नक्षल व अतिरिक्त घरभाडे भत्ता लवकरच लागू करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2020 05:00 AM2020-10-19T05:00:00+5:302020-10-19T05:00:06+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने शिक्षकांच्या प्रलंबित २५ मागण्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदिप डांगे ...

Naxals and additional housing allowance will be implemented soon | नक्षल व अतिरिक्त घरभाडे भत्ता लवकरच लागू करणार

नक्षल व अतिरिक्त घरभाडे भत्ता लवकरच लागू करणार

googlenewsNext
ठळक मुद्देप्रदिप डांगे : शिक्षक समितीने तक्रार निवारण सभेत घडवून आणली चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने शिक्षकांच्या प्रलंबित २५ मागण्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदिप डांगे यांना दिले निवेदन देवून तक्रार निवारण सभेत चर्चा घडवून आणली. यावेळी नक्षलभत्ता कमालमर्यादेत १५०० रूपये व अतिरिक्त घरभाडे संदर्भातील प्रश्न प्राधान्याने सोडविला जाईल असे आश्वासन डांगे यांनी तक्रार निवारण सभेत दिले.
सभेला नरेश भांडारकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आर. एल.पुराम, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अमृता परदेशी, शिक्षणाधिकारी (प्राथ.) राजकुमार हिवारे, उपशिक्षणाधिकारी (प्राथ.)आर.पी.रामटेके, शिक्षण विस्तार अधिकारी डी.एम.मालाधारी, शिक्षण विभाग अधीक्षक जनबंधू व इतर कर्मचाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत शिक्षक समितीच्यावतीने जिल्हाध्यक्ष मनोज दिक्षित, जिल्हा सरचिटणीस एल.यू.खोब्रागडे, जिल्हा सहसचिव संदिप तिडके, जिल्हा संघटक एन. बी. बिसेन, तालुकाध्यक्ष रोशन म्हस्करे, तालूका संघटक सचिन सांगळे यांनी २५ प्रश्नांवर चर्चा घडवून आणली. यात जीपीएफ-डिसीपीएस मार्च २०२० पर्यंतचा हिशोब मिळणे हा प्रश्न आक्रमक पणे ठेवण्यात आला. यावर डांगे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली व १० जणांचे यूनिट तयार करून कायमस्वरूपी प्रश्न निकाली काढले जाणार असल्याचे सांगीतले.
तसेच सीएमपी वेतनप्रणाली लागू करणे, उच्चश्रेणी मुख्याध्यापक, विषय शिक्षक व शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरण्यात यावी, २ जानेवारी रोजी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ लावणे, विषय शिक्षकांना वेतनश्रेणी लागू करण्यात यावी, १२ वर्षे झालेल्यांना चटोपाध्याय वेतन श्रेणी व २४ वर्षे झालेल्यांना निवड श्रेणी मंजूर करण्यात यावी, उच्च परिक्षेला बसण्याची परवानगी व कार्येत्तर परवानगी आदेश काढण्यात यावे, ४% सादीलवार राशी शाळांना देण्यात यावी, २००९ नंतर नोकरीत लागलेल्या शिक्षकांना सेवेत कायम करण्यात यावे, कोविड-१९ अंतर्गत कामावर असताना मरण पावलेल्या शिक्षकांना विमा संरक्षण लाभ देण्यात यावा, जिल्हा व राज्य आदर्श शिक्षक सेवानिवृत्त झाल्यानंतर वेतन वाढीची राशी वसूल करण्यात येवू नये, ओबीसी-एनटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे (२०१९-२०) कोरोनामुळे राहिलेले प्रस्ताव समाज कल्याण विभागात घेण्यात यावे, पदविधर शिक्षकांच्या वेतनातील तफावत दूर करणे, सेवापूस्तक गहाळ झालेल्या शिक्षकांना नवीन सेवापूस्तक मंजूर करून देणे आदी प्रश्नांवर चर्चा घडविण्यात आली. सर्व प्रश्न काळजीपूर्वक सोडविण्याचे आश्वासन डांगे यांनी दिले.
 

Web Title: Naxals and additional housing allowance will be implemented soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.