शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
2
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
3
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
4
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
5
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
6
भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
7
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
8
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
9
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
10
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
11
काैटुंबिक कलहातून होतेय कोवळ्या मुलांची हाेरपळ; बदलापुरात मुलीचे अपहरण; मुंब्य्रात आईच बनली क्रूर
12
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?
13
दोस्त दोस्त ना रहा..!   भांडणातून घेतला जीव 
14
तरुणांभोवती ऑनलाइन गेमचा फास; टार्गेट पूर्ण न झाल्याने दाेघांची आत्महत्या
15
खासदारांना 'हेल्दी मेन्यू'द्वारे मिळणार 'ताकद'!
16
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
17
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
18
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
19
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
20
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 

गोंदिया जिल्हा बँकेची निवडणूक राकाँ-भाजप लढविणार एकत्र !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 17:09 IST

पॅनल संयोजकांची निवड : दोन्ही पक्षाचे नेते ठरविणार रणनिती

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदियाः गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक तब्बल १३ वर्षानी होत आहे. सहकार विभागाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. एकूण २० संचालक पदासाठी ही निवडणूक होत आहे. ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजप एकत्रितपणे पॅनल तयार करून लढविणार आहेत. बुधवारी (दि.२८) दोन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत यावर शिक्का मोर्तब करण्यात आले आहे. तर ही निवडणूक दोन पॅनलमध्ये होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जिल्हा बँकेची निवडणूक गेल्या १३ वर्षांपासून काही तांत्रिक अडचणी व न्यायालयीन प्रक्रियेमुळे रखडली होती. दोन महिन्यापूर्वीच उच्च न्यायालयाने यावर सुनावणी करीत सहा महिन्याच्या आत बँकेची निवडणूक घेण्याचे निर्देश शासन व सहकार विभागाला दिले. त्यानंतर सहकार विभागाने निवडणुकीच्या अनुषंगाने प्रक्रियेला सुरुवात केली. सोमवारी (दि.२६) सहकार विभागाने जिल्हा बँकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. २६ मे पासून या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. २९ जून रोजी मतदान होणार असून ३० जून रोजी मतमोजणी होणार आहे. एकूण २० संचालक पदासाठी ही निवडणूक होत असून एकूण ८९४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जिल्ह्यातील सहकार क्षेत्रावर वर्चस्व ठेवण्यासाठी जिल्हा बँकेवर सत्ता स्थापन करणे हे महत्त्वपूर्ण समजले जाते. गेल्या पंधरा वर्षांपासून या बँकेवर खा. प्रफुल्ल पटेल यांचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे माजी आ. राजेंद्र जैन हे अध्यक्षपदी विराजमान होते. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे.

दोन्ही पक्षाच्या अध्यक्षांनी केली युतीची घोषणागोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा या दोन्ही पक्षाची युती झाली असून या युतीची घोषणा बुधवारी (दि.२८) सायंकाळी भाजपा जिल्हाध्यक्षा सीता रहांगडाले व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमकुमार रहांगडाले यांनी अधिकृतपणे केली. यावेळी आ. विजय रहांगडाले, विनोद अग्रवाल, माजी आमदार राजेंद्र जैन, भेरसिंग नागपुरे, व महासचिव बाळा अंजनकर उपस्थित होते.

कमी मतदार असल्याने निवडणुकीत रंगतजिल्हा बँकेच्या एकूण २० संचालक पदासाठी ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीत एकूण ८९४ मतदार मतदानाचा हक्क बजाविणार आहे. मतदारांची संख्या कमी असल्याने त्यांचे मन वळविण्याचा दोन्ही पॅनलचा प्रयत्न असेल. त्यामुळे या निवडणुकीतील रंगत वाढण्याची शक्यता आहे.

सहकार पॅनल म्हणून लढविणार निवडणूकमहायुतीच्यावतीने सहकार पॅनल या नावानी बँकेची नवडणूक लढविली जाणार असून पॅनलचे संयोजक म्हणून आ. परिणय फुके, विनोद अग्रवाल, विजय रहांगडाले, राजकुमार बडोले, आ. संजय पुराम, माजी आ. राजेंद्र जैन, राहतील अशी घोषणा यावेळी करण्यात आली. यावेळी जि.प.अध्यक्ष लायकराम भेंडारकर, खोमेश रहांगडाले, विजय शिवणकर, झामसिंग येरणे, रचना गहाणे, पंकज रहांगडाले, अॅड. येशुलाल उपराडे उपस्थित होते.

दोन प्रमुख पॅनलमध्येच होणार आता लढतजिल्हा बँकेची निवडणूक ही पक्षाच्या नावाखाली नव्हे तर पॅनल तयार करून लढविली जाते. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपची युती झाल्याने त्यांचे एक पॅनल आणि काँग्रेस व इतर पक्षाचे दुसरे पॅनल राहण्याची शक्यता आहे. या दोन पॅनलमध्येच ही निवडणूक होणार आहे. जिल्ह्यातील सहकार क्षेत्रावर पावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे वर्चस्व आहे. त्यामुळे हे वर्चस्व कायम राहावे असा त्यांचा प्रयत्न असणार आहे.

युतीसाठी तब्बल तीन वेळा झाली नेत्यांची बैठकजिल्हा बँकेची निवडणूक ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने एकत्रितपणे लढावी यासाठी स्थानिक स्तरावरून हालचाली सुरू होत्या. तसेच वरिष्ठांकडून सुद्धा त्यासाठी ग्रीन सिग्नल देखील मिळाला होता. एकूण २० संचालकपदासाठी होत असलेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस १० आणि भाजपचे १० संचालक असा फार्म्युला निश्चित करून ही निवडणूक लढविली जाणार असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे यासाठी तीन वेळा भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक पार पडली. त्यानंतर बुधवारी (दि.२८) सायंकाळी युतीवर शिक्का मोर्तब करण्यात आले.

टॅग्स :gondiya-acगोंदियाbankबँकBJPभाजपा