शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

माय बापहो...लेकरं सांभाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 21:34 IST

अजानत्या मिसरूड न फुटलेल्या वयात लाजलज्जा वेशीवर टांगून केलेल्या नको त्या कृत्यांचा परिणाम इतरांवर होतो. शालेय व किशोरवयीन मुलांच्या हल्लीच्या कृत्यांमुळे अनेक सामाजिक प्रश्न निर्माण होत आहेत. शहरी फॅड आता खेडेगावातही पोहोचल्याने मायबापांची धाकधूक वाढली आहे.

ठळक मुद्देपालकांना संदेश : गांजा ओढणाऱ्या मुलांचे प्रकरण चर्चेत

संतोष बुकावन।लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : अजानत्या मिसरूड न फुटलेल्या वयात लाजलज्जा वेशीवर टांगून केलेल्या नको त्या कृत्यांचा परिणाम इतरांवर होतो. शालेय व किशोरवयीन मुलांच्या हल्लीच्या कृत्यांमुळे अनेक सामाजिक प्रश्न निर्माण होत आहेत. शहरी फॅड आता खेडेगावातही पोहोचल्याने मायबापांची धाकधूक वाढली आहे. अशीच एक गंभीर व मनाला चटका लावणारीच नव्हे तर हादरविणारी घटना सोमवारी (दि.१९) उघडकीस आली. तालुक्यातील निमगाव येथे गांजा ओढणाऱ्या किशोरवयीन मुलांनी एका इसमाला मारहाण केली. सध्या हे प्रकरण चांगलेच चर्चेत आहे.तालुक्यातील ग्राम निमगाव हे अवघे अडीच हजार लोकवस्तीचे खेडेगाव असून येथे घडलेला प्रताप हा मायबापांना निश्चितच अंतर्मुख करणारा आहे. सोमवारी दुपारी तीन किशोरवयीन मुलं गावातीलच मैदानावर बसली होती. एक चिमुकला त्यांच्यापाशी पोहोचला. त्याने जे दृश्य बघितले ते अत्यंत विदारक होते. याची वाच्यता त्याने एका ग्रामस्थाकडे केली व तो इसम त्यांच्याकडे गेला असता तिन्ही मुल गांजा पित बसली होती. यावर इसमाने त्यांना हटकले असता तिघे चक्क त्या इसमावर धावून गेले. त्या इसमाचे दोघांनी हात पकडून ठेवले व एका मुलाने इसमाच्या पोटावर बुक्यांनी मारले.सोमवारी निमगाव ग्रामपंचायतची ग्रामसभा होती व तो इसम तिथे पोहोचला. त्याने झालेला प्रकार गावच्या पोलीस पाटलांना सांगितला. त्यांनी याची सूचना पोलिसांत दिली. पोलिसांनी गांजासह तिघांनाही ठाण्यात आणले. मारहाण झालेला इसम तक्र ार नोंदविण्यासाठी ठाण्यात आला मात्र काय घडले काय ठाऊक तक्र ार न करताच तो परतला. ही माफी किशोरवयीन मुलांना दिलासा देणारी ठरली. मात्र दिवसेंदिवस बिघडत चाललेल्या या पिढीला वेळीच आवर घालणे हे सुद्धा तेवढेच महत्वाचे आहे.तारु ण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या आपल्या पाल्याचा पाय कदाचित वाकडा पडू शकतो. त्याचेही पाय अशा व्यसनाच्या आहारी गेलेल्यांपैकी एक असू शकते. घराघरात पोहचलेले चॅनल, इंटरनेट, आधुनिक मोबाईल, त्यावरून फिरणारे संदेश आदी बाबी कदाचित ही उद्याची पिढी बरबाद करण्यासाठी जबाबदार ठरू शकते. यात आपल्या पोटच्या गोळ््याचे भवितव्य गारद होऊ शकते. वारंवार कृती करून निर्ढावलेली कोवळी पोरं तारु ण्यात शौक भागविण्यासाठी वाटेल ते करतात हे चित्र आपण नेहमीच बघतो व हाच प्रकार निमगाव येथे बघायवयास मिळाला. तरूणाईच्या उंबरठ्यावर असलेल्या किशोरवयीन मुलांना आजच सावरणे गरजेचे आहे. त्यामुळे या भीषण वादळाची दिशा ओळखून बापहो ..... लेकरं सांभाळा असे म्हणावेसे वाटते.अंतर्मुख व्हा...सजग राहाज्यांना जन्म दिला ती चिल्ली-पिल्ली वाममार्गाला लागली आहेत, पण या संकटाचा अंदाज आपल्याला अजूनही कसा येत नाही ? मुलांना नामांकित, महागड्या शाळेत घातलं, त्यांच्या रोजच्या गरजा पूर्ण केल्या, पालकसभेला नियमित हजेरी लावली की बस्स संपलं. मात्र जागरूक पालक म्हणून आपलं कर्तव्य पूर्ण करण्यापलीकडेही मायबाप म्हणून आपल्याला खूप काही करायचं आहे. हा प्रश्न निमगावात घडलेल्या घटनेनंतर तुम्हांला छळू लागेल. यासाठी अंतर्मुख व्हा .... सजग राहा .......एवढाच संदेश देता येईल.पोलिसांनीही मनावर घेतले नाहीनिमगावच्या पोलीस पाटलांनी पोलिसांना बोलाविले. मार खाणाऱ्यानेही तक्र ार नोंदविली नाही. मात्र हा प्रश्न सुजाण युवापिढी घडविण्यासाठी घातक होता. तीन किशोरवयीन मुलांपैकी एक मुंबई, दुसरा चंद्रपूर व तिसरा निमगावचा होता. मुलांजवळ तर अगदी थोडासा गांजा मिळाला पण तो नेमका आला कुठून ? याची उकल त्या किशोरवयीन मुलांकडून करून घेणे गरजेचे होते. यासाठी पोलीस पाटलांची तक्र ार घेता येऊ शकली असती. अर्जुनी-मोरगाव शहरातही गांजा विकला जातो. यापासून पोलीस अनभिज्ञ नाही. पण अशा या युवापिढीला देशोधडीला लावणाऱ्या गैरकृत्यांवर पोलीस अंकुश का लावत नाही हा खरा आत्मचिंतनाचा विषय आहे. एका पत्रकाराने ठाणेदार महादेव तोंदले यांना यासंदर्भात विचारणा केली तेव्हा त्यांनी ही फेक न्यूज असल्याचे सांगितले. त्यावेळी ती तीन किशोरवयीन मुले व निमगावची प्रतिष्ठित मंडळी ठाण्यातच होती. खोटे बोलण्यामागील रहस्य अद्याप गुलदस्त्यात आहे.