शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
2
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
3
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
4
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
5
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
6
"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..."
7
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
8
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
9
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
10
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
11
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
12
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
13
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
14
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
15
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
16
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
17
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
18
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
19
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
20
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन

गरजूंसाठी धावले खालसा सेवा दल सदस्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 06:00 IST

सर्वत्र बंदची स्थिती असल्याने त्यांच्या जेवणाची परवड झाली असून कोठे निघताही येत अशा स्थितीत ते अडकले आहेत. मात्र त्यांचीही स्थिती जाणून घेत येथील खालसा सेवा दलने या गरजूंच्या जेवणाची जबाबदारी घेतली आहे. येथील खालसा सेवा दलकडून शहरातील केटीएस व बीजीडब्ल्यू रूग्णालयातील रूग्णांच्या नातेवाईक तसेच म्युनिसिपल शाळेत थांबविण्यात आलेल्या भिकाऱ्यांना जेवण दिले जात आहे.

ठळक मुद्देतीन हजार जणांच्या जेवणाची जबाबदारी : रूग्णालयातील गरजूंचा दिला आधार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : ‘लॉकडाऊन’मुळे आज रूग्णालयात असलेल्या रूग्णांच्या नातेवाईक तसेच भिकाऱ्यांची अडचण निर्माण झाली आहे. मात्र या गरजूंच्या जेवणाची जबाबदारी येथील खालसा सेवा दलने घेतली असून दररोज सुमारे तीन हजार जणांना जेवण वितरण करीत आहे. शहरातील दोन्ही शासकीय दवाखाने व म्युनिसिपल शाळेतील भिकाऱ्यांसोबतच शहरातील सुमारे १५ खासगी दवाखान्यांतील रूग्णांच्या नातेवाईकांना खालसा सेवा दलकडून जेवण पुरविले जात आहे.कोरोनाच्या कहरमुळे अवघ्या देशात ‘लॉकडाऊन’ करण्यात आला आहे. याचा फटका बाहेरगावावरून आलेले तसेच शहरातील भिकारी मात्र उघड्यावर आले आहेत.सर्वत्र बंदची स्थिती असल्याने त्यांच्या जेवणाची परवड झाली असून कोठे निघताही येत अशा स्थितीत ते अडकले आहेत. मात्र त्यांचीही स्थिती जाणून घेत येथील खालसा सेवा दलने या गरजूंच्या जेवणाची जबाबदारी घेतली आहे. येथील खालसा सेवा दलकडून शहरातील केटीएस व बीजीडब्ल्यू रूग्णालयातील रूग्णांच्या नातेवाईक तसेच म्युनिसिपल शाळेत थांबविण्यात आलेल्या भिकाऱ्यांना जेवण दिले जात आहे.याशिवाय शहरातील सुमारे १५ खासगी दवाखान्यांत असलेल्या रूग्णांच्या नातेवाईकांना जेवण पुरविले जात आहे. विशेष म्हणजे, या सर्वांना दोन वेळचा चहा व बिस्किटेही दिले जात आहेत. यातील केटीएस व बाई गंगाबाई रूग्णालय तसेच म्युनिसिपल शाळेतील भिकाºयांना जेवण देण्यासाठी खालसा सेवा दलची विशेष गाडी जात आहे. तर अन्य रूग्णालयांतील गरजूंना कार्यकर्ते पॅकेट पोहचवून देत आहेत. विशेष म्हणजे, एवढ्या सर्वांचे जेवण बनविणे तसेच पॅकेट बनविण्यासाठी आजघडीला सुमारे ७०-८० महिला-पुरूषांची टीम सेवा देत आहे. यामुळे दररोज तीन हजार गरजूंना मदत होत आहे.२४ सप्टेंबर २०१८ पासून सेवेतयेथील कंत्राटदार वजिंदरसिंग मान हे येथील केटीएस व बाई गंगाबाई रूग्णालयात कामानिमित्त गेल्याने त्यांना दवाखान्यात रूग्णांचे नातेवाईक स्वयंपाक करताना दिसले. यावर त्यांच्यासाठी जेवणाची सुविधा उपलब्ध करवून देण्याचा विचार मान यांच्या डोक्यात आला. याबाबत त्यांनी आपल्या आई व कुटुबीयांना सांगीतले. त्यांनी होकार देताच मान यांनी स्वत:ची एक गाडी जेवण पुरविण्यासाठी तयार करवून घेतली व खालसा सेवा दलच्या नावाने २४ सप्टेंबर २०१८ पासून ही सेवा शहरात सुरू झाली.रुग्णांसह अनेकांना होतेय मदतखालसा सेवा दलकडून केटीएस व बीजीडब्ल्यू रूग्णालय, बस स्थानक व रेल्वे स्थानकावर लोकांना जेवण दिले जात होते. मात्र आता ‘लॉकडाऊन’मुळे अचानकच लोकांची संख्या वाढली असून दररोज सुमारे तीन हजार जणांच्या जेवणाची व्यवस्था केली जात आहे. यामध्ये केटीएस, बीजीडब्ल्यूमधील सुमारे दोन हजार २०० जणांचा समावेश त्यांना गाडीने जेवण पोहचविले जात आहे. तर अन्य खासगी रूग्णालयातील सुमारे ८०० जणांना कार्यकर्ते दुचाकीने पॅकेट पोहचवित आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस