शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

अनैतिक संबंधातून विवाहित तरुणाचा खून; कमरेला दगड बांधून मृतदेह फेकला नाल्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2022 17:42 IST

एलसीबीने केले तिघांना अटक

गोंदिया : अनैतिक संबंधातून देवरी तालुक्याच्या तुमडीमेंढा येथील दिलीप संतराम अरकरा (३५) या विवाहित तरुणाचा खून करण्यात आला. या प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पोलिसांनी अवघ्या चार तासांत तीन आरोपींना सोमवारी (दि.१९) अटक करून चिचगड पोलिसांच्या स्वाधीन केले.

दिलीप संतराम अरकरा (३५) याचे आपल्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय घेऊन आरोपी रतिराम दशरथ कुंभरे याने आरोपी छेदीलाल कारुजी आचले व मोतीराम पांडुरंग नेताम सर्व रा. तुमडीमेंढा यांच्या मदतीने कुऱ्हाडीने सपासप वार करून ठार केले. मृतदेह कुणालाही दिसू नये म्हणून मृतदेहाच्या कमरेला दगड बांधून मृतदेह नाल्याच्या पाण्यात फेकून दिला. यासंदर्भात मृतकाची पत्नी पुष्पा दिलीप अरकरा (२६) यांनी १७ सप्टेंबर रोजी चिचगड पोलिसांत तक्रार केली.

दरम्यान दिलीप अरकरा याचा मृतदेह तुमडीमेंढा शेतशिवाराजवळील जंगलातील नाल्याजवळ आढळला. या घटनेसंदर्भात चिचगड पोलिसांनी भादंविच्या कलम ३०२, २०१ अन्वये गुन्हा नोंद केला. या प्रकरणाचा तपास गोंदियाच्या स्थानिक गुन्हे शाखा व चिचगड पोलिसांनी करून अवघ्या चार तासांच्या आरोपी रतिराम दशरथ कुंभरे, छेदीलाल कारुजी आचले व मोतीराम पांडुरंग नेताम सर्व रा. तुमडीमेंढा या तीन आरोपींना अटक केली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी भिसे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, चिचगड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक शरद पाटील, पोलीस उपनिरीक्षक मनोहर इस्कापे यांनी केली. तपास सहायक पोलीस निरीक्षक शरद पाटील करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीgondiya-acगोंदिया