शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

Maharashtra Election 2019 : विकास कामांमुळे जनतेचे भाजपवर प्रेम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 5:00 AM

तालुक्यातील मोहगाव तिल्ली येथे सोमवारी आयोजित प्रचारसभेला संबोधित करताना ते बोलत होते. या वेळी प्रामुख्याने भाजप जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, लक्ष्मण भगत, सिता रंहागडाले, विश्विजत डोंगरे, दिलीप चौधरी, किशोर गौतम, झुम्मकभाऊ बिसेन, खोमेंद्र मेंढे, अशोक लंजे, नितीन कटरे, सुरेंद्र धमगाये यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. मोहगाव येथे राजकुमार बडोले यांचे आगमन होताच पदाधिकारी,कार्यकर्ते आणि गावकऱ्यांनी त्यांचे ढोलताशाच्या गजरात जोरदार स्वागत केले.

ठळक मुद्देराजकुमार बडोले : गोरेगाव तालुक्यात प्रचारसभा

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : मागील पाच वर्षांत केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारच्या माध्यमातून अनेक विकास कामे करण्यात आली. सत्तेवर येण्यापूर्वी भाजपने जी जी आश्वासने दिली होती ती पूर्ण करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला.त्यामुळे भाजपप्रती जनतेचा विश्वास आणि प्रेम वाढत चालले आहे. जनतेच्या प्रेम आणि विश्वासाची परतफेड आपण नक्कीच विकास कामांच्या माध्यमातून करु असे प्रतिपादन अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघाचे भाजप-सेना युतीचे उमेदवार राजकुमार बडोले यांनी केले.तालुक्यातील मोहगाव तिल्ली येथे सोमवारी आयोजित प्रचारसभेला संबोधित करताना ते बोलत होते. या वेळी प्रामुख्याने भाजप जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, लक्ष्मण भगत, सिता रंहागडाले, विश्विजत डोंगरे, दिलीप चौधरी, किशोर गौतम, झुम्मकभाऊ बिसेन, खोमेंद्र मेंढे, अशोक लंजे, नितीन कटरे, सुरेंद्र धमगाये यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. मोहगाव येथे राजकुमार बडोले यांचे आगमन होताच पदाधिकारी,कार्यकर्ते आणि गावकऱ्यांनी त्यांचे ढोलताशाच्या गजरात जोरदार स्वागत केले. गावातील महिलांनी त्यांची ओवाळणी व औक्षवन करुन स्वागत केले.बडोले यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानत आपल्यावरील प्रेम यापुढेही असे कायम राहू अशी भावनिक साद घातली.मागील निवडणुकीत काळात सामाजिक न्याय विभागाचा मंत्री म्हणून दीन दुबळया, शोषित, वंचित, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, निराधार लोकांना न्याय देण्याचे कार्य केले. मतदारसंघात मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, जलयुक्त शिवार, मुख्यमंत्री पेयजल योजना, दिव्यांगाना साहित्य वाटप, कामगार बांधवांना किट वाटप तसेच पाल्यांना व कुटुंबांना शैक्षणिक व आर्थिक लाभ अशा अनेक योजनांचा माध्यमातून सामान्य माणसांचा विकास साधण्याचा प्रयत्न केला. राज्यात पुन्हा भाजप-सेना महायुतीचे सरकार येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध आहोत. या क्षेत्राचा कायापालट करण्याचे विकासाचे व्हिजन हे केवळ भाजपकडेच असून यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्य व आशिर्वादाची गरज असल्याचे ते म्हणाले. या वेळी निंबा येथील राष्ट्रवादी व काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. प्रचारसभेनंतर त्यांनी पदयात्रेच्या माध्यमातून बडोले यांनी मतदारांशी संवाद साधला. त्यांच्या पदयात्रेत मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते सहभागी झाले होते.मतदारांच्या प्रेम आणि आदरतिथ्याने बडोलेही भारावलेगोरेगाव तालुक्यातील तिल्ली मोहगाव येथे सोमवारी राजकुमार बडोले यांची प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती.या वेळी गावकऱ्यांनी फुलांची उधळण करुन तर महिलांनी त्यांची औक्षवन आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मतदारांकडून झालेल्या आदरतिथ्याने बडोले सुध्दा भारावले होते.

टॅग्स :goregaon-acगोरेगाव