शहरं
Join us  
Trending Stories
1
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
2
पुतिन यांनीच फोडला 'बॉम्ब'! तेल खरेदी करण्यावरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
3
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
4
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
5
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
6
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
7
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
8
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
9
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
10
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
11
“मुंबई महापालिका कुणी लुटली, हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे”; संजय राऊतांचा पलटवार
12
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
13
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
14
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
15
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
16
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
17
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
18
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
19
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
20
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक

१२६८ वाहन चालकांना लॉकडाऊनचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 05:00 IST

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी २२ मार्चला जनतेचा कर्फ्यू करण्यात आला. परंतु २३ मार्चपासून केंद्र व राज्य सरकाने कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊन केला आहे. लॉकडाऊनमध्येही लोक विनाकारण रस्त्यावर येत असल्यामुळे त्यांच्यावर वाहतूक नियमान्वये कारवाई करून दंड वसूल करण्याची मोहीम जिल्हा वाहतूक शाखेने चालविली आहे.

ठळक मुद्देरस्त्यावर आल्यास खबरदार : २.६० लाखांचा दंड वसूल

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कारोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सरकारने लोकांना घरातच राहण्याचा सल्ला दिला आहे. मात्र यानंतरही लोक विनाकारण रस्त्यावर येत असल्याने जिल्हा वाहतूक पोलिसांनी २३ मार्च ते ७ एप्रिलच्या दुपारपर्यंत १ हजार २६८ वाहन चालकांना दंड आकारून त्यांच्याकडून २ लाख ६१ हजार ९०० रूपये दंड ठोठावून वसूलही केला आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी २२ मार्चला जनतेचा कर्फ्यू करण्यात आला. परंतु २३ मार्चपासून केंद्र व राज्य सरकाने कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊन केला आहे. लॉकडाऊनमध्येही लोक विनाकारण रस्त्यावर येत असल्यामुळे त्यांच्यावर वाहतूक नियमान्वये कारवाई करून दंड वसूल करण्याची मोहीम जिल्हा वाहतूक शाखेने चालविली आहे. विनाकारण रस्त्यावर येणाऱ्या अश्या १ हजार २६८ लोकांना २३ मार्च ते ७ एप्रिल या काळात दंड करण्यात आला आहे. चारचाकी किंवा दुचाकी वाहन चालक रस्त्यावर फिरू नयेत म्हणून पोलिसांनी कायद्याची कडक अमंलबजावणी सुरू केली आहे. कारण नसताना एखादा व्यक्ती रस्त्यावर आढळला व पोलिसांना समाधानकारक उत्तरे न मिळाल्यास त्या वाहन चालकाला थांबवून त्याच्या वाहनात किंवा वाहन चालवितांना कोणत्या-ना कोणत्या तृट्या दाखवून पोलीस कारवाई करीत आहेत. लॉकडाऊनमुळे वाहतूक पोलीस आणखीच कडक नियम लावून कारवाई करीत आहे. हे कडक नियम कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उचललेले योग्य पाऊल आहे. २३ मार्चपासून कारवाई करण्याची मोहीम सुरू केली आहे. दुचाकी, चारचाकी अशा १ हजार २६८ वाहनांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत २ लाख ६१ हजार ९०० रूपये दंड वसूल करण्यात आला आहे. लॉकडाऊनचे पालन व्हावे हा एकमेव या मागचा उद्देश आहे. रस्त्यावरून येणाºया-जाणाºया प्रत्येक वाहनाची कसून चौकशी पोलिसांकडून करण्यात येत आहे. कारण नसताना वाहन रस्त्यावर आले की त्या वाहनाला दंड कसा करायचा याच्याच प्रयत्नात वाहतूक पोलीस दिसत आहेत. हे जरी वाहन चालकांना योग्य वाटत नसले तरी आजघडीला वाहतूक पोलिसांकडून करण्यात येणारी ही कारवाई समाजाच्या हिताची आहे. दंडामुळे विनाकारण लोक रस्त्यावर येणार नाहीत आणि कोरोनाच्या लढाईत सर्व जिंकतील हा या मागील उद्देश आहे.दोन दिवसांपासून सर्वत्र कारवाई२३ मार्च ते ७ एप्रिलच्या दुपारपर्यंत या लॉकडाऊनच्या काळात १२६८ वाहनांवर दंड आकारण्यात आला. परंतु मागील दोन दिवसात मोठ्या प्रमाणात कारवाई करायला पोलिसांनी सुरूवात केली आहे. ६ एप्रिल रोजी ३२६ वाहनांकडून ६६ हजार ८०० रूपये दंड वसूल केला आहे. ७ एप्रिल रोजी दुपारी १ वाजतापर्यंत २०६ लोकांवर दंड आकारून त्यांच्याकडून ४१ हजार ७०० रूपये वसूल करण्यात आले आहे. सोमवारी जप्त करण्यात आलेल्या ४७ वाहन मोटारवाहन कायद्याच्या २०७ प्रमाणे हस्तगत करण्यात आले आहेत. त्या वाहनांच्या कागदपत्रांची पूर्तता चालकाने पूर्ण केल्यास दंड आकारून ते वाहन सोडले जाणार आहे.सद्या कोरोनाचा संसर्ग रोखण्याकरीता नागरिकांनी अति महत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये,अन्यथा कायदेशिर कारवाई केली जाईल.- दिनेश तायडे, पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा गोंदिया.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिस