लोकमत न्यूज नेटवर्कमुंडीकोटा : स्नेह संमेलन विद्यार्थ्यांसाठी एक पर्वणी असते व यामुळे प्रत्येक विद्यार्थी उत्साहित होतो. स्नेह संमेलन एक प्रेमाचे संमेलन असते व येथे विद्यार्थी आपली कला दाखविण्यासाठी आसूरलेला असतो. स्नेह संमेलनातून विद्यार्थ्यांना सुप्त गुणांना वाव मिळत असतानाच त्यांच्या कला जागृत होतात असे प्रतिपादन माजी आमदार दिलीप बंसोड यांनी केले.जवळील ग्राम मनोरा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्यावतीने आयोजित स्नेह संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना पाहुणे म्हणून ते बोलत होते. उद्घाटन पंचायत समिती सदस्य उषा किंदरले तर रंगमंचपूजन माजी खासदार मधुकर कुकडे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच राजेश पेशने, निशीकांत पेठे, अॅड. नरेश शेंडे, सरपंच राजू कापसे, रंजीत रामटेके, मुख्याध्यापक आर.डी. बागडे, एन.पी. वडीचार, जे.एस. चोपकर, एस.जी. बोंदरे, ओ.जे. बिसने उपस्थित होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी लेझीम, एकांकिका, लावणी, रेकार्डिंग डान्स, छत्तीसगडी व गोंडी नृत्य सादर केले. सोबतच बाल आनंद मेळावा, विविध मैदानी खेळ, महिलांसाठी हळदीकुंकू व रांगोळी स्पर्धा तसेच फॅशन शो घेण्यात आले.बक्षीस वितरण राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष पंचम बिसेन यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून रविकांत बोपचे, जि.प. सदस्य मनोज डोंगरे, घनश्याम खोब्रागडे यांच्या हस्ते करण्यात आले. संचालन वडीचार यांनी केले. आभार चोपकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी एस.जी. बोंद्रे तसेच शाळा समितीच्या पदाधिकारी व सदस्यांनी सहकार्य केले.
स्नेह संमेलनातून कला जागृत होतात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 05:00 IST
स्नेह संमेलन एक प्रेमाचे संमेलन असते व येथे विद्यार्थी आपली कला दाखविण्यासाठी आसूरलेला असतो. स्नेह संमेलनातून विद्यार्थ्यांना सुप्त गुणांना वाव मिळत असतानाच त्यांच्या कला जागृत होतात असे प्रतिपादन माजी आमदार दिलीप बंसोड यांनी केले.
स्नेह संमेलनातून कला जागृत होतात
ठळक मुद्देदिलीप बंसोड : मनोरा येथील जिल्हा परिषद शाळेचे स्नेह संमेलन