शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

Lok Sabha Election 2019; अधिकारी सावलीत अन् मतदार उन्हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 23:59 IST

निवडणूक विभाग आणि जिल्हा प्रशासनाने लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जनजागृतीवर विशेष भर दिला. त्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला.

ठळक मुद्देमतदान केंद्रावर सोयी सुविधांचा दावा फोल : मंडपाचा अभाव

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : निवडणूक विभाग आणि जिल्हा प्रशासनाने लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जनजागृतीवर विशेष भर दिला. त्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला.तर वाढते तापमान लक्षात घेऊन मतदान केंद्र परिसरात मतदारांना उभे राहण्यासाठी मंडप टाकण्याच्या सूचना दिल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात गुरूवारी (दि.११) अनेक मतदान केंद्रावर मंडापासह, पिण्याच्या पाण्याच्या सुविधेचा सुध्दा अभाव होता. त्यामुळे मतदारांना मतदान करण्यासाठी उन्हातच उभे राहावे लागले. त्यामुळे मतदान केंद्रावर सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रशासनाचा दावा पूर्णपणे फोल ठरला.मतदान केंद्रावर मतदारांना अनुकुल वातावरण निर्माण करुन देण्यासाठी तसेच महिलांसाठी सखी मतदान केंद्राचा उपक्रम निवडणूक विभागातर्फे यंदा प्रथमच राबविण्यात आला. तर दिव्यांग आणि वृध्दांना मतदान केंद्रावर व्हिलचेअरची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनाने सांगितले होते. मात्र नक्षलग्रस्त भागातील अनेक मतदान केंद्रावर व्हिलचेअरची सुविधाच नव्हती.त्यामुळे घोनाडी येथील मतदान केंद्रावर दोन महिलांनीच आपल्या अंपग मुलीला मतदान केंद्रावर मतदान केंद्रावर उचलून आणावे लागले. हवामान विभागाने पुढील दोन तिन दिवस तापमान अधिक राहण्याची शक्यता वर्तविली होती. त्यामुळे निवडणूक प्रशासनाने सुध्दा याचा मतदानावर परिणाम होवू नये, यासाठी मतदान केंद्राबाहेर मंडप टाकण्याच्या सूचना केल्याचे सांगितले होते.मात्र जिल्ह्यातील बहुतेक मतदान केंद्रावर मंडप नसल्याने मतदारांना भर उन्हात मतदान करण्यासाठी उभे राहावे लागले. तर मतदान केंद्र स्थळी पाण्याची देखील सुविधा नव्हती त्याचा सुध्दा अनेक मतदारांना फटका बसला. तर मतदान केंद्रस्थळी नियुक्त निवडणूक अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांसाठी सुध्दा पाण्याची सोय नसल्याने त्यांनी स्वत:च पैसे गोळा करुन पाण्याची कॅन मागविल्याचे सांगितले. एकंदरीत मतदान केंद्रावर विविध सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रशासनाचा दावा पूर्णपणे फोल ठरला.मतदान केंद्राची पाहणी न करताच निवडगुरूवारी (दि.११) मतदानाकरिता निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या निवडणूक कर्मचाºयांच्या पोलींग पाटर्या बुधवारी (दि.१०) त्यांच्या नियुक्त ठिकाणी साहित्य घेवून पोहचले.मात्र मतदानासाठी निवड केलेल्या बहुतेक मतदान केंद्रावर वीज आणि पाण्याच्या समस्येला कर्मचाºयांना तोंड द्यावे लागले. त्यामुळे मतदानापूर्वीच ही स्थिती आहे, तर मतदाना दरम्यान काही गडबड झाल्यास जबाबदार कोण राहणार असा प्रश्न उपस्थित करीत त्यांनी याची निवडणूक निर्णय अधिकाºयांकडे याची तक्रार सुध्दा केली. त्यामुळे निवडणूक विभागाने मतदान केंद्राची निवड करताना त्यांची पाहणी केली किंवा नाही असा प्रश्न निर्माण झाला होता.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकbhandara-gondiya-pcभंडारा-गोंदियाMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019