शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
4
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
5
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
6
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
7
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
8
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
9
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
10
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
11
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
12
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
13
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
14
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
15
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
16
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
17
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
18
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
19
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!

नक्षलवाद्यांना ४७ गावांत ‘बंदी’

By admin | Updated: December 18, 2014 22:56 IST

जिल्हा नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील आहे. नक्षलवाद्यांचे रेस्ट झोन म्हणून गोंदिया जिल्ह्याची ओळख आहे. मात्र नक्षलवाद्यांच्या आरामाला विराम लावण्याचे काम गोंदिया पोलिसांनी सुरू केले आहे.

चार गावांचे पुन्हा प्रस्ताव : तंटामुक्त मोहीम ठरली आदिवासी व पोलिसांमधील दुवा गोंदिया : जिल्हा नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील आहे. नक्षलवाद्यांचे रेस्ट झोन म्हणून गोंदिया जिल्ह्याची ओळख आहे. मात्र नक्षलवाद्यांच्या आरामाला विराम लावण्याचे काम गोंदिया पोलिसांनी सुरू केले आहे. जिल्ह्यातील १२२ नक्षलग्रस्त गावांपैकी ४७ गावात नक्षलवाद्यांना गावबंदी करण्यात आली आहे. या गावबंदीला महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीमेचे सहकार्य मिळाले आहे. सन २००४ ते आजपर्यंत जिल्ह्यात नक्षलवाद्यांना गावबंदी करण्यासाठी पोलीस विभागाने विशेष मोहीम छेडली. यात सन २००५ यावर्षी नवेगावबांध पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या रामपुरी, पवनी/धाबे, येरंडी/दर्रो, चिचगड पोलीस ठाण्यांतर्गत सुकडी व येडमागोंदी या गावांनी नक्षलवाद्यांना गावबंदी केली. त्यानंतर २००८ मध्ये १३ गावांनी गावबंदीचा प्रस्ताव शासनाला सादर केला. त्यात सालेकसा तालुक्यातील डुंबरटोला, बंजारी, दलदलकुही, टोयागोंदी, डहाराटोला, वारकरीटोला, कोटरा, सिंगाटोला, करणूटोला, नवाटोला, हलबीटोला, कलारटोला ही बारा गावे तर देवरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या शिलापूरने हा प्रस्ताव सादर केला. सन २०११ मध्ये २२ गावांनी प्रस्ताव सादर केला. यात अर्जुनी/मोरगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या नवनीतपुर(भुटाई), डुग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या कोसबी, कोकणा(जमी.), देवरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मकरधोकडा, पदमपूर, शिरपूरबांध, वडेगाव, सालेगाव, खांबतलाव, नवेगावबांध पोलीस ठाण्यांतर्गत धाबेटेकडी, तिडका, देवलगाव, चान्ना/कोडका, कवठा, येरंडी/देव, परसोडी, डोंगरगाव, भिवखिडकी, नवेगावबांध, खोली, पांढरवाणी/माल, पांढरवाणी रैय्यत या गावांनी सादर केला.सन २०१३ मध्ये अर्जुनी/मोरगाव पोलीस ठाण्यांतर्गत कोहलगाव, रांजीटोला, येलोडी, जांभळी, कान्होली, कान्होलीसोनार, जंभारखेडा, येरंडी व माहुली या गावांनी बंदीचे प्रस्ताव शासनाला सादर केले. यापैकी रामपूर, पवनी/धाबे, येरंडी/दर्रो व माहुली अशा चार गावांनी नक्षल गावबंदीने पुन्हा प्रस्ताव सादर केले. (तालुका प्रतिनिधी)३१ गावांना मिळाली मदत नक्षल गावबंदी करणाऱ्या गावांना शासनातर्फे तीन लाख रुपये अनुदान देण्यात येते. जिल्ह्यातील ४७ पैकी ३१ गावांना ३लाख रुपये मंजूर करण्यात आले. यातील सुकडी, येडमागोंदी, डुंबरटोला, बंजारी, दलदलकुही, टोयागोंदी, डहाराटोला, वारकरीटोला, कोटरा, सिंगाटोला, करणूटोला, नवाटोला, हलबीटोला, कलारटोला, शिलापूर या गावांना प्रत्येकी तीन लाख रुपये तर कोसबी, कोकणा/जमी., सिरपूरबांध, वडेगाव, सालेगाव, खांबतलाव, धाबेटेकडी, तिडका, चान्ना/कोडका, कवठा, येरंडी देव, परसोडी, डोंगरगाव, खोली, पांढरवाणी माल, पांढरवाणी रय्यत या गावांना प्रत्येकी अडीच लाख रुपये देण्यात आले असून उर्वरीत ५० हजार रुपये नंतर दिले जाणार आहे. या रकमेतून गावातील विकास कामे ग्रामपंचायत मार्फत करण्यात आली आहे.