शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत टॅलेन्ट सर्च परीक्षा १३ डिसेंबरला

By admin | Updated: December 10, 2015 02:04 IST

पेस आयआयटी अ‍ॅन्ड मेडिकल नागपूर व लोकमत बाल विकास मंचच्या संयुक्त विद्यमाने वर्ग ८ वी ते १० वीच्या ...

गोंदिया : पेस आयआयटी अ‍ॅन्ड मेडिकल नागपूर व लोकमत बाल विकास मंचच्या संयुक्त विद्यमाने वर्ग ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्याकरिता लोकमत टॅलेन्ट सर्च परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर परीक्षा १३ डिसेंबरला सकाळी १०.३० वाजता एस.एस. गर्ल्स महाविद्यालय गोंदिया येथेहोणार आहे.ही परीक्षा गोंदिया शहरात घेतली जाणार असून यासाठी कोणतेही परीक्षा शुल्क आकारले जाणार नसले तरी विजेत्या विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर बक्षीसांची लयलूट केली जाणार आहे. ही परीक्षा वर्गनिहाय घेतली जाणार आहे. स्टेट बोर्ड, सीबीएसई व आयसीएसईमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता बोर्डानिहाय परीक्षा घेतली जाईल. सदर परीक्षेत मागील वर्षी शिकलेल्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न विचारले जातील. उदाहरणार्थ १० वीच्या विद्यार्थ्यांला ९ वीच्या अभ्यासक्रमातील प्रश्न विचारण्यात येतील.या परीक्षेत गणितावर-२० प्रश्न, भौतिकशास्त्रावर-१० प्रश्न, रसायनशास्त्रावर-१० प्रश्न, जीवशास्त्रावर-१० तर बौध्दीक चाचणीवर-१० असे प्रश्न विचारण्यात येतील. सर्व प्रश्न बहुपर्यायी (आॅप्शनल) स्वरूपाचे राहणार असून निगेटीव्ह मार्किंग पध्दत राहील. प्रत्येक प्रश्नाच्या अचूक उत्तराला काळ्या रंगाच्या बॉल पेनने नोंदवायचे आहे. एकूण ६० प्रश्नांकरिता १ तास ३० मिनिटांचा वेळ दिला जाणार आहे. सदर परीक्षेत सहभागी होण्याकरिता विद्यार्थ्यांनी आपल्या नावाची नोंदणी लवकरात लवकर लोकमत जिल्हा कार्यालय गोंदिया येथे सकाळी ११ ते १ वाजेच्या दरम्यान करता येईल. तसेच श्रीकांत पिल्लेवार, जिल्हा संयोजक यांच्याकडे ११ ते ५ वाजेच्या दरम्यान मोबाईल क्रमांक ९८२३१८२३६७ वर व्हाट्सअ‍ॅप किंवा मॅसेज पाठवून करता येईल. नाव नोंदणी करताना विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव, शाळेचे नाव, वर्ग, बोर्ड ही माहिती देणे आवश्यक आहे. या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची मागील वर्षाच्या अभ्यासाची व ज्ञानाची उजळणी होणार आहे. (प्रतिनिधी)