शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

५३ गावांत नक्षलवाद्यांना बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2022 05:00 IST

गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी व नक्षलग्रस्त अशा ११४ पैकी ५३ गावांत नक्षलवाद्यांना जेवण देणार नाही, त्यांना सहकार्य करणार नाही, असा ठराव ग्रामपंचायतमध्ये पारीत करून तो शासनाला पाठविला आहे. जिल्ह्यातील ५४७ पैकी ११४ गावे नक्षलग्रस्त असल्याची शासन दरबारी नोंद आहेत. या नक्षलग्रस्त गावांतील जनता भयमुक्त राहावी, यासाठी जिल्हा पोलिसांनी सन २००५ पासून आदिवासी जनतेच्या मनात आपल्याविषयी आपुलकी निर्माण करण्याचे कार्य सुरू केले.

नरेश रहिले लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नक्षल चळवळ मोडीत काढणे गावकऱ्यांच्या सहकार्याशिवाय शक्य नाही. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये जनजागृती करीत नक्षलवाद्यांना सहकार्य न करण्याचे धैर्य आणण्यात पोलीस आणि तंटामुक्त गाव समित्यांना यश येत आहे. गोंदिया जिल्ह्यात नक्षलवाद्यांना गावबंदी करण्याऱ्या गावांची संख्या ५३ झाली आहे. आणखी ६१ गावांत अशा पद्धतीची बंदी करण्याचे लक्ष्य पोलिसांनी ठेवले आहे.गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी व नक्षलग्रस्त अशा ११४ पैकी ५३ गावांत नक्षलवाद्यांना जेवण देणार नाही, त्यांना सहकार्य करणार नाही, असा ठराव ग्रामपंचायतमध्ये पारीत करून तो शासनाला पाठविला आहे. जिल्ह्यातील ५४७ पैकी ११४ गावे नक्षलग्रस्त असल्याची शासन दरबारी नोंद आहेत. या नक्षलग्रस्त गावांतील जनता भयमुक्त राहावी, यासाठी जिल्हा पोलिसांनी सन २००५ पासून आदिवासी जनतेच्या मनात आपल्याविषयी आपुलकी निर्माण करण्याचे कार्य सुरू केले. आदिवासी तरुणांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ दिला. व्यायामशाळा उघडल्या. पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण देण्यात आले. नागरिकांना रेशन कार्ड, आधार कार्ड बनवून देणे, संजय गांधी निराधार योजना, वृद्धांना श्रावण बाळ योजनेचा लाभ मिळवून दिला.   सुरुवातीला आदिवासी नागरिक पोलिसांना सहकार्य करीत नव्हते, पण या सर्व सोईसुविधा देण्यात आल्यामुळे आदिवासी नागरिकांमध्ये सकारात्मक भावना निर्माण झाली आणि ते पोलिसांना सहकार्य करू लागले. त्यातच महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेने पोलिसांच्या कार्याला बळ मिळाले. गावागावातील तंटामुक्त समित्यांनी पुढाकार घेऊन पोलिसांच्या प्रत्येक कामात सहकार्य करण्याची भूमिका ठेवली. आदिवासी जनतेच्या मनात कायमचे घर करण्याचे काम जिल्हा पोलिसांनी केले. सन २००५ पासून आजपर्यंत केलेल्या अविरत मेहनतीमुळे जिल्ह्यातील ११४ पैकी ५३ ग्रामपंचायतींनी स्वयंप्रेरणेने नक्षलवाद्यांना आपल्या गावात बंदी करून, विकासात्मक कार्याकडे पाऊल उचलले आहे. आता उर्वरित ६१ गावांत नक्षलवाद्यांना बंदी करण्यासाठी पोलीस विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. 

प्रत्येक गावाला तीन लाख रुपये अनुदानज्या गावांनी नक्षल गावबंदी केली, अशा प्रत्येक गावाला तीन लाख रुपयांचे अनुदान दिले जाते. गोंदिया जिल्ह्यातील ४८ गावांना एक कोटी ४४ लाख देण्यात आले आहेत.  या योजनेतून मिळालेला निधी गावाच्या विकासावर खर्च करण्यात येतो, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. 

 तंटामुक्त मोहीम ठरली दुवा- पूर्वी गावकरी पोलिसांना सहकार्य करीत नसल्यामुळे नक्षलवाद्यांच्या कारवायांत वाढ झाली होती, परंतु महात्मा गांधी तंटामुक्त मोहिमेमुळे नक्षलवाद्यांना जनतेपासून दूर जाण्यास बाध्य करण्यात आले. तंटामुक्त मोहिमेला लोकचळवळीचा आधार मिळाला. परिणामी, आदिवासी जनतेने नक्षलवाद्यांना सहकार्य करणार नाही, असा पवित्रा घेत, चक्क ग्रामसभेत ठराव घेतला. पोलीस व आदिवासी जनतेत समन्वय घडवून आणण्याचे काम महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेने केले. ही मोहीम पोलीस व आदिवासी जनता यांच्यातील दुवा म्हणून पुढे आली आहे.

 

टॅग्स :naxaliteनक्षलवादी