माय बाय म्हणते अभ्यास कर, मोदी सरकार म्हणते पकोडे तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 12:27 AM2018-02-24T00:27:47+5:302018-02-24T00:27:56+5:30

मोदी सरकार के राज मे बेरोजगार रास्ते पे, जाचक अटी रद्द करा, बेरोजगारांना रोजगार द्या, नोकरी आमची हक्काची नाही कुणाच्या बापाची, आम्हा सर्वांची एकच भूल कमळाचे फुल, माय बाय म्हणते अभ्यास कर अन मोदी सरकार म्हणते पकोडे तळ, .....

My Bay says study tax, Modi government says Pokde Till | माय बाय म्हणते अभ्यास कर, मोदी सरकार म्हणते पकोडे तळ

माय बाय म्हणते अभ्यास कर, मोदी सरकार म्हणते पकोडे तळ

Next
ठळक मुद्देबेरोजगारांचे आक्रोश आंदोलन : रेल्वेस्थानक व्यवस्थापकांना निवेदन

ऑनलाईन लोकमत
गोंदिया : मोदी सरकार के राज मे बेरोजगार रास्ते पे, जाचक अटी रद्द करा, बेरोजगारांना रोजगार द्या, नोकरी आमची हक्काची नाही कुणाच्या बापाची, आम्हा सर्वांची एकच भूल कमळाचे फुल, माय बाय म्हणते अभ्यास कर अन मोदी सरकार म्हणते पकोडे तळ, अशा घोषणा देत बेरोजगार युवकांनी शुक्रवारी (दि.२३) सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील तहसील कार्यालय येथून गोरेलाल चौकातील रेल्वे कार्यालयावर मोर्चा काढला. यात शेकडो सुशिक्षित बेरोजगार युवक सहभागी झाले. या वेळी युवकांनी सरकार विरोधात तीव्र रोष व्यक्त केला.
रेल्वे स्पर्धा परीक्षार्थ्यांवर होणाºया अन्यायाविरोधात बेरोजगार युवा मोर्चाच्या वतीने शुक्रवारी आक्रोश आंदोलन व रेल्वे कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून मोर्चाला सुरूवात झाली. जिल्हाभरातील युवक यात सहभागी झाले होते. शहरातील मुख्य मार्गावरुन हा मोर्चा रेल्वे कार्यालयाजवळ पोहचला. मोर्च्यात सहभागी युवकांनी सरकार आणि रेल्वे बोर्डाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर शिष्टमंडळाच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन रेल्वेस्थानक व्यवस्थापक रवी नारायणकार यांना देण्यात आले. या वेळी दिलेल्या निवेदनातून रेल्वे भर्ती बोर्डाच्या गु्रप डी पदाच्या होणाºया भर्तीतून आयटीआय अनिवार्यची अट रद्द करावी, कमीत कमी योग्यता दहावी ठेवण्यात यावी, परीक्षा शुल्क ५०० रूपये चालान स्वरूपातील शुल्क वाढ मागे घेवून नि:शुल्क अर्ज स्वीकारण्यात यावे, रेल्वे भर्ती बोर्डाद्वारे दरवर्षी रोजगार भर्ती प्रक्रिया अनिवार्य करावी, एमपीएससी, यूपीएससी, शिक्षक भर्ती आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या मागण्या पूर्ण कराव्यात, परीक्षेनंतर सहा महिन्यात भर्ती पूर्ण करावी, महिलांसाठी लागू केलेली शारीरिक चाचणीची अट रद्द करुन पूर्वीप्रमाणेच भर्ती प्रक्रिया घेण्यात यावी, आदी मागण्यांचा समावेश होता.
शिष्टमंडळात रुपेश डोंगरे, उमेश कांबळे, नितीन टेंभुर्णीकर, चेतन मेश्राम, मिथुन बागडे, प्रणय दरवडे, देवांत गजभिये, प्रितम बागडे, विनीत शहारे, शैलेश टेंभेकर, मयुर मेश्राम, कुणाल राऊत, विलास राऊत, धीरज मेश्राम, डी.एस.मेश्राम, देवेश शेंडे, स्वप्नील डहाटे, अक्षय सहारे, चेतन मेश्राम, अमन मेश्राम, विवेक बन्सोड, प्रितेश नारनवरे यांचा समावेश होता. युवकांच्या आंदोलनाला शहरातील शारदा वाचनालय, शासकीय वाचनालय, आज्ञाद लायब्ररी, स्वामी विवेकानंद लायबरी, युथ स्टडी पार्इंट अ‍ॅन्ड फास्ट्रक इंग्लिश अ‍ॅकडमी यांनी सहकार्य केले.

Web Title: My Bay says study tax, Modi government says Pokde Till

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.