मेडिकलचे सीटीस्कॅन सहा महिन्यापासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 05:00 AM2020-08-03T05:00:00+5:302020-08-03T05:00:53+5:30

मेडिकलमधील सिटी स्कॅन मशीन मागील सहा महिन्यापासून बंद आहे.नवीन सीटीस्कॅन मशिन येऊन दोन महिन्यांचा कालावधी लोटला. परंतु ही मशीन चालू करण्यावर कोणतेही उपाय करण्यात आले नाही. जुनी बंद असलेली मशीन दुरूस्त करण्यासंदर्भात वैद्यकीय अधिष्ठातांनी कोणतीही हालचाल केली नाही. किंवा नवीन मशीन सुरू करण्याची तयारीही दाखविली नाही.

Medical CT scan has been closed for six months | मेडिकलचे सीटीस्कॅन सहा महिन्यापासून बंद

मेडिकलचे सीटीस्कॅन सहा महिन्यापासून बंद

Next
ठळक मुद्देरूग्णांचे हाल : गोरगरीब रुग्णांना १२ हजार हजार रुपयांचा भुर्दंड

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गोरगरीबांच्या आरोग्याची देखरेख करण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नातून गोंदियात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल) सुरू करण्यात आले. परंतु जिल्हा सामान्य रूग्णालयापेक्षा निकृष्ट दर्जाचे सेवा देणारे हे वैद्यकीय महाविद्यालय आता स्वत:च आजारी पडले आहे. मागील सहा महिन्यापासून येथील रूग्णांना सीटीस्कॅनची सोय नाही.परिणामी रुग्णांना खासगी रुग्णालयात जावे लागत असल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
येथील मेडिकलमधील सिटी स्कॅन मशीन मागील सहा महिन्यापासून बंद आहे.नवीन सीटीस्कॅन मशिन येऊन दोन महिन्यांचा कालावधी लोटला. परंतु ही मशीन चालू करण्यावर कोणतेही उपाय करण्यात आले नाही. जुनी बंद असलेली मशीन दुरूस्त करण्यासंदर्भात वैद्यकीय अधिष्ठातांनी कोणतीही हालचाल केली नाही. किंवा नवीन मशीन सुरू करण्याची तयारीही दाखविली नाही. त्यामुळे येथील गोरगरीब रूग्णांशी मेडिकलला काहीच देणेघेणे नसल्याचे दिसून येते. मागील सहा महिन्यांपासून बंद असलेली सीटीस्कॅन मशीन दुरूस्त करण्यासाठी कुठलीच हालचाल करण्यात आली नसल्याची माहिती आहे.जिल्ह्यातील गोरगरिब रुग्णांना आरोग्यविषयक दर्जेदार सुविधा मिळाव्यात त्यांना नागपूरपर्यंत पायपीट करावी लागू नये,यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून शासनाने मेडिकल कॉलेजची स्थापन केली.मात्र याचा गोरगरीब रुग्णांना फायदा होण्याऐवजी नुकसानच अधिक होत आहे. जिल्ह्याच्या आदिवासी व नक्षलग्रस्त भागातील गोरगरीब रुग्ण उपचारासाठी मेडिकलमध्ये येतात. परंतु जिल्ह्याच्या ठिकाणी त्यांना योग्य उपचार मिळत नाही. मेडिकल प्रशासनाच्या उदासिनतेमुळे रूग्णांचे हाल होत आहेत.

खासगी रूग्णालयात मोजावे लागतात १२ हजार
मेडिकलमधील सीटीस्कॅन मशीन सुरू नसल्याने मागील सहा महिन्यापासून रूग्णांना सीटीस्कॅन करण्यासाठी ११ ते १२ हजार रूपये मोजावे खासगी रुग्णालयात मोजावे लागत आहे. कोरोनाच्या काळात लोकांकडे पैसा नसताना त्यांनी सीटी स्कॅनकरीता एवढे पैसे कुठून आणायचे हा प्रश्न आहे.
आंदोलनाचा इशारा
जिल्ह्यातील १४ लाख लोकांसाठी असलेल्या मेडिकलमध्ये सीटीस्कॅन मशीन नाही. त्यामुळे खासगी रूग्णालयात रूग्णांना धाव घ्यावी लागते. जीव वाचविण्यासाठी कर्ज काढून पैसे माजवे लागतात. वैद्यकीय अधिष्ठातांच्या उदासिनतेमुळे ही मशीन अद्याप दुरूस्त झाली नाही, असा आरोप शिवसेनेचे जिल्हा समन्वयक पंकज यादव यांनी केला आहे.मशीन दुरूस्त करा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

Web Title: Medical CT scan has been closed for six months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.