शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेसाठी सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीची भुजबळांकडून घोषणा; नाराजीच्या चर्चेवरही केलं भाष्य
2
मनोज जरांगे आणखी आक्रमक होणार?; आरक्षणाबाबत सरकारला नवा अल्टिमेटम, म्हणाले...
3
पेमा खांडू यांनी तिसऱ्यांदा घेतली अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
4
करुन दाखवलं! रिसेप्शनिस्टचं काम, जर्मनीतील नोकरी सोडली अन् स्वप्न साकार केलं; झाली IPS
5
"दिवाली हो या होली, अनुष्का लव कोहली", Virat Kohli समोर चाहत्यांची घोषणाबाजी
6
"आम्हाला पण लिहिता येतं, रोष कुणावर आहे हे जरा..."; RSS च्या टीकेला राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर
7
याला म्हणतात 'ढासू' रिटर्न...! ₹१५ च्या शेअरनं ₹1 लाखाचे केले ₹2 कोटी; दिला 25,000% चा परतावा, केलं मालामाल
8
सारा अली खानसोबत ब्रेकअपनंतर सिंगल आहे कार्तिक आर्यन, अनन्या पांडेसोबतही जोडलं गेलं नाव
9
Pankaja Munde : Video - "जीव देऊन भागणार नाही रे बाळांनो, तुम्हाला माझी शपथ"; पंकजा मुंडेंची हात जोडून विनंती
10
अंतरवलीला उपोषणासाठी निघालेले ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंना बार्शीत अटक
11
अजब-गजब! चीनने सार्वजनिक टॉयलेटच्या बाहेर लावले 'टायमर'; सोशल मीडियावर चर्चा
12
PAK vs IRE : पाकिस्तानची डोकेदुखी वाढली; पाऊस शेजाऱ्यांना वर्ल्ड कपमधून बाहेर करणार?
13
एकाच वेळी 2 गुड न्यूज अन् शेअर बाजार पुन्हा विक्रमी उच्चांकावर; Sensex-Nifty नं घेतला रॉकेट स्पीड!
14
Video - कुवेतमध्ये अग्नितांडव! १९६ मजुरांना इमारतीत ठेवलेलं कोंबून; झोपेतच गमावला जीव
15
Pushpa 2 : अल्लू अर्जुनच्या सिनेमाला ब्रेक! १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार नाही 'पुष्पा २'? मोठी अपडेट समोर
16
'राजकारणातील आयुष्य कठीण', पहिल्याच सिनेमानंतर मिळालेली ऑफर; कंगना रणौतचा खुलासा
17
चार माेठे पाऊस पूर आणणार; मुंबईत मान्सून पॅटर्न बदलतोय, हवामान तज्ज्ञांचा इशारा 
18
वर्ल्ड कपचे सामने संपले! न्यूयॉर्क येथील स्टेडियम तोडण्यासाठी बुलडोझर पोहोचले, पण का?
19
पाकिस्तानच्या संरक्षण बजेटमध्ये १५% वाढ; दारूगोळा, हत्यारे खरेदीसाठी ५४८ अब्जची तरतूद!
20
मेहबूबा मेहबूबा! वयाच्या 85 व्या वर्षीही हेलन यांचं जिममध्ये वर्कआऊट; म्हणाल्या, 'नशेसाठी मला...'

Lok Sabha Election 2019; मिसपिर्रीवासीयांचा निवडणुकीवर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 10:22 PM

तालुक्यातील मिसपिर्री गट ग्रामपंचायत ३ नोव्हेंबर २०११ ला नक्षलवाद्यांनी जाळून टाकली. यात नागरिकांच्या नेहमी उपयोगात येणारे जन्म, मृत्यूचे दस्ताऐवज जळून नष्ट झाले. त्यामुळे हे दाखल पुन्हा तयार करुन देण्यात यावी, या मागणीचा प्रस्ताव ग्रामपंचयातने शासनाकडे पाठविला.

ठळक मुद्देग्रामसभेत घेतला निर्णय : आठ वर्षांपासून मागणीकडे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : तालुक्यातील मिसपिर्री गट ग्रामपंचायत ३ नोव्हेंबर २०११ ला नक्षलवाद्यांनी जाळून टाकली. यात नागरिकांच्या नेहमी उपयोगात येणारे जन्म, मृत्यूचे दस्ताऐवज जळून नष्ट झाले. त्यामुळे हे दाखल पुन्हा तयार करुन देण्यात यावी, या मागणीचा प्रस्ताव ग्रामपंचयातने शासनाकडे पाठविला. मात्र याला आठ वर्षांचा कालावधी लोटूनही शासनाने त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे मिसीपिर्रीवासीयांनी लोकसभा निवडणुकीसह सर्वच निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा ठराव ग्रामसभेत घेतला आहे.देवरी तालुक्यातील अतिदुर्गम, आदिवासी व नक्षलग्रस्त गट ग्रामपंचायत मिसपिर्री येथील ग्रामपंचायत कार्यालय नक्षलवाद्यांनी ३ नोव्हेंबर २०११ ला पूर्णपणे जाळून टाकली. यात नागरिकांचे नेहमी उपयोगात येणारे जन्म, मृत्यू दस्ताऐवज सुद्धा जळून नष्ट झाले. त्यामुळे येथील गावकऱ्यांच्या मागणीवरुन अंगणवाडी, शाळेचे दाखले खारीज व आरोग्य विभागाच्या रेकार्डनुसार जन्म-मृत्यूचे दस्ताऐवज तयार करुन ग्रामसभेची मंजुरी घेवून सदर प्रस्ताव २८ डिसेंबर २०१५ ला जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत पंचायत मंत्रालय मुंबईला पाठविले होते. परंतु या प्रस्तावाला अजूनपर्यंत मंजुरी न मिळाल्याने या प्रकाराला कंटाळून शासनाच्या प्रती रोष व्यक्त करीत मिसपिर्री येथील लोकांनी ३० आॅगस्ट २०१८ ला घेतलेल्या ग्रामसभेत जोपर्यंत त्यांची मागणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत सर्वच निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. गावातील एखाद्या व्यक्तीला जन्म किंवा मृत्यूचे प्रमाणपत्र लागत असेल तर सदर प्रमाणपत्राकरिता दिवानी न्यायाधीश यांच्या न्यायालयामध्ये अर्ज दाखल करावा लागतो. परंतु सदर प्रमाणपत्र प्राप्त करण्याकरिता ७ ते ८ हजार रुपयांचा खर्च सोसावा लागतो. यानंतरही प्रमाणपत्र मिळत नाही. त्यामुळे येथील गावकऱ्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंबधिचे निवेदन सुध्दा जिल्हाधिकारी व शासनाला पाठविले आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक