शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठ्याची अनेक कामे अपूर्ण; हर घर जल नळयोजना ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 16:47 IST

Gondia : विभागाकडून मात्र योजनेचा निव्वळ गाजावाजा

लोकमत न्यूज नेटवर्क मुंडीकोटा : तिरोडा तालुक्यात जलजीवन मिशनचा मोठा गाजावाजा करून योजना सुरू करण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात अनेक योजना अजूनही पूर्ण झाल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र आहे. या तालुक्यात दोन कंत्राटदारांनी अनेक कामे घेतली आहेत. निधी मिळत नसल्याने या कंत्राटदारांनीही कामे अर्धवट ठेवली आहेत. दरम्यान, अर्धवट कामे करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

१५ ऑगस्ट २०१९ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर नल या योजनेची घोषणा केली. २०२४पर्यंत देशातील प्रत्येक घरात नळाद्वारे पाणीपुरवठा होईल, असे आश्वासन देण्यात आले. जलजीवन योजनेची प्रभावी अंमलबजावणीकरिता पंतप्रधानांनी देशातील सर्वच सरपंचांना पत्र पाठविले. योजनेत सहकार्य करण्याचे आवाहन केले. प्रत्येक व्यक्तीमागे ५५ लिटर पाणी देता येईल, असे नियोजन या योजनेत करावयाचे होते.

लोकसंख्येनुसार तेवढ्या क्षमतेच्या पाण्याच्या टाक्यांचे बांधकाम करावयाचे होते. जिल्ह्यात जि. प. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने या योजनेचा मोठा गाजावाजा केला. मात्र, अनेक ठिकाणी या योजनेच्या कामातील अनियमिता पुढे आली. या विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे गावकऱ्यांना अजूनही 'हर घर नल से जल' योजनेचे पाणी मिळाले नाही.

निधी मिळत नसल्याने कामे ठप्प केवळ तिरोडा तालुक्यातच नव्हे, संपूर्ण जिल्ह्यात निधीअभावी जलजीवनची अनेक कामे प्रलंबित आहेत. ही कामे केव्हा पूर्ण होणार, याबाबत कंत्राटदार काहीच बोलत नाहीत. निधी मिळत नसल्याने सध्या ही कामे अपूर्ण असल्याची माहिती आहे.

माहिती देण्यास टाळाटाळमहाराष्ट्र शासनाने जलजीवन मिशन ही योजना सुरू केली. त्यात प्रत्येक घरी नळ व शुद्ध पिण्याचे पाण्याची योजना आखली आहे. तिरोडा तालुक्यात किती कोटी रकमेची कामे मंजूर आहेत. किती कामे पूर्ण झाली आहेत. किती कामे अपूर्ण आहेत. याची कनिष्ठ अभियंता यांना विचारणा करण्यासाठी त्यांच्या मोबाइ- लवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. 

टॅग्स :water transportजलवाहतूकwater scarcityपाणी टंचाईgondiya-acगोंदिया