शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

Maharashtra Election 2019 ; नितीन गडकरींनी मोबाईलवरुन केले सभेला संबोधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 06:00 IST

खराब वातावरणामुळे नियोजीत दौरा रद्द झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. गडकरी म्हणाले, जगात भारताला महाशक्ती बनविण्याचे स्वप्न भारतीय जनता पक्षाचे आहे. यासाठी प्रत्येक क्षेत्राचा विकास हाच एक महत्वाचा मुद्या ठरतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राने जी विकासाची कास धरली आहे, ती कायम राहण्यासाठी भाजप उमेदवारांना साथ द्या असे सांगितले.

ठळक मुद्देखराब वातावरणामुळे दौरा रद्द : विकासाला साथ देण्याची घातली साद

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : भाजप-सेना युतीचे गोंदिया विधानसभा क्षेत्राचे उमेदवार गोपालदास अग्रवाल यांच्या निवडणूक प्रचारार्थ शुक्रवारी (दि.१८) येथील सर्कस मैदानावर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. मात्र खराब वातावरणामुळे नागपूर येथून हेलिकाप्टरचे उड्डाण होऊ शकले नाही. त्यामुळे गडकरींना आपला नियोजित दौरा रद्द करावा लागला. मात्र सर्कस मैदानावर सभेला उपस्थित असलेल्या जनतेचा हिरमोढ होऊ नये यासाठी त्यांनी मोबाईलवरुन सभेला संबोधित केले.मतदारसंघात विकासाची गंगा आणण्यासाठी साथ देण्यास सांगितले.सभेला प्रामुख्याने मध्यप्रदेशचे माजी कृषीमंत्री आ.गौरीशंकर बिसेन, भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत पटले,उमेदवार गोपालदास अग्रवाल, आ.रामिकशोर कावरे, शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश शिवहरे, जि.प.अध्यक्षा सीमा मडावी, नगराध्यक्ष अशोक इंगळे, माजी आ.खोमेश रहांगडाले, भाजपा महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा भावना कदम, जि.प.चे माजी अध्यक्ष नेतराम कटरे, शहर अध्यक्ष सुनील केलनका, पंकज यादव, रिपाई जिल्हाध्यक्ष राजेश रामटेके, दिनेश दादरीवाल, संजय कुळकर्णी, नंदकुमार बिसेन, अशोक चौधरी, पं.स.सभापती माधुरी हरिणखेडे, सभापती रमेश अंंबुले, राजकुमार नोतानी, गणेश हेमणे, संतोष चव्हाण, डॉ. प्रशांत कटरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. खराब वातावरणामुळे गडकरी यांचा नियोजित दौरा रद्द झाल्याने त्यांनी भाजप जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांच्या मोबाईलवर कॉल केला. यानंतर पटले यांनी मोबाईल माईकला लावला. गडकरी यांनी पाच ते दहा मिनिटे मोबाईलवरुन सभेला संबोधित केले. खराब वातावरणामुळे नियोजीत दौरा रद्द झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. गडकरी म्हणाले, जगात भारताला महाशक्ती बनविण्याचे स्वप्न भारतीय जनता पक्षाचे आहे. यासाठी प्रत्येक क्षेत्राचा विकास हाच एक महत्वाचा मुद्या ठरतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राने जी विकासाची कास धरली आहे, ती कायम राहण्यासाठी भाजप उमेदवारांना साथ द्या असे सांगितले. गोपालदास अग्रवाल हे एक विकासाचे व्हिजन असलेले त्यांचे व्यक्तिमत्व आहे. भारतीय जनता पक्षाचे व्हिजन केवळ सर्वसामान्यांचा विकास हेच असल्याने यांनी अग्रवाल यांनी भाजपात प्रवेश केल्याचे सांगितले. 

टॅग्स :gondiya-acगोंदियाNitin Gadkariनितीन गडकरी