शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
3
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
4
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
5
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
6
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
7
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
9
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
10
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
11
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
12
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
13
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
14
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
15
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
16
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
17
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
18
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
19
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
20
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या

पेंशन योजनेसाठी मनसे देणार लढा

By admin | Updated: September 25, 2015 02:27 IST

राज्यात २००५ नंतर शासकीय सेवेत रुजू झालेले लाखो शिक्षक व इतर कर्मचारी काम करीत आहेत.

गोंदिया : राज्यात २००५ नंतर शासकीय सेवेत रुजू झालेले लाखो शिक्षक व इतर कर्मचारी काम करीत आहेत. विशेष करून शिक्षक तांडा, वाडा, वस्ती, खेडेगाव, डोंगराळ भाग, आदिवासी व नक्षलग्रस्त भागात शिक्षणाचे पवित्र कार्य इमानेइतबारे करीत आहेत. परंतु शिक्षण क्षेत्राकडे पाहण्याचा राजकीय मंडळीचा उदासिन दृष्टिकोन आहे. जुनी पेंशन योजना बंद केल्याने कर्मचाऱ्यांवर शासनाने अन्याय केला आहे. त्यांच्यासाठी मनसे शिक्षक सेना लढा देणार असल्याचे पत्रकातून कळविण्यात आले.राजकीय मंडळी देशसेवेच्या नावाखाली फक्त पाच वर्षांची सेवा करतात, पण त्यांना पेन्शन लागू आहे. भरपूर सुविधा आहेत. तर मग शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांना पेंशन का नाही? खरे पाहता हा अंशदायी पेंशनचा निर्णय केंद्र सरकारचा आहे. पण तो स्वीकारायचा की नाही, हे राज्यावर सोपवले होते. परंतु राज्याने हा निर्णय स्वीकारून जबरीने कर्मचाऱ्यांच्या माथी मारला आहे. सदर निर्णय देशातील बऱ्याच राज्याने स्वीकारलेला नाही. घाईघाईने हा निर्णय स्वीकारून महाराष्ट्र शासनाने कर्मचाऱ्यांवर मोठा अन्याय केला आहे. या नवीन पेंशनबद्दल खूप सांशक वातावरण आहे. कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यावर त्याला पेंशन किती टप्यात, कधी व किती मिळणार? याचा स्पष्ट उल्लेख कुठेही नाही. माणसाला उतारवयातच पैशाची खरी गरज असते. येणारा काळ हा अतिशय धोकादायक आहे. मुले आई-वडिलांना सांभाळतीलच, असे नाही. त्यामुळे वृध्दापकाळातला जगण्याचा अधिकारच जणू शासनाने हिसकावून घेतला. सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी कायदेशीर व राजकीय लढाई लढण्यासाठी तयार व्हावे. सन २००५ पूर्वीच्याही काही कर्मचाऱ्यांवर असाच अन्याय झाला होता. परंतु तेव्हा सर्वांनी एकत्र येऊन हा लढा लढला होता व त्यात विजयसुद्धा मिळाला होता. पुन्हा तसाच लढा आपण सर्वांना लढणार असे मनसे शिक्षक-शिक्षकेतर सेनेने कळविले.