शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक कर्तव्यात केला कसूर, दोन कर्मचारी निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 16:31 IST

कर्तव्याच्या वेळी होते गैरहजर : वरिष्ठ अधिकारी भेट देऊन करीत आहेच चाचपणी

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने गोंदिया विधानसभा मतदारसंघ अंतर्गत जि.प. लघू पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता अजय रहांगडाले व ग्रामपंचायत अधिकारी हेमंत वसंत लेंढे यांची स्थिर सर्वेक्षण पथक, पतंगा मैदान, आमगाव रोड, गोंदिया येथे नियुक्ती करण्यात आली होती. पण त्यांनी गैरहजर राहून त्यांच्या कर्तव्यात कसूर केल्याने त्यांच्यावर सोमवारी (दि. ११) जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निलंबनाची कारवाई करण्यात आली.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी गोंदिया यांनी रविवारी (दि. १०) रात्री ९:४५ च्या सुमारास स्थिर सर्वेक्षण पथक, पतंगा मैदान, आमगाव रोड, गोंदिया येथे भेट दिली असता अजय रहांगडाले, उपविभाग गोंदिया पथक क्र. २ (नियुक्तीच्या वेळी दुपारी २ ते रात्री १० पर्यंत) आणि हेमंत वसंत लेंढे, पथक क्र. ३ (नियुक्तीच्या वेळी १० ते सकाळी ६ पर्यंत) हे रात्री ११ वाजेपर्यंत आपल्या कर्तव्याच्या ठिकाणी अनधिकृत गैरहजर आढळले. संबंधितांनी आपल्या कर्तव्यात निष्काळजीपणा व बेजबाबदारपणा दाखवून आपल्या कर्तव्यात गंभीर स्वरुपाचे कसूर केल्याने संबंधिताविरुद्ध तत्काळ प्रभावाने निलंबनाची कार्यवाही करण्याबाबत निर्देश दिले. 

जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केली कारवाईनिवडणूक कामकाज कर्तव्याच्या ठिकाणी अनधिकृत गैरहजर आढळून आल्याने आपल्या कर्तव्यात कसूर केल्याने महाराष्ट्र जिल्हा परिषदा, जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम १९६७ मधील नियम ३ चा भंग केल्याने कार्यवाहीस पात्र ठरत असल्याने महाराष्ट्र जिल्हा परिषदा, जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४ चे नियम ३ मधील तरतुदीनुसार जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी मुरुगानंथम एम. यांना प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून त्यांनी अजय रहांगडाले व हेमंत लेंढे यांना निलंबित केले आहे. त्यामुळे निवडणूक कामकाज कर्तव्यावर असलेल्या कोणत्याही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या कर्तव्याच्या ठिकाणी अनधिकृत गैरहजर राहू नये अशी सूचना केली. 

टॅग्स :gondiya-acगोंदियाmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४