शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
2
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
3
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
4
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
5
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
6
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
7
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
8
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
9
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
11
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
12
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
13
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
14
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
15
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
16
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
17
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
18
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
19
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
20
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला

‘आला थंडीचा महिना झटपट शेकोटी पेटवा...’

By admin | Published: December 11, 2015 2:21 AM

‘आला थंडीचा महिना झटपट शेकोटी पेटवा, आता लागलाय खोकला..’ या मराठमोळ्या लावणीच्या गीताप्रमाणे दिवाळी संपताच गुलाबी थंडीला खरी सुरूवात होते.

गुलाबी थंडीची हौस : तरूण मंडळींना हवीहवीशी वाटणारीबाराभाटी : ‘आला थंडीचा महिना झटपट शेकोटी पेटवा, आता लागलाय खोकला..’ या मराठमोळ्या लावणीच्या गीताप्रमाणे दिवाळी संपताच गुलाबी थंडीला खरी सुरूवात होते. ही थंडी यौवनाने परिपूर्ण असणाऱ्या तरूण मंडळींना हवीहवीशी वाटते. पानझडीच्या मौसमात या गुलाबी थंडीला रसभरून बहर येत आहे. ही बोचरी थंडी खूपच रोमांचकारी ठरत आहे. त्यामुळेच या गीताची आठवण ही थंडी करून देत आहे. आपल्या जिल्ह्यातील वातावरण आल्हाददायक आहे. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील निसर्गरम्य, डोंगराळ भागात ग्रामीण परिसराच्या वातावरणामध्ये खट्याळ वारा सर्वांना मदमस्तीत छेडत आहे. मात्र यामध्ये गुलाबी थंडीची हौस भागविण्यासाठी नवदाम्पत्यांना मधुमिलनाची उत्कंठा जागवित आहेत.दरवर्षीच्या ऋतूमानाप्रमाणे उन्हाळा व पावसाळा जसे आपले स्वरूप भूमिवर प्रतिबिंब ठेवून गेले, तसाच हिवाळासुध्दा आपल्या पाऊलखुणा उमटवण्याच्या नादात लागला आहे. हिवाळा म्हणताच सर्व आसमंताची सोबती धरणीमाता हिरवळीने नववधूप्रमाणे नटलेली दिसत आहे. पहाटेच्या दवबिंदूमुळे हिरव्या डोंगराळ झाडीच्या भागाचे निसर्गवैभव अधिकच खुलून दिसत आहे. आता ग्रामीण भागातील थंडी, निव्वळ थंडी नसून गुलाबी आल्हादकारक झाली आहे. राष्ट्रीय उद्यान, वनराई परिक्षेत्र, कोकणाई, काळीमाती, प्रतापगड वनपरिक्षेत्र स्वत:कडे दिसवेंदिवस आकर्षित करण्याचे केंद्रस्थान बनले. तसेच तळे, बोडी, तलाव सकाळच्या सुमारास चंचळणारे पाणी, सूर्याची चमकणारी किरणे पाण्यामध्ये प्रतिमांचे विलक्षण मोहक दृश्य पहावयास मिळत आहे. अशा हुडहुडविणाऱ्या गुलाबी थंडीचा आनंद तरूणवर्ग तर घेतोच, पण सायंकाळच्या वेळी गावागावामध्ये शेकोटी पेटवून सर्व घरातील लोक-नागरिक एकत्र बसून अनेक भारावणाऱ्या गोष्टी सांगून मनोरंजन करताना आढळताना दिसतात. पहाटेच्या थंडीसोबतच सर्वत्र पसरणारे धुके निसर्ग सौंदर्यात भर घालत आहेत. अशावेळी जम्मू-कश्मिरच्या सौंदर्याच्या रोमहर्षक आठवणी मनात जागवून सोडते. म्हणून आला थंडीचा महिना... आता शेकोटी पेटवा... अशी सादर मनाला घातली जात आहे. (वार्ताहर)