शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

पक्षी अभयारण्य उभारण्याचा मानस

By admin | Updated: December 21, 2015 01:48 IST

गोंदिया जिल्हा हा पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय समृद्ध असून जिल्ह्याच्या विविध भागात स्थलांतरित व विदेशी पक्ष्यांचे थवेच्या थवे दरवर्षी येतात.

राजकुमार बडोले : सारस महोत्सवाचा थाटात शुभारंभगोंदिया : गोंदिया जिल्हा हा पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय समृद्ध असून जिल्ह्याच्या विविध भागात स्थलांतरित व विदेशी पक्ष्यांचे थवेच्या थवे दरवर्षी येतात. सारस महोत्सवाच्या निमित्ताने जिल्ह्यात पक्ष्यांचे अभयारण्य निर्माण करण्याचा मानस असल्याचे मत सामाजिक न्याय मंत्री व पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले. जिल्हा पर्यटन समितीच्यावतीने आयोजित सारस फेस्टिव्हलच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी अतिरिक्त मुख्य सचिव व पालक सचिव पी.एस. मीना, प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय वन्यजीव छायाचित्रकार सुधीर शिवराम, जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, नगराध्यक्ष कशिश जायस्वाल, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रचना गहाणे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे व उपवनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर उपस्थित होते. पुढे बोलताना ना. बडोले यांनी, सारस संवर्धनाचा उपक्रम अतिशय स्तुत्य असून लोप पावत चाललेल्या सारस पक्षाचे संवर्धन करण्यासाठी जिल्हा पर्यटन समितीने घेतलेल्या पुढाकारास सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. सारसच्या निमित्ताने जिल्ह्यात येत असलेल्या विविध पर्यटनस्थळांना पर्यटकांना भेटी देता याव्या, यासाठी पर्यटनाचे जिल्हा सर्किट तयार करण्यात येणार आहे. सारससाठी प्रसिद्ध भरतपूर पेक्षाही जास्त सारस व अन्य पक्ष्यांचे दर्शन जिल्ह्यात होते. यामुळेच जिल्हा पर्यटनाच्या जागतिक नकाशावर आल्याचेही त्यांनी आवर्जुन सांगीतले. वन्यजीव छायाचत्रकार शिवराम यांनी, सारस निमित्ताने गोंदियाला पर्यटन डेस्टीनेशन बनविण्याचा जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे सांगीतले. सारस संवर्धन ही कुणा एकाची जबाबदारी नसून सामुहिक आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून सारस म्हणजे गोंदिया ही ओळख देशभरातील पक्षिप्रेमींना होणार आहे. पक्षिप्रेमी छायाचित्रकारांसाठी गोंदिया अतिशय उपयुक्त व आदर्श ठिकाण असल्याचे सांगत, आपण येथे पक्षी संवर्धन या विषयावर कार्यशाळा घेणार असल्याची घोषणा त्यांनी केली. पालक सचिव मिना यांनी, गोंदिया हे मिनी भरतपूर असल्याचे म्हणत, रासायनिक खते व कीटकनाशकांचा अतिवापर होत असल्यामुळे सारसला याचा धोका होत असून त्यांची संख्या कमी होत आहे. यासाठी या भागातील शेतकऱ्यांनी जैवीक शेती करण्यावर भर देण्याचे आवाहन करीत पशुपक्ष्यांप्रती समाजात करूणा निर्माण झाली तरच पक्षी संवर्धनाचा हेतू यशस्वी होणार असल्याचे ते म्हणाले. प्रास्ताविकात जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी, सारस महोत्सवाची संकल्पना व उद्देश विषद करीत पर्यटनाला चालना देण्यासाठी सारस महोत्सव उपयुक्त ठरणार असल्याचे मत मांडले. गोंदिया सारस डेस्टीनेशन म्हणून प्रमोट करण्याचा हा प्रत्यन असून सारसमुळे जिल्ह्याला नवी ओळख मिळाली असल्याचे ते म्हणाले. तर सारस हा पक्ष्यांचा राजा असल्याचा उल्लेख करीत या महोत्सवाच्या माध्यमातून सारस राज्यातील तसेच देशातील असंख्य पक्षिप्रेमी व पर्यटकांपर्यंत पोहोचविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. संचालन जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे व वन्यजीव प्रेमी मुकुंद धुर्वे यांनी केले. आभार उफपवनसंरक्षक डॉ. रामगावकर यांनी मानले. याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, जिल्हा नियोजन अधिकारी बकुल घाटे, जिल्हा कोषागार अधिकारी दिगांबर नेमाडे, उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे, जिल्हा शक्यचिकित्सक डॉ. रवी धकाते, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरीश कळमकर, विभागीय वनअधिकारी (वन्यजीव) शेखर कातोरे, बसस्थानकाचे आगारप्रमुख गौतम शेंडे, सामाजीक वनीकरणचे कुंभलकर, जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी, वन्यजीव प्रेमी डॉ.राजेंद्र जैन, सावन बहेकार, सुनील धोटे, भरत जसानी, रवि गोलानी, मुनेश गौतम, राजू खोडेचा चेतन जसानी, रूपेश निंबार्ते, त्र्यंबक जरोदे यांच्यासह अन्य छायाचित्रकार व नागरिक उपस्थित मोठया संख्येत होते. विशेष म्हणजे वन्यजीव छायाचित्रकारांसाठी आयोजित कार्यशाळेत वन्यजीव छायाचित्रकार शिवराम यांनी मार्गदर्शन केले. (शहर प्रतिनिधी)