शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
2
अखेर मुहूर्त सापडला! वैभव खेडेकरांचा भाजपा प्रवेश झाला, मनसेला फटका, राजकीय समीकरणे बदलणार
3
असाही असतो बॉस! कामाचा ताण नाही, फक्त मनसोक्त आराम; म्हणाले दिवाळीत २ किलो वजन वाढवून या
4
...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात'
5
हवेतच कतार एअरवेजच्या विमानात बिघाड; अहमदाबादमध्ये इमर्जन्सी लँडिंग, मोठा अपघात टळला!
6
LIC कडून दिवाळीचा 'डबल धमाका'! मध्यमवर्गीयांसाठी २ नवीन 'रिस्क फ्री' योजना लाँच, शेअर झाला रॉकेट
7
मंत्रिमंडळ मोठे निर्णय! बांबू उद्योग धोरण जाहीर, ५ लाख रोजगार; मुंबई HC मध्ये २२२८ पदांना मान्यता
8
राज ठाकरे पहिल्यांदाच ‘मविआ’ नेत्यांसोबत दिसले; CM फडणवीस म्हणाले, “भाजपा अन् महायुती...”
9
हरयाणात काय चाललंय? ASI ची गोळी झाडून आत्महत्या; दिवंगत IPS पूरन कुमार यांच्यावर गंभीर आरोप
10
"अशी निवडणूक पद्धत भारतात कुठेच नाही, मग फक्त महाराष्ट्रातच का लागू आहे?"; निवडणूक आयोगाला घेरले, 'मविआ'च्या पत्रात काय?
11
१९९० मध्ये १ किलो सोन्याची किंमत मारुती ८०० एवढी होती, आज लँड रोव्हरएवढी झालीय, २०४० मध्ये...; उद्योगपतीने हिशेबच मांडला
12
पैसाच पैसा! माकडाने पळवली ५० हजारांची बॅग; झाडावर चढला, केला ५०० रुपयांच्या नोटांचा वर्षाव
13
नाकेबंदीदरम्यान हवालाची रक्कम लुटली, बड्या महिला पोलिस अधिकाऱ्यासह ५ जण अटकेत   
14
“डोळ्यांत पाणी, उद्ध्वस्त घरे, थंड पडलेले सरकार अन् शेतकऱ्यांचे दिवाळे”: विजय वडेट्टीवार
15
गुजरात कॅबिनेटमध्ये मोठा फेरबदल; रवींद्र जडेजाच्या पत्नीला मंत्रिपदाची लॉटरी...
16
दिवाळीला घरी आणा नवी कोरी दुचाकी! देशातील सर्वात स्वस्त ५ बाईक्स, मायलेज-फीचर्स सर्वच दमदार
17
4G आले तरी... २० वर्षांचा प्रवास थांबला, ग्राहक बीएसएनलच्या सेवेला वैतागला, अखेर पोर्टिंगचा निर्णय घेतला...
18
माओवादी चळवळीला मोठा हादरा ! नक्षल्यांचा नेता ‘भूपती’सह ६० जणांनी पोलिसांसमोर केले आत्मसमर्पण
19
इंटरनेटशिवाय करता येणार पेमेंट; RBI ने लॉन्च केला ‘ऑफलाइन डिजिटल रुपया’, जाणून घ्या...

योजनांचा लाभ देण्याची प्रक्रिया सुलभ करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 22:11 IST

काँग्रेस सरकारने देशातील प्रत्येकच वर्गातील नागरिकांच्या लाभासाठी कित्येक योजना बनविल्या आहेत. सरकारने गरिबांना सांभाळण्याचे कार्य केले. मात्र कित्येक लाभार्थी या योजनांसाठी विविध विभागातील कागदपत्र जुळविण्यात असमर्थ राहतात व योजनांचा लाभ मिळवू शकत नाही.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : फुलचूरपेठ येथील वैयक्तिक लाभाच्या योजनांचे शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : काँग्रेस सरकारने देशातील प्रत्येकच वर्गातील नागरिकांच्या लाभासाठी कित्येक योजना बनविल्या आहेत. सरकारने गरिबांना सांभाळण्याचे कार्य केले. मात्र कित्येक लाभार्थी या योजनांसाठी विविध विभागातील कागदपत्र जुळविण्यात असमर्थ राहतात व योजनांचा लाभ मिळवू शकत नाही. त्यात या गरजुपर्यंत योजना पोहोचविण्यात शासकीय विभाग उदासीन आहेत. त्यामुळे या योजनांचा लाभ सामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रक्रीया सुलभ करण्याची गरज असून ही बाब शासनापर्यंत पोहचविण्याचे कार्य करणार असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.ग्राम फुलचूरपेठ येथे आयोजीत वैयक्तीक लाभाच्या योजनांच्या शिबिरात ते बोलत होते. याप्रसंगी सरपंच पुष्पलता मेश्राम यांनी, आमदार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात वैयक्तीक योजनांचा लाभ प्रत्येकापर्यंत पोहचविण्यासाठी शिबिरांचे आयोजन केले जात आहे. समाजातील अंतीम व्यक्तीपर्यंत योजना पोहचविण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जाणार असल्याचे आश्वासन दिले.याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी, सभापती रमेश अंबुले, पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे, उपसभापती चमन बिसेन, स्नेहा गौतम, योगराज उपराडे, प्रकाश रहमतकर, अशोक लिचडे, अशोक इटानकर, अरूण दुबे, जिवन बंसोड, उर्मिला दहीकर, श्याम कावळे, इंदिरा कटरे, दिनेश तिडके, गंगाराम बावनकर, राजा बैस, रवि बोदानी, निशा उईके, अर्चना राऊत, जैतुरा बावने, उपमा पशिने, मनीष गौतम, लक्ष्मी निर्वीकार, शिवराम सव्वालाखे, महेंद्र सोनवाने, महफुस पठाण, संजय वैद्य, साहिस्ता शेख, देवचंद चोपकर, कैलाश उईके, पुरूषोत्तम भांडारकर, महादेव दहीकर, राजेश उईके, प्रभू पुराम, दिनेश गौतम, मुकेश लिल्हारे, दादू ठाकरे, भरत पाटील यांच्यासह मोठ्या संख्येत नागरीक उपस्थित होते.अर्जदारांना त्रास देऊ नकाआमदार अग्रवाल यांनी, गरीब नागरिक अगोदरच आपल्या समस्यांनी ग्रस्त असतात. यामुळेच ते शासकीय योजनांना आधार घेण्यासाठी येतात. यामुळे योजनांच्या लाभासाठी येणाऱ्या गरजु अर्जदारांना टोलवाटोलवी करुन त्रास देऊ नका अशा सूचना शिबिराला उपस्थित विविध शासकीय विभागाच्या अधिकाºयांना दिल्या. त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून त्यांना सोडविण्याचे निर्देश उपस्थित अधिकाºयांना दिले. शिबिरात २५० हून अधीक अर्ज प्राप्त झाले. सर्वाधीक ५५ रेशनकार्ड, ७० उत्पन्नाचे दाखले, २७ संजय गांधी व श्रावण बाळ योजना, १३ मतदानकार्ड व २७ शासकीय चिकीत्सक प्रमाणपत्राचे अर्ज आहेत.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल