शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

गोंदियातही होवू शकते मलाडची पुनर्रावृत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 05:00 IST

संततधार पावसामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घरांची पडझड होऊन नुकसान होत आहे. शात शहरातील जीर्ण इमारतींबाबतही नियोजन करणे गरजेचे झाले आहे. अन्यथा अप्रिय घटना टाळता येत नाही. करिता नगर परिषदेने जीर्ण इमारतीचे सर्वेक्षण केले असून १६८ जीर्ण इमारत असलेल्या मालकांना नोटीस पाठवून मोकळे होण्यातच धन्यता मानल्याचे चित्र आहे. दरवर्षी पावसाळा आला की जीर्ण इमारतींचा प्रश्न पुढे येतो.

ठळक मुद्देशहरातील १६८ इमारती धोकादायक : नोटीस देऊन नगर परिषद मोकळी : वेळीच कारवाईची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आठवडाभरापूर्वीच मलाड येथील जीर्ण इमारत कोसळून पाच जणांचा जीव गेला तर अनेक जण जखमी झाले. जीर्ण झालेल्या इमारती वेळीच पाडण्याची कारवाई स्थानिक प्रशासनाकडून केली जात नसल्यानेच अशा घटना घडत आहे. गोंदिया शहरात सुध्दा १६८ जीर्ण इमारती असून त्या केव्हाही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र नगर परिषदेने अद्यापही याची दखल घेतली नसल्याने गोंदियातही मलाडच्या घटनेची पुनर्रावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.संततधार पावसामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घरांची पडझड होऊन नुकसान होत आहे. शात शहरातील जीर्ण इमारतींबाबतही नियोजन करणे गरजेचे झाले आहे. अन्यथा अप्रिय घटना टाळता येत नाही. करिता नगर परिषदेने जीर्ण इमारतीचे सर्वेक्षण केले असून १६८ जीर्ण इमारत असलेल्या मालकांना नोटीस पाठवून मोकळे होण्यातच धन्यता मानल्याचे चित्र आहे. दरवर्षी पावसाळा आला की जीर्ण इमारतींचा प्रश्न पुढे येतो. जीर्ण इमारतीं संदर्भात ओरड वाढल्यानंतर नगर परिषद इमारत मालकांना नोटीस देऊन मोकळी होते. पण अद्यापही एकही जीर्ण झालेली इमारत नगर परिषदेने धडक कारवाई करीत पाडल्याचे ऐकिवात नाही.दोन दिवसांपूर्वीच शहरातील दुर्गा चौक परिसरातील एक जीर्ण इमारत कोसळली. सुदैवाने यात कुठलेही जिवित हानी झाली नाही. शहरात अशा अनेक जीर्ण इमारती असून त्याची नोंद सुध्दा नगर परिषदेकडे आहे. पण कारवाई करण्यासाठी कुचराई केली जात आहे. पावसाळ््यात माती तसेच जुन्या जीर्ण झालेल्या इमारती पडण्याच्या घटना घडतात. मलाड येथे नुकताच हा प्रकार घडला असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असतानाच प्राण हानीही झाली आहे. जीवापेक्षा जास्त किंमती वस्तू दुसरी नाही. मात्र घर पडल्यानंतर अवघे कुटुंबच उघड्यावर येते. अशात पावसाळ््यात अशा घरांमध्ये राहणे म्हणजे जीव धोक्यात घालण्याचाच प्रकार असतो.जिल्ह्यात यंदा संततधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात घरांची अंशत: व पूर्णत: पडझड झाली आहे. पावसाळ््यात निर्माण होणाऱ्या या धोक्याची कल्पना लक्षात घेत नगर परिषदेने नगर रचना विभागामार्फत शहरातील जीर्ण इमारतींचे सर्वेक्षण करवून घेतले. यात १६८ इमारती जीर्ण आढळून आल्या आहेत. या इमारत मालकांना नगर परिषदेने नोटीस बजावली. यातील काही इमारती जीर्ण व धोकादायक आहेत. काही वास्तव्यासाठी अयोग्य असून निष्काशीत करावयाच्या आहेत. काहींना दुरूस्तीची गरज असल्याचे दिसून आले आहे. मात्र संबंधितांना नगर परिषदेच्या नोटीस नंतरही त्यावर काहीच पावले उचललेली दिसत नाही.जीर्ण इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट नाहीशहरातील जीर्ण आणि धोकादायक इमारतींचा प्रश्न बऱ्याच वर्षांपासून कायम आहे. पण अद्यापही इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करुन त्या इमारती पाडण्याची कारवाई करण्यात आली. तर बऱ्याच जीर्ण झालेल्या इमारती या बड्या व्यक्तींच्या असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी नगर परिषदेकडून कुचराई केली जात आहे.अन्यथा अप्रिय घटनेची शक्यतामलाड येथे घडलेल्या प्रकाराने सर्वांनाच हादरवून सोडले आहे. अशात नगर परिषदेने शहरातील जीर्ण इमारतीत वास्तव्यास असलेल्या नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वेळीच कारवाई करण्याची गरज आहे. दरवर्षी नगर परिषद सर्वेक्षण करते व त्या पलीकडे काहीच होत नाही.आता मात्र मुख्याधिकारी करण चव्हाण यांनी वेळीच कारवाई करण्याची गरज आहे अन्यथा मलाडच्या घटनेची पुनर्रावृत्ती येते टाळता येणार नाही.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिका