शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
6
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
7
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
8
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
9
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
10
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
11
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
12
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
13
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
14
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
16
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
17
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
18
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
19
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
20
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे

शेतकऱ्यांना बारदाणा उपलब्ध करुन द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 10:31 PM

आदिवासी विकास महामंडळाचे शासकीय धान खरेदी केंद्र सुरू होवून महिनाभराचा कालावधी लोटत आहे. मात्र या केंद्रावर अद्यापही बारदाणा उपलब्ध करुन देण्यात आला नाही. परिणामी शेतकºयांना बाहेरुन अतिरिक्त दराने बारदाणा खरेदी करुन धान विक्री करावी लागत आहे.

ठळक मुद्देयुवक काँग्रेसची मागणी : तहसीलदारांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरी : आदिवासी विकास महामंडळाचे शासकीय धान खरेदी केंद्र सुरू होवून महिनाभराचा कालावधी लोटत आहे. मात्र या केंद्रावर अद्यापही बारदाणा उपलब्ध करुन देण्यात आला नाही. परिणामी शेतकºयांना बाहेरुन अतिरिक्त दराने बारदाणा खरेदी करुन धान विक्री करावी लागत आहे. त्यामुळे आधीच नैसर्गिक संकटांना तोंड देत असलेल्या शेतकºयांना शासनाच्या वेळकाढू धोरणाचा फटका बसत आहे. त्यामुळे आदिवासी विकास महामंडळाच्या सर्वच शासकीय धान खरेदी केंद्रावर त्वरीत बारदाणा उपलब्ध करुन देण्यात यावा.अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा तालुका युवक काँग्रेसने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.शासनाच्या वतीने मोठा गाजावाजा करुन आदिवासी विकास महामंडळाच्या शासकीय धान केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. परंतु या धान खरेदी केंद्रावर बारदाणाच उपलब्ध नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहे. शेतकऱ्यांना धानाची विक्री करण्यासाठी गरजेपोटी १५ रुपयांचा बारदाणा २५ रुपयांना खरेदी करावा लागत आहे.यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे शासन आणि प्रशासनाने शासकीय धान खरेदी केंद्रावरील बारदाण्याचा प्रश्न त्वरीत मार्गी लावावा. अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या वेळी दिलेल्या निवेदनातून दिला.शिष्टमंडळात अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष निशांत राऊत, जिल्हा महासचिव अमित राऊत, बांधकाम सभापती रेहान शेख, महेश सोनवाने, विकास डोंगरे, संदीप शहारे, संतोष भंडारी, प्रशांत वैद्य, निकेश उके, नूतन बारसागडे, महेंद्र वंजारी, सुशील बडोले, विस्मय बडोले, सतिश कटरे, संतो भंडारी, कैलास उईके, लोकेश वंजारी, सिद्धार्थ राऊत, शरद नागपुरे, प्रज्वल लांजेवार, राजा पठाण, भरत मेंढे व युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :FarmerशेतकरीTahasildarतहसीलदार