंचायत जाळली होती.सन २०१३ मध्ये नवाटोला ते मरारटोला येथे चकमकीत सहभाग होता. सन २०१२ मध्ये गडचिरोली जिल्ह्याच्या खोब्रामेंढा चकमकीत सहभाग होता. सन २०११ मध्ये गडचिरोली जिल्ह्याच्या लेकुरवाडी येथे पोलीस खबऱ्याची हत्या केली होती. सन २०१२ मध्ये छत्तीसगडच्या राजनांदगाव जिल्ह्यातील बरनाला येथील चकमकीत समावेश होता.ऋषी उर्फ सुखलाल तुळशीराम परसो (२०) रा. मयालघाट ता. कोरची जि. गडचिरोली याचा चार गुन्ह्यात समावेश होता. सन २००४ मध्ये छत्तीशसगडच्या राजनांदगाव जिल्ह्यातील डोंगरगड येथे भूसुरूंगस्फोट घडवून आणला होता. सन २००४ मध्ये डोंगरगड येथील एका पोलीस खबऱ्याची हत्या केली होती. सन २००४ मध्ये गडचिरोली जिल्ह्याच्या नाडेकल येथे झालेल्या चकमकीत त्याचा समावेश होता. सन २००६ मध्ये सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या चांदसुरज येथील पोलीस नक्षल चकमकीत त्याचा समावेश होता.काशीराम एैतु कोरेटी (२८) रा. तिरखुरी ता. अर्जुनी/मोरगाव जि. गोंदिया याचा गडचिरोली जिल्हञयजाच्या लेकुरबोडी येथील कारवाईत समाविष्ट असल्याची माहिती देण्यात आली आहे.आत्मसर्मपणासाठी शासनाने सुधारित तरतूद केली आहे. त्यानुसार दीड लाखापासून २० लाखांपर्यंतची मदत त्यांना देण्यात येत आहे. पती-पत्नी सोबत आत्मसमर्पण केल्यास १ लाख ५० हजार रूपये, गटाने हत्यारासह आत्मसमर्पण केल्यास १० लाख रूपये बक्षीस देऊन त्यांचे १०० टक्के पुनर्वसन, मागणी केल्यास कौशल्य प्रशिक्षण, सवयंरोजगारासाठी १०० टक्के अनुदानाने व्यवसायानुसार आर्थिक मदत, घर अथवा घरासाठी भूखंड व घरबांधणीसाठी आर्थिक सहाय्य, आत्मसर्मपीत नक्षलवाद्यांच्या मुला-मुलींना पहिली ते बारावीचे पर्यंतच्या सर्व शासकीय योजनांचा लाभ, केंद्र व राज्य सरकारच्या कार्यान्वीत योजनांतर्गत आत्मसमर्पीतांना सर्व प्रकारची मदत, त्यांना ओळखीसाठी आधार कार्ड, बँक खाते, रेशन कार्ड, मतदान कार्ड, गॅस कनेक्शन देण्यात येते. नक्षल चळवळीत ज्या नक्षलवाद्यांची सक्तीची नसबंदी केली असल्यास त्यांची इच्छा असल्यास त्या नसबंदीची रिओपनिंग केली जाते, अशी माहिती पोलीस अधीक्षक शशीकुमार मीना यांनी दिली आहे. (तालुका प्रतिनिधी)