शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

मेडिकलच्या कारभारावर एमसीआयचे ताशेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 6:00 AM

प्राध्यापक व विद्यार्थ्यांना महिला रुग्णालयाच्या तपासणीसाठी वारंवार रस्ता ओलांडून जावे लागत असल्यावर नाराजी व्यक्त केली. इमारत बांधकामाला प्राधान्य देत वैद्यकीय महाविद्यालय एकाच परिसरात आणण्याचे निर्देश दिले. यासर्व बाबीकंडे त्वरीत लक्ष न दिल्यास भविष्यात वैद्यकीय प्रवेशात अडचण निर्माण होण्याची शक्यताही चमूने वर्तविली.

ठळक मुद्देप्रवेशाबाबत शंका : कामकाजात सुधारणा करण्याचे दिले निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालातील (मेडिकल) सावळा गोंधळ अद्यापही कायम आहे. कधी औषधांचा तुडवडा तर कधी रुग्णांची गैरसोय यामुळे हे मेडिकल कॉलेज नेहमीच चर्चेत असते. मेडिकलच्या इमारत बांधकामाचा प्रश्न सुध्दा रेंगाळला असल्याने विविध समस्या निर्माण झाल्या आहे. त्यात मेडिकल कॉउन्सील ऑफ इंडिया (एमसीआय) च्या चमूने दोन दिवसांपूर्वीच मेडिकलला भेट देऊन सोयी सुविधांची पाहणी केली. तेथील असुविधांवर नाराजी व्यक्त करीत मेडिकलच्या कारभारावर ताशेरे ओढल्याची माहिती आहे.मेडिकलसाठी कुडवा परिसरात जागा निश्चित करण्यात आली आहे. पाच वर्षांच्या कालावधी लोटूनही बांधकामाला सुरूवात केली नाही. त्यामुळे विविध समस्या निर्माण झाल्या आहेत.वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत चार सत्रातील एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. २०२०-२१ या शैक्षणिक सत्रात या महाविद्यालयात १५० विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा की नाही, यावर मंथन करण्यासाठी मेडिकल कॉउन्सील ऑफ इंडिया (एमसीआय) च्या चमूने सोमवार व मंगळवारी वैद्यकीय महाविद्यालय परिसराची पाहणी केली. मागील पाच वर्षापासून वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेवर अद्यापही बांधकामाला सुरवात न झाल्याने यावर चमूने तीव्र नाराजी व्यक्त केली. चमूमध्ये गुजरातमधील सुरत येथील डॉ. सचेंद्रकुमार श्रीवास्तव यांच्या नेतृत्वातील, आंध्रप्रदेशातील डॉ.बी.मनोहर, आणि मध्यप्रदेशातील दातिया डॉ.गौर यांचा समावेश होता. महाविद्यालय परिसरात अधिष्ठाता डॉ. व्ही.पी.रुखमोडे यांच्या कक्षात महाविद्यालयातील आस्थापनेवरील पदांची माहिती घेतली.प्राध्यापक व विद्यार्थ्यांना महिला रुग्णालयाच्या तपासणीसाठी वारंवार रस्ता ओलांडून जावे लागत असल्यावर नाराजी व्यक्त केली. इमारत बांधकामाला प्राधान्य देत वैद्यकीय महाविद्यालय एकाच परिसरात आणण्याचे निर्देश दिले. यासर्व बाबीकंडे त्वरीत लक्ष न दिल्यास भविष्यात वैद्यकीय प्रवेशात अडचण निर्माण होण्याची शक्यताही चमूने वर्तविली.या चमूने बाई गंगाबाई रुग्णालय आणि केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयातील सर्वच वार्डांची, औषध केंद्रासह परिसराचे निरीक्षण केले. शासनाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामाकरिता कुडवा येथील ६० एकर जमीन आरक्षित केली आहे. त्याच्या हस्तांतरणाची प्रक्रिया देखील पूर्ण झाली आहे. मात्र अद्याप इमारत बांधकामाचा मुहूर्त सापडलेला नाही.

टॅग्स :Medicalवैद्यकीय