शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

मनोहरभाई पटेल हायस्कूलची अनुश्री जिल्ह्यात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 21:06 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल शनिवारी (दि.८) जाहीर करण्यात आला. यात गोंदिया जिल्ह्याचा निकाल ६८.४६ टक्के लागला असून नागपूर विभागात गोंदिया जिल्हा दुसऱ्या स्थानी आहे.

ठळक मुद्देनागपूर विभागात जिल्हा दुसऱ्या स्थानी । मागील वर्षीच्या तुुलनेत टक्केवारीत घट

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल शनिवारी (दि.८) जाहीर करण्यात आला. यात गोंदिया जिल्ह्याचा निकाल ६८.४६ टक्के लागला असून नागपूर विभागात गोंदिया जिल्हा दुसऱ्या स्थानी आहे. देवरी येथील मनोहरभाई पटेल हायस्कूलची विद्यार्थिनी अनुश्री हेमंतकुमार भेंडारकर हिने ९५.६० टक्के गुण घेवून जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकाविला. तर आमगाव येथील आदर्श विद्यालयाचा विद्यार्थी साहिल गुंजन बोपचे याने ९५.४० टक्के गुण घेवून व्दितीय, आमगाव तालुक्यातील ठाणा येथील संत जैरामदास विद्यालयाची रुपाली भूमेश्वर गिरीपुंजे हिने ९४.८० टक्के गुण घेवून तृतीय क्रमांक तर अर्जुनी मोरगाव येथील जीएमबी इंग्लिश हायस्कूलची विद्यार्थिनी कल्याणी सोनवाने हिने ९४.६८ टक्के गुण घेवून चतुर्थ क्रमांक पटकाविला.मागील वर्षी दहावी परीक्षेच्या निकालात गोंदिया जिल्हा विभागात प्रथम स्थानी होता. तर यंदा जिल्ह्याची दुसºया स्थानी घसरण झाली आहे. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत निकालात घट झाली असून बारावीप्रमाणेच दहावीच्या निकालातही मुलींनीच बाजी मारली असून ७४.१३ टक्के मुली उर्तीण झाल्या आहेत. दहावीच्या परीक्षेला जिल्ह्यातील एकूण २१ हजार ५७ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १४ हजार ४१६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात ६६४० विद्यार्थी तर ७७७६ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. २६६० विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उर्तीण झाले. प्रथम श्रेणीत ६७९३ तर व्दितीय श्रेणीत ४५४७ विद्यार्थी उत्तीण झाले. जिल्ह्याचा एकूण निकाल ६८.४६ टक्के लागला.मात्र मागील वर्षीच्या तुलनेत जिल्ह्याचा निकालात १९.०९ टक्क्यांनी घट झाली आहे.विशेष म्हणजे मागील वर्षी गोंदिया जिल्ह्यातील ४३ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला होता. मात्र यंदा केवळ १४ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.देवरी येथील मनोहरभाई पटेल हायस्कूलची विद्यार्थिनी अनुश्री हेमंतकुमार भेंडारकर हिने ९५.६० टक्के गुण घेवून जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकाविला. तर आमगाव येथील आदर्श विद्यालयाचा विद्यार्थी साहिल गुंजन बोपचे याने ९५.४० टक्के गुण घेवून व्दितीय तर आमगाव तालुक्यातील ठाणा येथील संत जैरामदास विद्यालयाची रुपाली भूमेश्वर गिरीपुंजे हिने ९४.८० टक्के गुण घेवून तृतीय तर अर्जुनी मोरगाव येथील जीएमबी इंग्लिश हायस्कूलची विद्यार्थिनीनी कल्याणी सोनवाने हिने ९४.६८ टक्के गुण घेवून चतुर्थ क्रमांक पटकाविला. गुजराती नॅशनल हायस्कूलची विद्यार्थी ९४ टक्के गुण प्राप्त केले तर विवेक मंदिर विद्यालयाची लिपाक्षी जैन कुंभलवार हिने ९३.४० टक्के, रविंद्रनाथ टॅगोर हायस्कूलची साक्षी अग्रवाल हिने ९२ टक्के गुण प्राप्त केले. विशेष म्हणजे निकालाची टक्केवारी पाहता शहरीभागापेक्षा ग्रामीण भागातील विद्यार्थी पुढे आहेत.दहावीतही सावित्रीच्या लेकीच सरसपंधरा दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या बारावीच्या परीक्षेच्या निकालात मुलांपेक्षा मुलींची उर्तीण होण्याची टक्केवारी अधिक होती. तिच पंरपरा दहावीच्या निकालात सुध्दा कायम आहे. दहावीच्या परीक्षेत ६६४० विद्यार्थी तर ७७७६ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. मुलांच्या उर्तीण होण्याची टक्केवारी ही ६२.८४ टक्के तर मुलींच्या उर्तीण होण्याची टक्केवारी ७४.१३ टक्के आहे.त्यामुळे दहावीच्या परीक्षेतही सावित्रीच्या लेकीच सरस ठरल्या.निकाल घसरला मात्र टक्केवारी सुधारलीमागील वर्षी गोंदिया जिल्ह्याचा दहावीचा निकाल ८७.५५ टक्के लागला होता. मात्र यंदा जिल्ह्याच्या निकालात १९.०९ टक्क्यांनी घट झाली आहे. निकालाची टक्केवारी जरी घटली असली तरी विद्यार्थ्यांच्या गुणांच्या टक्केवारीत मात्र सुधारणा झाली आहे. २६६० विद्यार्थी ९० टक्के पेक्षा अधिक गुण घेवून उर्तीण झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारत असल्याचे दिलासा दायक चित्र आहे.केवळ १४ शाळांनी गाठली शंभरीदहावीच्या निकालात यंदा आदिवासी बहुल देवरी तालुक्यांने आघाडी घेतली आहे. देवरी येथील मनोहरभाई पटेल हायस्कूलची विद्यार्थिनी अनुश्री भेंडारकर हिने जिल्ह्यात अव्वल स्थान पटकाविले आहे.मात्र यंदा जिल्ह्यातील केवळ १४ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.तर मागील वर्षी ४३ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला होता. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत शंभर टक्के निकाल देणाºया शाळेच्या संख्येत घट झाली असून ही बाब शाळांसाठी चिंतनाची आहे.सीबीएसई शाळा बोर्डाच्या परीक्षेत माघारल्यासीबीएसई अभ्यासक्रमाच्या दहावीच्या परीक्षेत जिल्ह्यातील सीबीएसई शाळांनी शंभर टक्के निकाल दिला होता. तसेच बारावी सीबीएसई परीक्षेत सुध्दा चांगला निकाल दिला होता. मात्र या शाळांना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेच्या निकालात शंभर टक्के निकाल देण्यात यश आले नाही. त्यामुळे या सीबीएसई शाळा दहावी बोर्डाच्या निकालात माघारल्याचे चित्र आहे.आता पालकांचे लक्ष मिशन अ‍ॅडमिशनकडेदहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आपल्या पाल्याला त्याच्या आवडत्या शाखेत प्रवेश मिळावा, यासाठी पालकांची धडपड सुरू होते. त्यामुळे निकालानंतर आता पालक विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी लगबग सुरू झाली आहे. सोमवारपासून विविध महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची गर्दी दिसणार आहे.निकालात सालेकसा तालुका आघाडीवरमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेच्या तालुकानिहाय निकालावर नजर टाकल्यास यात सालेकसा तालुका जिल्ह्यात अव्वल ठरला आहे. या तालुक्याचा इयत्ता दहावीचा निकाल ७२.२३ टक्के लागला. तर गोंदिया ६९.७६, आमगाव ६९.६४, अर्जुनी मोरगाव ६७.४३, देवरी ६१.४५ टक्के, गोरेगाव ६६.१५, सडक अर्जुनी ६८.४३, तिरोडा ६९.९६ टक्के लागला. मागील वर्षी दहावीच्या निकालात सालेकसा तालुका जिल्ह्यात दुसºया स्थानी होता. यंदा त्यात सुधारणा झाली असून प्रथम स्थान पटकाविले आहे. आदिवासी बहुल आणि दुर्गम भागातील शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारत असल्याचे समाधानकारक चित्र आहे.

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकाल