शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
4
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
5
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
6
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
7
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
8
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
9
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
10
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
11
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
12
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
13
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
14
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
15
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
16
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
17
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
18
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
19
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
20
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...

शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादीचे रास्ता रोकाे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2022 05:00 IST

आधी शेतीमालाला हमीभाव न देणे आणि आता खरेदीला मर्यादा घालून केंद्र सरकार शेेतकऱ्यांची गळचेपी करून रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न करीत आहे. केंद्रातील मोदी  सरकार हे शेतकरीविरोधी असल्याचा आरोप केला. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरच्या किमतीत सातत्याने वाढ करून केंद्र  सरकारने महागाईत भर टाकली असून गोरगरीब व सर्वसामान्यांचे जगणे कठीण बनले आहे. तसेच खते आणि बियाणांच्या वाढत्या किमतीमुळे शेती करायची कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसडक अर्जुनी : गोंदिया जिल्ह्यात  धानाचे सर्वाधिक उत्पादन घेतले जात असून यंदा रब्बी हंगामात धानाचे विक्रमी उत्पादन झाले आहे. मात्र केंद्र सरकारने जिल्ह्यासाठी धान खरेदीची मर्यादा ही ४ लाख ७९ हजार क्विंटल ठरवून दिली आहे. त्यामुळे २४ लाख क्विंटल धान विकायचा कुठे, असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला. धान खरेदीची मर्यादा ३० लाख क्विंटलपर्यंत वाढवून देण्यात यावी, या मागणीला घेऊन सडक-अर्जुनी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने शुक्रवारी (दि. २०) सकाळी १० वाजता गोंदिया-रायपूर मार्गावरील कोहमारा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. कोहमारा येथील टी पाॅईंट चौकात रास्ता रोको आंदोलन केल्यानंतर सडक अर्जुनी येथील तहसील कार्यालयावर आ. मनोहर चंद्रिकापुरे, माजी आ. राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर, अविनाश काशीवार यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात  आला. यावेळी मोर्च्यात सहभागी कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली. आधी शेतीमालाला हमीभाव न देणे आणि आता खरेदीला मर्यादा घालून केंद्र सरकार शेेतकऱ्यांची गळचेपी करून रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न करीत आहे. केंद्रातील मोदी  सरकार हे शेतकरीविरोधी असल्याचा आरोप केला. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरच्या किमतीत सातत्याने वाढ करून केंद्र  सरकारने महागाईत भर टाकली असून गोरगरीब व सर्वसामान्यांचे जगणे कठीण बनले आहे. तसेच खते आणि बियाणांच्या वाढत्या किमतीमुळे शेती करायची कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने रब्बीतील धान खरेदीची मर्यादा त्वरित वाढवून द्यावी व पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरच्या किमती आटोक्यात आणाव्यात, या मागणीचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानावाने तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी जि. प. उपाध्यक्ष यशवंत गणविर, जि. प. सदस्या सुधा रहांगडाले,  डी. यू. रहांगडाले, तेजराम मडावी, रुकीराम वाढई, रमेश चुऱ्हे, अजय लांजेवार,  राहुल यावलकर, आशिष येरणे, कामिनी कोवे, दिलीप कापगते, शिवाजी गहाणे, लक्ष्मणराव चंद्रिकापुरे, आनंद अग्रवाल, पुष्पमाला बडोले, शुभांगी वाढवे, मंजू डोंगरवार, एफ.आर.टी. शहा, अनिता बांबोडे, ईश्वर कोरे, दिनेश कोरे उपस्थित होते.

या होत्या प्रमुख मागण्या... - केंद्र सरकारने धान खरेदीची मर्यादा वाढवून ३० लाख क्विंटल करावी, - मागीलवर्षीच्या तुलनेत वाढलेले खताचे दर कमी करावेत.- पेट्रोल, डिझेल व गॅस सिलिंडरचे दर त्वरित कमी करावेत.

केंद्रातील माेदी सरकार एकीकडे शेतकरीहितैशी असल्याचे भासवित असून दुसरीकडे धान खरेदीला मर्यादा लावून आणि खते, बियाणांचे दर वाढवून त्यांच्या जखमांवर मीठ चोळत आहे. पण केंद्र सरकारचा खरा चेहरा समोर आला आहे.- राजेंद्र जैन, माजी आमदारकेंद्र सरकारने रब्बीसाठी ठरवून दिलेली धान खरेदीची मर्यादा त्वरित ३० लाख क्विंटल करून द्यावी, अन्यथा यासाठी शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरून अधिक तीव्र आंदोलन करू.- मनोहर चंद्रिकापुरे, आमदार

 

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपNCPराष्ट्रवादी काँग्रेस