लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दोन महिन्याच्या उन्हाळी सुट्यानंतर मंगळवारपासून (दि.२६) जिल्हा परिषद व इतर खासगी शाळा सुरू होणार आहेत. तर काही बालके प्रथम पहिल्या वर्गात जाणार असून त्यांचा व इतर विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविण्यासाठी शाळांमध्ये ढोल ताशांच्या गजरात आणि पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले जाणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्व १०६९ शाळांमध्ये प्रवेशोत्सव व वाचन दिवस उपक्रम राबविण्यात येणार आहे.नवा गणवेश, नवी पुस्तके, बॅग अन् नवे सवंगडी सोबत घेवून शाळेला स्कूल चले हम असे म्हणत शिक्षणाच्या वाटेवरील चिमुकले हसत खेळत मंगळवारपासून शाळेत जाणार आहेत. उन्हाळी सुट्यांचा आनंद घेतल्यानंतर शाळा सुरु होणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आहे.त्यामुळे शाळांमध्ये मंगळवारपासून विद्यार्थ्यांची किलबिलाट ऐकायला मिळणार आहे.नवीन ड्रेस, कंपास पेटी, वह्या, दप्तर आदी घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांनी शहरातील शैक्षणिक साहित्याच्या दुकानात सोमवारी गर्दी केली होती. विद्यार्थ्यांमध्ये पहिल्याच दिवसापासून शाळेबद्दल गोडी निर्माण व्हावी. यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्व १०६९ शाळांमध्ये प्रवेशोत्सव, वाचन दिवस आदी उपक्रम राबविण्यात येणार आहे. तर काही शाळांमध्ये प्रभात फेरी काढण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी. यासाठी काही शाळांनी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी वर्ग खोल्यांची सुध्दा सजावट केली आहे.तर ढोल ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत करुन त्यांच्यामध्ये उत्साह निर्माण केला जाणार आहे. यासाठी शिक्षण विभागाने संर्पूण तयारी केली आहे.पहिल्याच दिवशी पुस्तकांचे वाटपइयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शासनातर्फे मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप केले जाते. जि.प.च्या सर्वच शाळांमधील विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तकांचे वाटप व्हावे यासाठी जि.प.शिक्षण विभागाने सर्व शाळांना पंधरा दिवसांपूर्वीच पुस्तकांचा पुरवठा केला आहे.पालकांची लगबगमंगळवारपासून शाळा सुरू होणार असल्याने मागील तीन-चार दिवसांपासून पालक मंडळी तयारीला लागली आहे. मुलांना शाळेत पाठविण्यापूर्वी पुस्तके, दप्तर तसेच इतर गोष्टींची तयारी केली जात आहे. दोन महिन्याच्या सुटीनंतर शाळा सुरू होत असल्याने बच्चे कंपनीतही उत्साह आहे.
ढोल ताशांच्या गजरात होणार नवगतांचे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 22:19 IST
दोन महिन्याच्या उन्हाळी सुट्यानंतर मंगळवारपासून (दि.२६) जिल्हा परिषद व इतर खासगी शाळा सुरू होणार आहेत. तर काही बालके प्रथम पहिल्या वर्गात जाणार असून त्यांचा व इतर विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविण्यासाठी शाळांमध्ये ढोल ताशांच्या गजरात आणि पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले जाणार आहे.
ढोल ताशांच्या गजरात होणार नवगतांचे स्वागत
ठळक मुद्देशाळांमध्ये आजपासून किलबिलाट : शिक्षण विभागाचा उपक्रम