शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
2
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
3
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
4
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
5
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
6
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
7
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
8
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
9
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
10
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
12
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
13
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
14
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
15
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
16
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
17
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
18
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
19
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
20
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समिती झाली ‘आंबट-गोड’

By admin | Updated: April 26, 2017 00:42 IST

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत आजघडीला बघावे तिकडे चिंचच चिंच दिसून येत आहे. जिल्ह्याच्या

चिंचेची आवक सुरू : क्विंटलला पाच ते सात हजार भाव, यंदा उत्पन्न कमी होणार गोंदिया : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत आजघडीला बघावे तिकडे चिंचच चिंच दिसून येत आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागासह लगतच्या जिल्ह्यांमधून गोंदिया बाजार समितीत चिंचेची आवक होत आहे. सध्या पाच ते सात हजार रूपये क्विंटलपर्यंत चिंचेला भाव मिळत आहे. त्यामुळे चिंचेने व्यापून गेलेली बाजार समिती ‘आंबट-गोड’ झाली आहे. चिंच म्हणताच तिच्या आंबटगोड चवीमुळे तोंडाला पाणी सुटते. चिंचही रानमेव्यातील एक प्रकार असून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चिंचेचे उत्पादन होते. धानाचा हा जिल्हा असला तरीही चिंचही मोठ्या प्रमाणात निघत असल्यामुळे जिल्ह्याची चिंचेसाठीही ख्याती आहे. येथील चिंच दक्षिणेकडील आणि पूर्वेकडील राज्यात पाठविली जाते. चिंचेची बाजारपेठ बघता लगतच्या राज्यांतूनही चिंच येथील बाजार समितीत विक्र ीसाठी येते अशी माहिती आहे. एरवी धानाने भरून असलेल्या येथील बाजार समितीत आजघडीला बघावे तिकडे चिंच दिसून येत आहे. शेडमध्ये ठिकठिकाणी चिंचेचे फड लागून ठेवलेले बघावयास मिळत आहे. चिंचेची आवक होत असल्याने एकंदर बाजार समिती चिंचमय झाली आहे. (शहर प्रतिनिधी) मागील वर्षीच्या तुलनेत घट ामागील वर्षी बाजार समिती दररोज २०० ते २५० पोती चिंचेची आवक होत होती. यंदा मात्र चिंचेचे उत्पादन घटल्याने बाजार समितीत पाहिजे त्या प्रमाणात चिंच विक्रीला येत नसल्याने बाजार समितीकडून सांगण्यात आले. सध्या चिंचेला पाच हजार रूपये क्विंटलपासून भाव मिळत आहे. तर चांगल्या चिंचेला सात हजार रूपयांपर्यंतही भाव मिळत आहे. मात्र यंदा दिवसाला फक्त १५-२० पोती चिंचेची आवक असून काही दिवसात ही आवक वाढण्याची शक्यता आहे. मध्यप्रदेश व छत्तीसगडमधून आवक येथील बाजार समितीत चिंचेला चांगला भाव मिळत असल्याने बाजार समितीचे क्षेत्र सोडून जिल्ह्यातील अन्य तालुक्यांतूनही मोठ्या प्रमाणात शेतकरी आपली चिंच येथील बाजार समितीत आणतात. एवढेच नव्हे तर लगतच्या मध्यप्रदेश राज्यातील बालाघाट, बरघाट, वारासिवनी, किरनापूर, लांजीसह अन्य भागांतून व छत्तीसगड राज्यातील डोंगरगड व परिसरातूनही मोठ्या प्रमाणात चिंच येथील बाजार समितीत येत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. यंदा मात्र चिंंचेचे उत्पादन कमी झाल्याने बाजार समितीत सध्या तालुक्यातील ग्रामीण भागातूनच चिंच येत आहे.