शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
2
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
3
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
4
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
5
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
6
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
7
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
8
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
9
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
10
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
11
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
12
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
13
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा
14
पाकच्या मुलीशी कॉन्स्टेबलचा विवाह राष्ट्रीय सुरक्षेला धोका; सीआरपीएफचे कोर्टात स्पष्टीकरण
15
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
16
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
17
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
18
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
19
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
20
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला

खूनाच्या बदल्यात खून करुन अपघात भासवला; ३० वर्षापूर्वी वडिलांचा खून केल्याच्या रागातून कृत्य

By नरेश रहिले | Updated: December 8, 2023 19:21 IST

खून का बदला खून ही म्हण आपण सिनेमात ऐकतो, परंतु ३० वर्षापूर्वी वडीलाचा खून करणाऱ्या व्यक्तीचा रहस्यमय खून केला.

गोंदिया : खून का बदला खून ही म्हण आपण सिनेमात ऐकतो, परंतु ३० वर्षापूर्वी वडीलाचा खून करणाऱ्या व्यक्तीचा रहस्यमय खून केला. हा खून अपघात दाखविण्यासाठी त्याने हे कृत्य केले. परंतु मृताची स्थिती, परस्थितीजन्य आणि घटनास्थळावरील भौतिक पुरावे तसेच शेजारील सी. सी. टी. व्ही. फुटेजची पाहणी केल्यावर फुलचूरटोला ते पिंडेकपार या रस्त्यावर झालेला अपघात हा अपघात नसून खून असल्याचे पुढे आले आहे. या प्रकरणात दोघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. सुनील भोंगाडे व शाहरुख शेख या दोघांना अटक करण्यात आली आहे.

गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या २९ नोव्हेंबर २०२३ रोजी सायंकाळी ६ ते ६:३० वाजता दरम्यान फुलचुरटोला ते पिंडकेपार जाणाऱ्या रोडवर मोटार सायकलचा अपघात झाल्याने मोरेश्वर खोब्रागडे रा. चंद्रशेखर वॉर्ड, श्रीनगर, गोंदिया यांचा मृत्यू झाला. यासंदर्भात गोंदिया ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांनी गुन्ह्यात खून प्रकरणात कलमवाढ करण्याचे निर्देश दिले होते. यावरून गोंदिया ग्रामीण पोलिस ठाण्यात कलम ३०२, ३४१, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खून प्रकरणाचा छडा लावून सत्यता पडताळून गुन्ह्याचा उलगडा केला. आरोपी सुनील भोंगाडे याच्या वडीलाचा खून ३० वर्षापूर्वी मृतकाने केला होता. त्यासाठी सुनिल आठ दिवसापासून मृतकच्या मागावर होता. १०० ते १५० च्यावर सी. सी.टी.व्ही. फुटेजची पडताळणी आणि तांत्रीक विश्लेषणाची खात्री करून आरोपी सुनील धनिराम भोंगाडे (४४) रा. शास्त्री वॉर्ड गोंदिया व त्याच्या दुकानात काम करणारा साथीदार आरोपी शाहरूख हमीद शेख (२४) रा. कुऱ्हाडी यांना अटक करण्यात आली आहे. जमीनीच्या वादातून ३० वर्षापूर्वी मृतकच्या वडीलाचा केला होता खूनमृतक मोरेश्वर खोब्रागडे याने आपल्या भावासोबत मिळून जमीनीच्या वादातून सुनिल भोंगाडे यांच्या वडीलाचा मनोहर चौक गोंदिया येथे धारदार शस्त्राने वार करुन ठार केले होते, असे सुनिल भोंगाडे याने पोलिसांना दिलेल्या माहिती सांगितली आहे. मृतक एकावर्षापासून कोणत्याही सामाजिक कार्यक्रमामध्ये सुनील भोंगाडे याला पाहुन नेहमी हिनविण्याचे उद्देशाने हसत होता. याचाही राग सुनिलला होता. रस्त्यावर अडविले लोखंडी राडने मारून केला खूनआरोपी सुनील धनिराम भोंगाडे व शाहरूख हमीद शेख या दोघांनी २९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता गाडीने पिंडकेपार रोडकडे जावून अनिल कबाडी याच्या गोदामालगत असलेल्या खुल्या जागेत मृतक मोरेश्वर खोब्रागडे याला रोडवर गाडीने अडवून लोखंडी रॉडने त्याच्या डोक्यावर पाच ते सहा वार केले. शाहरुख याने त्यास लाथाबुक्याने डोक्यावर व पोटावर मारहाण करून पसार झाल्याची माहिती पोलिसांना दिली. यांनी केली कारवाईही कारवाई पोलीस अधिक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधिक्षक नित्यानंद झा यांच्या मार्गदर्शानात पोलीस निरीक्षक दिनेश लबडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शिंदे, पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने, वनिता सायकर, सहाय्यक फौजदार अर्जुन कावळे, पोलीस हवालदार राजेंद्र मिश्रा, भुवनलाल देशमुख, महेश मेहर, इंद्रजीत बिसेन,सोमेंद्रसिंग तुरकर, रियाज शेख तुलसिदास लुटे, नेवालाल भेलावे, चित्तरंजन कोडापे, सुजित हलमारे, संतोष केदार, अजय रहांगडाले, चालक लक्ष्मण बंजार, घनश्याम कुंभलवार, विनोद गौतम, नक्षल सेल येथील आशिष वंजारी, सायबर सेलचे दीक्षित दमाहे, धनंजय शेंडे, संजय मारवाडे, सोनवणे, रहीले, येरणे, शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी, गोंदिया ग्रामीणचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत काळे, नक्षल सेलचे पोलीस निरीक्षक भुषण बुराडे यां यांनी केली आहे. तपासासाठी तयार केली होती सहा पथकेगुन्ह्याचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेने वेगवेगळी तीन पथके तयार करण्यात आली होती. त्याचप्रमाणे गोंदिया शहर, गोंदिया ग्रामीण, नक्षल सेल येथील अधिकारी अंमलदार यांची वेगवेगळी पथके आरोपीचा शोध व सदर प्रकरणाचा उलगडा करण्याकरिता नेमण्यात आली होती. 

टॅग्स :gondiya-acगोंदियाCrime Newsगुन्हेगारी