शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

पारा गेला चाळीशी पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 00:12 IST

एप्रिल महिन्यातच रविराज चांगलेच तळपू लागले आहेत. जिल्हयाचा पारा आता चाळीशीच्या पार गेला असून अवघ्या जिल्ह्यालाच भाजून सोडले आहे. या उन्हामुळे दिवसा रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत असून नागरिकांनी आतापासूनच दुपारच्या वेळी घराबाहेर निघणे टाळल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देरस्त्यांवर शुकशुकाट : काळजी घेण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : एप्रिल महिन्यातच रविराज चांगलेच तळपू लागले आहेत. जिल्हयाचा पारा आता चाळीशीच्या पार गेला असून अवघ्या जिल्ह्यालाच भाजून सोडले आहे. या उन्हामुळे दिवसा रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत असून नागरिकांनी आतापासूनच दुपारच्या वेळी घराबाहेर निघणे टाळल्याचे दिसून येत आहे.एप्रिल महिन्यापासून उन्हाळा खऱ्या अर्थाने रंगात येतो असा आजवरचा अनुभव आहे. तर मे महिन्यात उन्हाळा भाजून सोडतो असे आतापर्यंत बघावयास मिळाले आहे. त्यामुळे नागरिक मे महिन्यात दुपारच्या वेळेत घराबाहेर निघण्याचे टाळत असून तेव्हाच रस्ते शुकशुकाट दिसतात. यंदा मात्र वातावरण चांगलेच बदलले असून यंदा एप्रिल महिन्यातच रविराज डोळे वटारून आपला रंग दाखवू लागले आहेत. यामुळेच आतापासूनच ४० डिग्रीच्यावर तापमानाची नोंद घेतली जात आहे. या उष्णलहरीमुळे शहरातील रस्ते आतापासूनच ओस पडत आहेत.जेमतेम एप्रिल महिन्याचा शेवट असताना उन्हाचा उद्रेक बघता येणाºया मे व जून महिन्यात काय कहर होणार याचा विचार करूनच अंगाला घाम फुटत आहे. यंदाच्या उन्हाने नागरिकांच्या अंगाची आतापासूनच लाही-लाही होत आहे. एवढेच नव्हे तर पंखे व कुलर आतापासूनच फेल ठरत आहेत. अवघ्या राज्याची ही स्थिती असून काय करावे असा सवाल सर्वांपुढे उभा आहे. मात्र घरात बसून कामे होणार नाहीत. यामुळे बांधून-बुंधून नागरिक घराबाहेर पडत आहेत. तरिही उन्हात निघणे टाळले जात असल्याची जाणीव रस्त्यांवरील शुकशुकाट करून देत आहे. विशेष म्हणजे, या उष्ण लहरीची दखल घेत आरोग्य विभागाने आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. पूर्वी मे महिन्यातील उन्हामुळे नागरिकांना त्रास जाणवत होता. यंदा मात्र उन्हाची तिरीप एवढी वाढली आहे की, मे महिन्यातील आग सुर्यदेव आताच ओकत आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाने आतापासूनच आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.तापमान मापकाची व्यवस्थाच नाहीकाही वर्षांपूर्वी येथील जुन्या तहसील कार्यालयात तापमान मापक यंत्र होते व तहसील कार्यालयातील संबंधीत कर्मचाºयांकडून तापमानाची नोंद दररोज मिळत होती. शिवाय तहसील कार्यालयात एक चार्ट लावले जात होते व त्यावर दररोजची नोंद केली जात होती. अशात कुणालाही तेथून तापमान कळत होते. आता मात्र मागील काही वर्षांपासून ही व्यवस्था फिस्कटली आहे. शिवाय सध्या तरी तहसील कार्यालयाकडे तशी काहीच व्यवस्था नसल्याचेही कळले. त्यामुळे आजघडीला फक्त बिरसी विमानतळ येथेच तापमान मापक यंत्र असल्याची माहिती आहे.

टॅग्स :Temperatureतापमान