शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

कुपोषणमुक्तीसाठी राष्टÑीय पोषाहार सप्ताह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 21:22 IST

दरवर्षी आरोग्य विभागातर्फे १ ते ७ सप्टेबरदरम्यान राष्ट्रीय पोषाहार सप्ताह साजरा करण्यात येतो. भारतासारख्या विकासशील देशात किशोरवयीन मुली व लहान बालके यांच्या पोषणाची समस्या खुपच गंभीर आहे.

ठळक मुद्दे‘स्मार्ट फिडिंग सुरूवातीपासून’ : बालकांच्या पोषणाबाबत जनजागृती

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दरवर्षी आरोग्य विभागातर्फे १ ते ७ सप्टेबरदरम्यान राष्ट्रीय पोषाहार सप्ताह साजरा करण्यात येतो. भारतासारख्या विकासशील देशात किशोरवयीन मुली व लहान बालके यांच्या पोषणाची समस्या खुपच गंभीर आहे. त्यामुळे पोषाहाराबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यासाठी पोषाहार सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.आपले बालक स्मार्ट बुध्दीमत्तेचे व सुदृढ असावे, अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. मात्र बाळाचे पोषण मात्र स्मार्ट होत नाही. म्हणून यावर्षी राष्ट्रीय पोषाहार सप्ताहाचे (२०१७) घोषवाक्य ‘स्मार्ट फिडींग - सुरूवातीपासूनच’ असे आहे. गोंदियासारख्या अतिदुर्गम, आदिवासी व नक्षलग्रस्त जिल्ह्यात कुपोषणाची समस्या आहे. कमी उंचीचे, कमी वजनाचे, जन्मत: अपुºया दिवसाचे व कमी वाढ झालेल्या कुपोषित बालकांमुळे कोवळी पानगळ वाढत चाललेली आहे.पोषाहाराबाबत असलेल्या अज्ञानामुळे लहानपणापासून बाळाला गैरसमजूतीतून, अंधश्रध्दतेतून चुकीच्या पध्दतीने आहार दिला जातो. पुरक आहाराअभावी बाळ पहिला वाढिदवस साजरा करण्यापूर्वीच कुपोषणाच्या खाईत लोटला जातो. रोजच्या आहारात अपेक्षीत पोषणमूल्य असलेला सकस आहार बाळाला मिळत नाही. हिटॅमिन्स, कॅल्शीयम, मिनरल्स व आवश्यक कॅलरीज मिळतच नाही. त्यामुळे बॅकलॉग पुढे वाढतच राहतो व बाळ तीव्र कुपोषणात ढकलले जाते.राज्य शासनाने राष्ट्रमाता जिजाऊ कुपोषण निर्मूलन अभियान हाती घेतले आहे. पोषण मिशनसारख्या ध्येयाने झपाटून महिला बालकल्याण व आरोग्य विभाग झटत आहे. जिल्ह्यात अशा कमी वजनाच्या बाळांकरिता प्राथमिक आरोग्य केंद्राच्या स्तरावर व्हीसीडीसी (गावपातळीवरील ग्राम सुपोषण केंद्र-अंगणवाडी) सुरू करण्यात आले आहे.या केंद्रात कमी वजनाच्या बाळाला ३० दिवसांसाठी अंगणवाडीत वैद्यकीय अधिकाºयांच्या देखरेखीखाली दिवसातून पाच वेळा आहार व व्हिटॅमिन्स औषधी देवून उपचार केले जातात.बरेचसे बालके या व्हीसीडीसीच्या माध्यमातून वजनवाढ होवून दुरु स्त होतात. त्यापैकी काही बालकांना जर कुठली वैद्यकीय समस्या आढळून आली तर त्यांना गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रातून सीडीसीमध्ये उपचारासाठी दाखल केले जाते. येथे तज्ज्ञांच्या देखरेखीखाली त्यांच्या सर्व रक्त तपासण्या, हिमोग्लोबीन, सर्वकष रक्तकणिका काऊंट, सिकलसेल तपासणी, ईएसआर, युरीन टेस्ट, मलेरिया टेस्ट, मॉण्टॉक्स टेस्ट, छातीचा एक्सरे इत्यादी चाचण्या करून विस्तृत रोगनिदान व उपचार करण्यात येतो. उपचार व संपूर्ण पोषाहार देवून बालकाला कुपोषणाच्या खाईतून बाहेर काढले जाते.व्हीसीडीसी व सीडीसीतून दुरूस्त झालेली बालके काही कारणांमुळे पुन्हा आजारी पडले तर त्यांना जिल्हास्तरावरील राष्ट्रीय पोषाहार व पुनर्वसन केंद्रात माता-पालकांसोबत दहा दिवस राहण्यासाठी ठेवण्यात येते. तिथे त्यावर प्रशिक्षीत पोषाहार तज्ज्ञ व बालरोग तज्ज्ञांमार्फत उपचार व संतुलित आहार, व्हिटॅमिन्स टॉनिक्स, मिनरल्स दिले जातात आणि बालकाला कुपोषणाच्या गर्तेतून बाहेर काढले जाते.संतुलीत आहाराबाबत जनजागृतीकुपोषणावर मात करण्यासाठीच समाजामध्ये संतुलीत आहाराबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी १ ते ७ सप्टेबरदरम्यान पोषाहार सप्ताह राबविण्यात येतो. यानिमित्त घोषवाक्य, रांगोळी व पोस्टर स्पर्धा, गर्भवतीसाठी पोषाहार प्रदर्शनी, पोषाहार सप्ताहनिमित्त सुदृढ बालक स्पर्धा इत्यादी स्पर्धांचे आयोजन केले जाते. शाळा-महाविद्यालयीन युवतींमध्ये पोषाहाराबाबत साक्षरता यावी म्हणून खास तज्ज्ञांचे व्याख्याने आयोजित करण्यात येतात.जिल्हाधिकाºयांचे शून्य बालमृत्यूू अभियानगोंदियासारख्या आदिवासी जिल्ह्यात अज्ञान, अंधश्रध्दा व पोषाहाराबाबत साक्षरता नसल्याने अपुºया दिवसांचे व कमी वजनाचे बाळ जन्माला येवून अकाली मृत्यू पावत आहेत किंवा कुपोषणामुळे पोटातच अर्भक मृत्यू होत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी शून्य बालमृत्यू अभियान सुरु केले आहे. यात गर्भवती महिलांची आरोग्य सेविकेकडे नोंदणी झाल्यानंतर ती प्रत्येक वैद्यकीय तपासणीला घरातील पुरूष पालकांना घेवून येतील व डॉक्टर मंडळी त्यांच्या कुटुंबीयांना गर्भवतीची आरोग्य पत्रिका समजावून सांगतील. पुरूष मंडळींना जबाबदारी देण्यात आली आहे की गर्भवतीला संपूर्ण ९ महिने संतुलीत आहार मिळेल, लसीकरण, वेळोवेळी औषोधोपचार व वैद्यकीय सल्ला मिळेल. जेणेकरून बाळंतपणानंतर संपूर्ण वाढ झालेले निरोगी ३ किलो वजनाचे बाळ जन्माला येईल व गोंदिया जिल्ह्याचा कुपोषणाचा कलंक पुसला जाईल. अशाप्रकारे राष्ट्रीय पोषाहार सप्ताहानिमित्त जिल्हा पातळीपासून तर आदिवासी पाड्यापर्यंत विविध जनजागृती कार्यक्र म आयोजित करण्यात येत असल्याची माहिती गंगाबाई शासकीय स्त्री रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर यांनी दिली.