शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांवरील अत्याचाराविरोधात ठाकरे सरकारनं आणलेलं 'शक्ती विधेयक' केंद्र सरकारनं नाकारलं, कारण...
2
बंगालमध्ये बाबरी मशीद उभारण्यासाठी किती मिळाली देणगी?; पैसे मोजण्यासाठी मागवली मशीन, Video पाहा
3
मातृभाषेसोबतच आणखी एक भारतीय भाषा शिकवा; यूजीसीचं सर्व राज्यांना पत्र, नियमावली जारी
4
ट्रम्प यांनी दिलेला युद्धबंदीचा आदेश; अवघ्या ४५ दिवसांच मोडला! थायलंडचे कंबोडियावर हवाई हल्ले
5
Donald Trump: "मी ८ युद्धे थांबवली, पण रशिया-युक्रेन संघर्ष थांबवणं सोपं नाही..." ट्रम्प असं का म्हणाले?
6
Russia Attack Ukraine: ६५३ ड्रोन्स, ५१ मिसाईल; युक्रेन हादरले! रशियाचा मोठा हवाई हल्ला
7
Goa Fire :  कुटुंबाचा आधार गेला! पैसे कमावण्यासाठी गोव्यात आलेले दोन भाऊ; क्लबच्या आगीत झाला मृत्यू
8
फक्त ७.१०% च्या व्याजदरावर 'इकडे' मिळतंय होमलोन; ₹८० लाखांच्या कर्जासाठी किती हमी मंथली सॅलरी, EMI किती?
9
गोव्यातील भीषण आगीत अवघ्या १५ मिनिटांत कुटुंब उद्ध्वस्त; चौघांचा मृत्यू, एकमेव पत्नी बचावली
10
घरबसल्या श्रीमंत व्हाल! 'या' सरकारी योजनेत गुंतवणूक करा आणि मिळवा ₹४० लाखांपेक्षा अधिक टॅक्स फ्री रक्कम
11
संसार वाचवण्यासाठी 'ती' सहन करत राहिली, पण नराधम पतीने हद्दच ओलांडली! मारहाण केली अन्...
12
काहीही होवो, सरकार शेतकरी कर्जमाफी करणारच : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
आजचे राशीभविष्य, ०८ डिसेंबर २०२५: आपण केलेल्या कामातून यश अन् कीर्ती लाभ होईल
14
इंडिगोवर मोठा आर्थिक दंड लावा; डीजीसीए आणि कंपनीच्या प्रमुखांना हटवा
15
यंदा अनावश्यक गर्दी टाळणार, आजपासून हिवाळी अधिवेशन, प्रशासन सज्ज : सभापती, उपसभापतींनी घेतला आढावा
16
देशातील सर्वांत मोठी एअरलाइन का डगमगली?; नवीन नियमांमुळे संकट! कमी कर्मचारी मॉडेलचाही फटका
17
विमानसेवाच जमीनदोस्त ! अनेक विमानतळांवर गोंधळ सुरू, प्रवाशांचे हाल
18
विरोधी पक्षनेतेपद मुद्यावरून सत्ताधारी-विरोधक आमनेसामने; ‘मविआ’ला खुर्चीचीच चिंता असल्याची सरकारची टीका
19
महाराष्ट्रात लवकरच येणार ‘मेडिकल व्हॅल्यू टुरिझम’ योजना, सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती
20
विमानतळावर इंडिगोने स्थापन केला आपत्ती व्यवस्थापन गट; अडथळ्यांबाबत २४ तासांत स्पष्टीकरण देण्याची नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; मतदानाचा टक्का घसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 21:04 IST

लोकसभा निवडणुकीत भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात मतदानाचा टक्का घसरल्याचे दिसत आहे. ११ एप्रिल रोजी १२ लाख ३४ हजार ८९६ म्हणजे ६८.२७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. २०१४ मध्ये ७२.२१ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

ठळक मुद्दे६८.२७ टक्के मतदान : २०१४ च्या तुलनेत ३.९४ टक्के घट, सर्वाधिक साकोलीत मतदान

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : लोकसभा निवडणुकीत भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात मतदानाचा टक्का घसरल्याचे दिसत आहे. ११ एप्रिल रोजी १२ लाख ३४ हजार ८९६ म्हणजे ६८.२७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. २०१४ मध्ये ७२.२१ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यंदा त्यात ३.९४ टक्के घट दिसून येत आहे. मतदानाची घटलेली टक्केवारी कुणाला तारणार यावर सध्या गावागावांत चर्चा सुरू आहे.भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात १८ लाख ८ हजार ७३४ मतदारांपैकी १२ लाख ३४ हजार ८९६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात ६ लाख २६ हजार ७४९ पुरूष आणि ६ लाख ८ हजार १४७ मतदारांचा समावेश आहे. सर्वात कमी ६४.४१ टक्के मतदान गोंदिया विधानसभा क्षेत्रात तर सर्वाधिक ७१.६५ टक्के मतदान साकोली विधानसभा क्षेत्रात झाले. २०१४ च्या मतदानाच्या टक्केवारीच्या तुलनेत ३.९४ टक्के यंदा घट आल्याचे दिसून येत आहे.२०१४ मध्ये १६ लाख ५२ हजार २८३ मतदारांपैकी ११ लाख ९३ हजार १२५ म्हणजे ७२.२१ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. ३.९४ टक्के मतदानात घट दिसून येत आहे. मतदानाचा घसरलेला टक्का कुणाला फायद्याचा ठरणार, यावर सध्या गावागावांत चर्चा सुरू आहे. कोणत्या विधानसभा क्षेत्रात कोणाला कसे मतदान मिळाले, यावर घमासान सुरू असून कोण जिंकणार आणि कोण हरणार या विषयाला घेऊन चर्चा होत आहे.प्रशासनाने मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेतली होती. मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली होती. सखी आणि आदर्श मतदान केंद्र स्थापन करून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतरही मतदानाच्या टक्केवारीत अपेक्षित वाढ झाली नाही. उन्हाच्या तडाख्याने मतदानात घट झाल्याचे सांगण्यात येत आहे.पुरूष ६९.२३ तर महिला ६७.३१ टक्केलोकसभा निवडणुकीत ६९.२३ टक्के पुरूषांनी तर ६७.३१ टक्के महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ९ लाख ५२ हजार पुरूष मतदारांपैकी ६ लाख २६ हजार ७३९ मतदारांनी तर ९ लाख ३ हजार ४६० महिला मतदारांपैकी ६ लाख ८ हजार १४७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.गोंदिया विधानसभाक्षेत्रात सर्वात कमी मतदानसहा विधानसभा क्षेत्रापैकी सर्वात कमी मतदान गोंदिया विधानसभा क्षेत्रात झाले. येथे ६४.४१ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तर सर्वाधिक मतदान साकोली विधानसभा क्षेत्रात ७१.६५ टक्के झाले. तुमसरमध्ये ७०.२६ टक्के, भंडारा ६५.६७ टक्के, अर्जुनी मोरगाव ७१.४१ टक्के, तिरोडा ६७.०८ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.भंडारा जिल्ह्यात ६९.२२ तर गोंदिया जिल्ह्यात ६७.६३ टक्केभंडारा जिल्ह्यातील तीन विधानसभा क्षेत्रातील सात तालुक्यात ६९.२२ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तर गोंदिया जिल्ह्यातील आठ तालुक्यातील ६७.६३ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकbhandara-gondiya-pcभंडारा-गोंदियाMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019