शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! आनंदराज आंबेडकरांची एकनाथ शिंदेंना साथ; शिंदेसेना-रिपब्लिकन सेनेच्या युतीची घोषणा
2
बाबर क्रूर, अकबर सहिष्णू तर औरंगजेब मंदिर पाडणारा', NCERT ने पुस्तकात केले मोठे बदल
3
गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने कसे कमावले पैसे, भारतात स्थायिक होण्याचे कारणही सांगितले
4
मुलाच्या हव्यासापोटी जन्मदाता बापच झाला हैवान; ७ वर्षांच्या लेकीला कालव्यात फेकून मारलं
5
एकटे PM मोदीच आठवड्याला १०० तास काम करतात; '७० तास'वरून ट्रोल झालेल्या नारायण मूर्तींचं प्रशस्तीपत्रक
6
गुवाहाटीची रहीमा सोनमपेक्षाही भयंकर! पतीला संपवलं अन् बेडरूमध्येच गाडलं, शांततेत झोपली; कशी पकडली गेली?
7
चला हवा येऊ द्या! CHYD चं नवं शीर्षक गीत रिलीज; कॉमेडीच्या गँगवॉरची झलक बघा
8
मस्क अजूनही नंबर १, पण झुकरबर्गला बसला मोठा धक्का! AI च्या कामगिरीने 'हा' उद्योगपती झाला जगात दुसरा श्रीमंत!
9
IND vs ENG: शुभमन गिलने कोहलीसारखा ब्रँड बनण्याचा प्रयत्न करू नये, माजी क्रिकेटपटूचा महत्त्वाचा सल्ला!
10
धक्कादायक...! डोनाल्ड ट्रम्प यांना भारतात पाठवायचंय 'मांसाहारी दूध', सरकारचा स्पष्ट नकार; जाणून घ्या काय आहे हा संपूर्ण प्रकार?
11
"दीपक काटे चांगले काम करेल म्हटलं होतं, पण..."; गायकवाडांवरील हल्ल्याचा मंत्री बावनकुळेंनी केला निषेध
12
सूर्य गोचराने शुभ राजयोग: ७ राशींचे कल्याण, भाग्याची साथ; महिनाभर ‘हे’ करा, लाभच लाभ मिळवा!
13
कमाल! १ मार्काने नापास झाली पण रडत नाही बसली; जिद्दीने अभ्यास करून स्वप्न केलं साकार
14
ऑस्कर पुरस्कार विजेते सत्यजित रे यांचे बांग्लादेशातील घर पाडले; भारताने दिलेली दुरुस्तीची ऑफर
15
राहुल गांधी पंतप्रधान होणार हे तुम्हाला माहितीये का?; उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला फटकारलं, प्रकरण काय?
16
रात्रीच्या अंधारातही हल्ला करू शकणारे अमेरिकेतून येणार अपाचे हेलिकॉप्टर; पाक सीमेवर होणार तैनात
17
IND vs ENG 3rd Test: आयसीसीचा इंग्लंडला डबल दणका, लॉर्ड्स कसोटी जिंकूनही संघाचा मोठा तोटा! 
18
हॉट मॉडेल, राजघराण्याशी संबंध, रवी शास्त्रींसोबत दिसलेली ही महिला आहे तरी कोण?
19
८ वर्षांत पहिल्यांदाच GST मध्ये होणार बदल! PMO नं प्रस्तावाला दिली मंजुरी; तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

चान्ना आरोग्य केंद्रातील डॉक्टरांचा मुख्यालयाला खो

By admin | Updated: March 8, 2015 01:17 IST

चान्ना (बाक्टी) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी तसेच इतर कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने ग्रामीण भागातील रुग्णांची गैरसोय होत आहे.

बोंडगावदेवी : चान्ना (बाक्टी) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी तसेच इतर कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने ग्रामीण भागातील रुग्णांची गैरसोय होत आहे. कर्मचाऱ्यांच्या ये-जा प्रणालिने अनेक रुग्णांना जीव गमवावा लागतो. पीएचसीच्या कर्मचाऱ्यांनी मुख्यालयात राहून रुग्णांची सेवा करावी. मुख्यालयी न राहणारे डॉ. राजीव डोबे यांच्यावर त्वरित कारवाई करण्याची मागणी चान्ना येथील नरेश राखडे यांच्या नेतृत्वाखाली १५ युवकांनी केली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, इतर कर्मचारी मुख्यालयी राहत नाही असा आरोप चान्ना येथील युवा कार्यकर्त्यांनी केला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांसाठी लाखो रुपये खर्च करून निवासाचे बांधकाम करण्यात आले आहे. काही निवासस्थान आजतागायत रिकामेच आहेत. वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले डॉ. राजीव डोबे मुख्यालयाच्या निवासस्थानात न राहता दुसऱ्या ठिकाणावरुन ये-जा करत असल्याने ग्रामीण भागील जनतेला आरोग्य सेवेचा पुरेपुर लाभ मिळत नाही. सदर आरोग्य केंद्रात योग्य पद्धतीने उपचार न होता रुग्णांना दुसऱ्या ठिकाणी नेण्याचा सल्ला वारंवार दिला जातो. प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका आहे. रुग्णवाहिकेचा चालक सुटीवर गेला तर वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून कोणतीही पर्यायी व्यवस्था होत नाही. पर्यायाने रुग्णांना खासगी गाड्यांनी इतरत्र हलवावा लागतो असा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. पीएचसी मधील कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने कधीकाळी रुग्णांना स्वत:चा जीव गमवावा लागतो. ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवेचा लाभ मिळण्यासाठी आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे वरिष्ठांनी आदेश द्यावे, अशी मागणी चान्ना येथील नरेश राखडे, मिलिंद राखडे, संदीप शेंडे, सुरेश शेंडे, मेघन राखडे, लीलाधर कुंभरे, युवराज कुंभरे, कुलदेव कोरे, भाष्कर शिवणकर, अलंकार राखडे, दिपक राखडे, रवि राखडे, रवि हुमणे, दिनेश कावळे, राहुल शेंडे आदी युवा कार्यकर्त्यांनी केली आहे. (वार्ताहर)