शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
4
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
5
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
6
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
7
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
8
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
9
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
10
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
11
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
12
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
13
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
14
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
15
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
16
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
17
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
18
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
19
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
20
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...

भावाच्या खुनाच्या बदल्यात खून; मैत्रिणीसह दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 16:34 IST

Gondia : इन्स्टाग्रामवर मैत्री करून बोलावले होते भेटायला

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : तिरोडा तालुक्यातील ग्राम भिवापूर येथे रविवारी (दि.२४) सकाळी ९:३० वाजता रक्ताच्या थारोळ्यात सुनील चंद्रकुमार तुमडे (३२, रा. भुराटोला) याचा मृतदेह आढळला होता. या खून प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली. वैष्णवी गणेश सुरणकर (१९, रा. भिवापूर) व मंगेश माणिकचंद रहांगडाले (२४, रा. भुराटोला) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

रविवारी (दि.२४) सकाळी ९:३० वाजेदरम्यान भिवापूर येथील नाल्याजवळ सुनील तुमडे याचा मृतदेह आढळला होता. धारदार हत्याराने डोक्यावर वार करून त्याचा खून करण्यात आला होता. सुनीलची आई चंद्रकला तुमडे (रा. भुराटोला) यांच्या तक्रारीवरून तिरोडा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) भारतीय न्याय संहिता अन्वये २५ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल केला. प्रकरणाचे गांभीर्य बघता पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांनी प्रकरणाचा उलगडा करण्याचे निर्देश स्थानिक गुन्हे शाखा तसेच तिरोडा पोलिस निरीक्षकांना दिले होते, वरिष्ठांच्या निर्देशाप्रमाणे उपविभागीय पोलिस अधिकारी साहिल झरकर यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलिस निरीक्षकांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक संजय तुपे, महिला पोलिस उपनिरीक्षक वनिता सायकर, पोलिस अंमलदार प्रकाश गायधने, दुर्गेश तिवारी, सुबोध बिसेन, इंद्रजित बिसेन, चित्तरंजन कोडापे, सुजित हलमारे, रियाज शेख, छगन विठ्ठले, संतोष केदार, दुर्गेश पाटील, राम खंदारे, मुरली पांडे, तिरोडा येथील पोलिस निरीक्षक अमित वानखेडे यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक संजय कवडे, पोलिस उपनिरीक्षक तेजस कोंडे, अंमलदार योगेश कुळमते, सूर्यकांत खराबे, नीलेश ठाकरे, शैलेश पटले, उत्तरेश्वर घुगे, अमित गायकवाड यांनी प्रकरणाचा उलगडा करून वैष्णवी सुरणकर व मंगेश रहांगडाले यांना अटक केली. अटक केलेल्या दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना शनिवारपर्यंत (दि.३०) पोलिस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक कवडे करीत आहेत. 

सुनीलसोबत इन्स्टाग्रामवर केली मैत्री वैष्णवी ही मंगेश रहांगडाले याची मैत्रीण आहे. भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी मंगेशने वैष्णवीचा वापर केला. वैष्णवीला इन्स्टाग्रामवरून सुनीलसोबत मैत्री कर आणि त्याला भेटायला बोलाव. भेटायला आल्यावर आपण त्याचा काटा काढू असे ठरले. त्यानुसार वैष्णवीने सुनीलसोबत मैत्री करून त्याला रात्रीच्या वेळी भिवापूर येथे भेटायला बोलावले. सुनील तिला भेटायला भिवापूर येथे गेल्यावर सुनीलच्या डोक्यावर कुऱ्हाडीने घाव घालून त्याचा खून केला.

आरोपींच्या शोधासाठी नेमले होते खबरी या खुनातील आरोपींच्या तपासासाठी तिरोडा पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, एवढेच नव्हे तर खबरीही नेमण्यात आले होते. आरोपींचा शोध घेत असताना घटनास्थ- ळावरून प्राप्त माहिती, परिस- रातील नागरिकांची केलेली विचारपूस, मृताचा पूर्वेतिहास आणि नेमण्यात आलेल्या खब- रींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे खुनातील आरोपींपर्यंत पोलिस पोहोचले.

खुनाचा बदला खून१८ मे २०२३ च्या रात्री आरोपी मंगेश रहांगडाले याचा भाऊ गुरुदास माणिकचंद रहांगडाले (२८, रा. भुराटोला) याचा सुनीलचे वडील चंद्रशेखर तुमडे याने खून केला होता. त्या खुनाचा वचपा काढण्यासाठी आरोपी मंगेश रहांगडाले याने कट रचून सुनीलचा खून केला. या खुनात वैष्णवी सुरणकर हिने त्याला मदत केली. खून करून मंगेश रहांगडाले मुंबईला पळून गेला होता. पोलिसांनी त्यास मुंबई येथून ताब्यात घेतले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीgondiya-acगोंदिया